मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
आरती रामाची

आरती रामाची

संत बहेणाबाईचे अभंग

५४५.
आरती रामराजा । दशरथ - आत्मजा । जानकी वामभागी । जय लक्षमण - अग्रजा ॥धृ०॥
सन्मुख मारूती तो । पायी अखंड दृष्टी । चामरे छत्रधारी उभा भरत पृष्ठी ॥१॥
टाकुनी वेळ येती । देव तेहतीस कोटी । श्रीरामनाम - शब्द । होय गर्जना मोठी ॥२॥
अंबरी पुष्पवृष्टि । होय आनंद मोठा । धन्य हा मृत्युलोक । उणे केले वैकुंठा ॥३॥
ब्रह्मादि देव तीन्ही । सुख पाहाती डोळा । घोटीती लाळ तेही । ऐसी चुकलो वेळा ॥४॥
सुस्वर शब्दनाद । गाय रामनाम नारद । तुंबर नाचताती । देवा जाणविती भेद ॥५॥
तेहेतीस देव कोटी । पुढे उभे तिष्ठती । श्रीरामनाम शब्द - । नाद दाटला नभी ॥६॥
वाजती दिव्यवाद्ये । शंखभेरी अनेका । बहेणि तिष्ठताहे । हाती घेऊनी पादुका ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP