मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
हमामा

हमामा

संत बहेणाबाईचे अभंग

५९३.
तुज मज वार । येथे कोण म्हणे किर । ऐसे सोस सरसे मगे का बोलसी फार ॥१॥
हमामा रे पोरा हुंबरी रे । ऐसे करिती किती पांगली रे ॥धृ०॥
अहं सोहं स्वर सारूनी मिळू एक घाई । स्वानुभवाचे सुख तेथे सांगू आता काई ॥२॥
क्षरनाक्षर वाजे अनुहात ध्वनी । पडिला विसरू झाली तन्मयता ध्यानी ॥३॥
बहिणी घाली वार । अवघ्या म्हणविले किर । परतली वृत्ती झाली निजानंदी स्थिर ॥४॥

५९४.
हमामा पोरा हमामा । वाजे सवाई दमामा । दमाम्याची थोर घाई । पोरा मेली तुझी आई ॥१॥
सांडी ईचा चाळा । पोरा लावी ऊर्ध्व डोळा ॥२॥
रदोन आता काई । मी सवे तुझी आई ॥३॥
बार धरी नेटे । समान करी बोटे ॥४॥
नाम हुंबरी - छंदे । उडवूं नको बंडे ॥५॥
बाई घेई पोरा । बांधून हाती दोरा ॥६॥
हुंबरी घाली नेटे । घेवून हाती काटे ॥७॥
खेळ नव्हे फुका । चुकवी जन - थुंका ॥८॥
हुंबरी उतरी घाई । विवसी ठाई ठाई ॥९॥
हुंबरी घालिता सोसे । मग पाहे ते सुख कैसे ॥१०॥
बहिणी सुखे धाली । अनुपम हुंबरी घाली ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP