मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
संतवर्णनपर

संतवर्णनपर

संत बहेणाबाईचे अभंग

५७०.
संत देखता दृष्टी । वृत्ति जाली उफराटी । हारपल्या अवघ्या गोष्टी । पडिले मौन ॥१॥
दृश्याचे लोपले भान । द्वैताचे उठले ठाण । ब्रह्मानंदसुखे गगन । भरोनी ठेले ॥२॥
मनासी जाहले ठक । डोळीया पडले टक । देखोनि अखंड एक । स्वरूप डोळा ॥३॥
शब्द निःशब्द झाला । निवृत्तीसी सामावला । सुमनाचा ध्यास तुटला । जयाचे ठायी ॥४॥
बहिणीस लागता संतसंग । संतप्रेमा अंतरंग । सकळाचा होऊनी भंग । अखंड ठेली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP