TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
खेळिया - जनी वनी एक जनार्दन दाता ।...

भारुड - खेळिया - जनी वनी एक जनार्दन दाता ।...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


भारुड - खेळिया

जनी वनी एक जनार्दन दाता । त्यासी नमन करू आता रे ।

मन उन्मन जयासी पाहता । त्याच्या चरणावरी माथा रे ॥१॥

नाचत पंढरिसी जाऊ रे खेळिया । क्षराक्षरातीत पाहू रे ।

टाळ-मृदुंग मेळवूनि मेळा । गुरुवचनी खेळ खेळा रे ॥ध्रु॥

भक्‍ता वैराग्य कुंडले श्रवणी । ज्ञानांकुश मुकुटमणि रे ।

सप्रेम उटी चंदनाची । सत्वाची कास निर्वाणी रे ॥२॥

अष्टभावे खेळिया खेळताती ठायी । घागर्‍या वाजती पायी रे ।

दया क्षमा दोन्ही चवर्‍या ढाळती । शांती सत्रावी छाई रे ॥३॥

वाद निमाला शब्द खुंटला । त्रिभुवनी आनंद झाला रे ।

एका जनार्दनी शरण गेला । तो एकपण विसरला रे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:31:01.7570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सांचा

  • पु. १ ठसा ; मूस ; एकाच प्रकारचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी केलेली विवक्षित घडण , यंत्र . ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षराचे सांचे । - ज्ञा ११ . २०८ . २ एकाच जातीच्या पदार्थांचा समुदाय , जुळी . ( उदा० सारख्या लांबीरुंदीचे कागद , पानें , इ० ) ३ नमुना ; कित्ता . ४ ( कुंभारी ) कोळंबे इ० करण्यासाठी ज्यावर मातीचा गोळा घेतात ती फळी . ही शेवटावर बसविलेली असते . ५ ( मुद्रण ) आठ , सोळा पानांचा एक भाग फर्मा . ६ संचय ; सांठा . उपरि सकंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे । - र ८ . [ सांचणें ] 
  • m  A mould or matrix. A model. 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site