TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

आशीर्वादपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...

भारुड - आशीर्वादपत्र Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - आशीर्वादपत्र

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।
पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।
कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील ॥ २ ॥
आशा मनषा यांची संगत धरू नये ।कलम० ॥ ३ ॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे ।कलम तपसील ॥ ४ ॥
शांतिक्षमादया असो देणे ।कलम तपसील ॥ ५ ॥
ज्ञान वैराग्य - भजनपूजनी आदर ठेवणे ।कलम तपसील ॥ ६ ॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले । तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून । वाईट वागणुकीचा रस्ता काढला । तो तुम्हास परिणामी बाधक होईल । सावध रहाणे । एका जनार्दनी शरण । हे आशीर्वादपत्र
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:50.4130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वेस

  • स्त्री. १ गांवकुसाचा दरवाजा ; नगरव्दार . २ परसाचे , कुंपणाचे दार . ३ घराचें मोठे दार ; दिंडीदरवाजा . ४ सरकारी पट्टी , सारा भरणें ( गांवचे दरवाजे लावून ती वसूल करीत यावरून ). [ सं . विश् ‍ ] वेशीं - वेशीवर - ला - बांधणें - टांगणें - मोठयाने सांगणें ; जाहीर करणें ; सर्वांना कळविणें . हे माझे वेड मी चवथ्या लेखांत जनतेच्या वेशीवर टांगलें आहे - केकाआर्या . १ . ( दुखणें ) वेशीस बांधणें - आपली अडचण ; आपत्ति जाहीर करणें . 
  • ०कट कड - स्त्री . कुंपणाच्या दाराची कवाडी , फाटक . 
  • ०कर करी - पु . वेस राखणारा महार . ( पूर्वी गांववेशीवर महारांचा पहारा असे ). जोहार मायबाप जोहार । सारा द्यावया आलो वेसकर । - तुगा ३३६ . 
  • ०वाटी पु. ( कों . ) घर राखणारा मूळ पुरूष ( सर्प ), किंवा देवता . ही घराला भुताखेतांची बाधा होऊं देत नाही . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site