TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जागल्या - रात्रंदिवस घोकितो तुम्ही ...

भारुड - जागल्या - रात्रंदिवस घोकितो तुम्ही ...

भारुड - जागल्या

भारुड - जागल्या

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा ।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा ।
उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥
उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप ।
हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥
तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी ।
तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥
हिंडता देशांतरी चौर्‍याऎंशी जग ।
अजून सापडला नाही नीट सुमार्ग ।
कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥
जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा ।
त्याच्या आधारे बोलेन घडाघडा ।
एका जनार्दनी घरा बळकट मेढा ।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:03.8370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कूर्चा

  • स्त्री. ( शाप .) मृदु अस्थि ; मृदु अस्थीचें वेष्ठण ; ( इं .) कार्टिलेज . ' हांडांच्या शेवटीं कुंचेचें म्हणजें मृदुअस्थीचें वेष्टण असतें .' - मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) पृ . २५४ . ( सं . कूर्च ) 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.