TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी न...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी न...

भारुड - जोहार

भारुड - जोहार

जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार ।
सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की मायबाप ॥ १ ॥
जिवाजीने सारा गाव बुडविण्याची धरली हाव ।
त्यासी मिळाले कामाजीराव । मग अन्याय सहजचि की. ॥ २ ॥
कामाजी बाजीस मिळाले । क्रोधाजी गावात सहज शिरले ।
लोभाजीचे ठाणे जोडले । मग विसरले धन्यासी की. ॥ ३ ॥
मदाजीबाबा तो जाहले मस्त । त्यांनी गाव पांगविला दरोबस्त ।
मत्सर बाबा उन्मत्त । आपआपणात मिळाले की. ॥ ४ ॥
दंभाजी म्हणविती चौधरी । सदा बसती आपुले घरी ।
धन्याची तलब आलियावरी । गांडीवर टोले की. ॥ ५ ॥
अहंकार पोतनीस कारभारी । ते जिवाजीस ठेविती धाब्यावरी ।
त्याची भरोवरी कोण करील की. ॥ ६ ॥
याची नका धरू संगती । तेणे तुमचीन चुके पुनरावृत्ति ।
एका जनार्दनी करी विनंती ।संती ऎकावी की जी मायबाप ॥ ७ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:04.9770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खुलासा

 • पु १ निश्चिन्ती . ' खुलसियानें असत जावें .' - ख १ . १६२ . २ पेंचमुक्त . ' वरकडांचा सरंजाम खुलासा , यांचा सरंजाम सुटलाच नाहीं .' - ख . २ . ८४५ . ३ मोकळेपणा ; खुलेपणा . ( अर . खलास ) 
 • पु. १ अर्थ ; मतलब ; उद्देश ; झोंक ; आशय ; धोरण ; अभिप्राय ( भाषण , लेख याचा ). ( क्रि० काढणें ; निघणें ) २ निवाडा ; निकाल . निर्णय . ३ स्पष्टिकरण . ४ सार ; निष्कर्ष , सारांश . ' त्यांत खुलासा हाच कीं अंतर्वेदींत मर्‍हाटें न आणावें .' - रा . ६ . ३०८ . ( अर .) 
 • पु. १ मनमोकळेपणा . ' खुलासा बळकट झाला .' - पौआ ३७५ . २ शुद्धभाव . ' चित्तांतील खुलासा व अहवाल जाहीर व्हावा .' - रा . ७ . ९२ . ( अर . खलास = मोकळेपणा ) 
 • ना. अर्थ , झोक , तपशील , मतलब , स्पष्टीकरण ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.