TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोहार - जोहार मायबाप जोहार । मी त...

भारुड - जोहार - जोहार मायबाप जोहार । मी त...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - जोहार

जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार । लहानसा महाराचा पोर ।

माझे बोलण्याचा विचार । दुसरा नाहीं की जी मायबाप ॥ १ ॥

माझ्या बोला ऐकिजे । मोठेमोठे उमराव राजे ।

तुम्हीच का जिवाजी न जाणिजे ।

वेळेस संदेह धरितां की० ॥ २ ॥

चैतन्य चावडीचा महार । कीं जी मिराशी महार ।

जेव्हां नव्हता गांवचा आवार ।

मज ओळख नाहीं की० ॥ ३ ॥

कायापूरचा अचाट पाया । मनाजी संगें मिळाले खाया ।

परि नाहीं वाट की० ॥ ४ ॥

दहा गुरें बाहेर दिसती । पांच गुरें अंतर असती ।

इतुकीं आवरीं अवचिती । नाहीं तरी खोडा पडसी की० ॥ ५ ॥

बाराजणें फुगवितील गाल । शेवटीं तुम्हीच बांधिले जाल ।

तुमचे होतील बेताल । तेव्हां तुम्हांस कोण सोडवील की० ॥ ६ ॥

सारे कडेचे पोहणार । दहा आणि पांच पोर ।

एकनाथ करितो जोहार । अक्कल धरा की जी मायबाप ॥ ७ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:33.5700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्‍यास झोंप लागे स्‍वस्‍थ

  • ज्‍याच्याजवळ चोरीस जाईल असा जिन्नसच नसतो त्‍याला कसलीहि काळजी नसल्‍यामुळे शांत झोप येते. ज्‍याच्याजवळ पैका असतो त्‍याला चोरीची धास्‍ती असल्‍यामुळे नीट झोप येत नाही. तु०-गळां नाही सरी सुखें निद्रा करी. 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site