TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
आंधळा - आधि देखत होतो सकळ । मग ह...

भारुड - आंधळा - आधि देखत होतो सकळ । मग ह...

भारुड - आंधळा

Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


भारुड - आंधळा

आधि देखत होतो सकळ ।
मग ही दृष्टी गेली आले पडळ ।
चालत मार्ग न दिसे केवळ ।
आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१॥
दाते हो दान करा तुम्ही संत उदार ।
चालता मार्ग दाखवा मज निर्धार ।
गुंतलो, लोभ आशा न कळे विचार ।
दृष्टी ते फिरवूनी द्या मुखी नामाचा उच्चार ॥२॥
त्रैलोक्यात तुमची थोरी पुराणे वर्णिती साचार ।
वेदही गाती तया नकळे निर्धार ।
कीर्ती गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर ।
म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥
अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार ।
तेणे पंथे चालताना फिटला मायामोह अंधार ।
एका जनार्दनी देखिला परे परता पर ।
श्री गुरु जनार्दन कृपेने दाविले निजघर ॥४॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:50.1630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बेचकळी

  • नस्त्री . 
  • झाडाच्या दोन खांद्यांच्यामधील जागा ; दुबेळकें ; डेळकें ; बेळकी ; बेळकें . 
  • हाताच्या किंवा पायाच्या दोन बोटांमधील अंतर किंवा जागा . 
  • गुडघा , हात , कंबर , मान यांच्या बांकाच्या किंवा लवणीच्यामधील जागा , अंतर . [ बीच + अंगुली - शर . ] बेचकुळींत , बेचंगळ्यांत - क्रिवि . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.