TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
माझे कुळीची कुळस्वामिनी

भारुड - माझे कुळीची कुळस्वामिनी

भारुड - माझे कुळीची कुळस्वामिनी

भारुड - माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासनि । ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥ १ ॥
येई पुंडलिक वरदायिनी ।विश्वजननी । रंगा येई वो ॥ धृ. ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधले ।
ज्ञान कळस वर ठेवले ।
पूर्ण भरियले । धूप दाविले दंड । सुवासे करूनि ॥ २ ॥
सभा मंडपो शोभला । भक्‍ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला ।रंग माजला ।
वेद बोलला । मूळचा ध्वनि ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी
मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥ ४ ॥
ऎसा गोंधळी घातिला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऎक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥ ५ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:51.2270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घरीं कामधेनु, पुढें ताक मागे

  • (रामदास-मुक्ताबाई) जवळ संपति असतां ती माहित नसल्‍यामुळे निकृष्‍ट स्‍थितीत राहणें 
  • स्‍वतःजवळ असलेला ठेवा न सापडल्‍यामुळे दारिद्र्यात दिवस काढणें. परमेश्र्वर आपल्‍या हृदयात असतां ती गोष्‍ट न जाणून परमेश्र्वर प्राप्तीकरिता अनेक प्रकारचे कष्‍ट करणें 
  • आत्‍मज्ञानाची प्राप्ति करून न घेतां व्यर्थ जपतपादि खटपट करणें. ‘देहीच देव असतां कारे भ्रमतोसि व्यर्थ तूं रानीं नभित सुगंधि असतां कस्‍तुरि मृग जेवि तो फिरे रानी।।’ 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site