TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
चौदेहांची घेऊनी दीक्षा

भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा

भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा

भारुड - चौदेहांची घेऊनी दीक्षा

चौदेहांची घेऊनी दीक्षा ।
आम्ही मागू कोरान्न भिक्षा ।
अलक्ष्य अनुलक्ष ।
प्रत्यक्ष जनार्दन आम्हा साक्ष ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
देही असून होऊ विदेही ।
कामक्रोध बांधू पायी ।
आशा मनिषा करु दिशा दाही ।
मदमत्सर उडवू भाई ॥२॥
प्रपंचाची लावूनी राख ।
तोडू जन्ममरणाचा पांग ।
एका जनार्दनी अनुराग ।
अक्षय संग संताचा ॥३॥
बाळ संतोष बाबा ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2007-12-13T14:51:55.1730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

करोट

  • पु. ( व .) शेताच्या लागवनीबद्दल येणारें धान्य ( खंड ?) 
  • करोट होणें 
  • करोटी म्‍हणजे माणसाची कपाळाची कवटी. त्‍यावरून मरणें 
  • स्‍मशानभूमिगत होणें. 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site