TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
महारीण - महारीण हिंडे गांवांत । पा...

भारुड - महारीण - महारीण हिंडे गांवांत । पा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - महारीण

महारीण हिंडे गांवांत । पाटीलबावा आहेत झोंपेंते । महारीण बहुतीं फिरत । पाटील झोंपेंत झाले मस्त ॥ १ ॥

मायबाप जोहार । मी सांगतें तें ऐका साचार । तुमची नगरी करा हुशार । आतां येतील यमाजी हुद्देदार ॥ २ ॥

झोंप सांडा आतां उठाउठी । पुढें आली यमाजीची चिठ्ठी । जाब देतां व्हाल हिंपुटी । मारील गांडीवरी जेव्हा काठी ॥ ३ ॥

मायबापाचें न चाले कांहीं । भाऊ बहिणी राहती ठायींच्या ठायीं । सेजेची बायको पुसेना कांहीं । इष्ट मित्र कोणाचे भाई ॥ ४ ॥

जोंवरी तुमचे हातीं आहे । तोंवरी कराल तें होय । आयुष्य सरल्या कराल काय । भोयीं न टेकती पाय ॥ ५ ॥

म्हणोनी येतें काकुलती । धरा धरा सत्संगती । तेणें होईल तुम्हां विश्रांती । एका जनार्दनीं करी विनंती ॥ ६ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:54.1000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

त्रयी

 • स्त्री. १ ( व्यापक ) तिघांचा समुदाय . गुणी देवात्रयी लाविली । गुणी लोक त्रिपुटी पाडिली । - ज्ञा १८ . ८१७ . २ बाप , आजा व पणजी असे अनुक्रमाने येणारे तीन पूर्वज . ३ आई , आजी व पणजी या तिन्ही समुच्चयाने . ४ ऋक , यजुस व साम हे तीन वेद . ५ राजनीतीच्या आन्वीक्षिकी , त्रयी , वार्ता व दंडनीति या चार प्रकारांपैकी दुसरा प्रकार . यासच धर्मविद्या किंवा धर्माधर्मविचार असे म्हणतात . आन्वीक्षिकी , वार्ता व दंडनीति हे शब्द पहा . [ सं . ] ( वाप्र . ) ( एखाद्याची ) त्रयी उद्धरणे - ( एखाद्याला ) आईबापावरुन शिव्या देणे ; त्याचे पितर उद्धरणे . सामाशब्द - 
 • n. सवितृ तथा पृश्नि की कन्या [भा.६.१८] 
 • ०धर्म पु. ऋग्यजुस्साम या तीन वेदांत सांगितलेला धर्म ; वेदोक्त कर्ममार्ग . म्हणऊनि मज एकेविण । हे त्रयीधर्म अकारण । हे ज्ञानयाग तिन्ही वेदांनी विहित असल्यामुळे या मार्गास त्रयीधर्म असे जुने नांव आहे . - गीर २८७ . [ त्रयी + धर्म ] त्रयीमध्ये उगवलेला वि . १ तिन्ही वेदांत पारंगत असलेला . २ ( उप . ) चोरी , चहाडी व शिनकळ या तीन गोष्टीत कुशल असलेला . 
RANDOM WORD

Did you know?

संत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का ?
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.