TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोशी - माझा शकुन ऎका भाई । चार व...

भारुड - जोशी - माझा शकुन ऎका भाई । चार व...

भारुड - जोशी

भारुड - जोशी

माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही ।
सहा शास्त्रेंवदती पाही । तेचि धरूनी रहा ॥ १ ॥
सावध नाना सावधनाना । समज काही तरी धरी मना ॥ध्रु॥
नका जाऊ आडवाटे । तेथे लागती चपेटे ।
दात विचकुनी पडसी नेटे । उगेच पहा ॥२॥
गेले सरले मागील फेरे । आता दिवस आले बरें ।
विघ्न नाहीसे जाले सारे । सावध रहा ।३॥
एका जनार्दनींचा जोशी । होरा सांगतो संताशी ।
ऎकता जातील मोक्षच दासी ।
नायकता पडतीलचौर्‍याऎंशी । हेचि पहा ॥४॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:05.7570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अर्थना

  • स्त्री. याचना ; विनंति ; मागणी ; अभ्यर्थना ; प्रार्थना . हेचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थी अर्जुना । - ज्ञा १८ . ११२० . [ सं . अर्थ ] 
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.