TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
आंधळा पांगळा

भारुड - आंधळा पांगळा

भारुड - आंधळा पांगळा

भारुड - आंधळा पांगळा

असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा ।
आपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा ।
मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा ।
शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥
संत तुम्ही मायबाप माझी राखा काही दया ।
लागतो मी वारंवार तुमचिया पाया ॥धृ. ॥
इंद्रीये माझी न चलती क्षणभरी ।
गुंतलो मायामोहे या संसाराचे फेरी ॥
अंथरूण घातले इंगळाचे शेजेवरी ।
कैशी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥२॥
मायबाप संत तुम्ही उपकार करा ।
जगी जो नांदतो जनीं जनार्दन तो खरा ॥
तयाचिया चरणावरी मस्तक निर्धारा ।
एका जनार्दनी करी विनंती अवधारा ॥३॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:53.7270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विपरीत

 • वि. १ उलट ; विरुध्द ; उफराटें ; विचित्र . केळि जशा विपरीत तशा उरु पावलें तीं । - राधावर्णन अकंक २ . - ज्ञा १ . २१९ . नये नानाचे मनास जाहलें विपरीत इतरांस । - ऐपो ३०६ . २ प्रतिकूल ; अननुकूल ; अप्रसन्न . आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी । - ज्ञा १५ . ५२१ . ३ अन्य ; भिन्न प्रकारचा . [ सं . वि + परि + इ = जाणें ] 
 • ०काल पु. प्रतिकूलसमय ; कष्टदशा . 
 • ०भावना स्त्री. १ विरुध्द किंवा भिन्न रूप , आकार , स्थितिवगैरे . २ प्रकृतीमध्यें पडलेला फरक . ३ एखाद्यासंबंधीं बदललेली वृत्ति , कल्पना वगैरे . ४ ( तत्त्व . ) देहात्म बुध्दि ; जीव व ब्रह्म यांमध्यें भेद आहे किंवा देह हाच आत्मा आहे अशा प्रकारची उलटी समजूत . 
 • ०भोग पु. पुरुषायित संभोग . विपरीत भोग करून मनोरथ कळेल तसा पुरवून । - प्रला ११७ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.