TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गोंधळ - सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मा...

भारुड - गोंधळ - सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - गोंधळ

सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो । ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो । चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो । घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥ १ ॥

उदो बोला उदो उदो सद्‌गुरु माउलीचा वो ॥ध्रु०॥

प्रवृत्ती निवृत्तीचें घालुनि शुद्धासन वो । ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो । कायावाचामनें एकविध अर्चन केलें वो । द्वैत अद्वैत भावें दिले आचमन वो ॥ २ ॥

भक्ति वैराग्य ज्ञान याहीं पुजियली अंबा वो । सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो । एका जनार्दनीं शरण मूळकदंबा वो । त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:51.9130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चकंदळा

  • पुन . १ वर्तुळाकार तुकडा , जागा . २ नायटा किंवा गजकर्ण किंवा इतर रोगाचा वाटोळा चकदा ; खवला ; स्फोट . ३ भिंतीवर ओल्यामुळें किंवा गिलावा पडल्यामुळें पडलेला डाग . ४ धान्य पेरलेल्या किंवा उभ्या शेतांत असलेली उघडी जागा , पीक न उगविलेली जागा . ५ कोणतीहि वाटोळी , उघडी जागा . ६ ( ल . ) हिशेबांत फट , भगदाड , अफरातफर ; हिशेबांत मोकळी जागा सोडणें ; किंवा लबाडी , गफलत करणें . ते रुपये खाऊन अगदीं चकंदळ केलें . ७ फन्ना ; फडशा ; ( खाद्यपदार्थाचा ) स्वच्छपणा . ८ लोकांचें कडे , समुदाय मंडळ . [ सं . चक्र + मंडल ] 
RANDOM WORD

Did you know?

कुंभमेळ्याबद्दल माहिती द्या? नजिकचा कुंभमेळा कोठे आहे ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.