TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
भटीण - मी भटीण आलें रे भटा । नको...

भारुड - भटीण - मी भटीण आलें रे भटा । नको...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - भटीण

मी भटीण आलें रे भटा । नको करूं रिकाम्या चेष्टा ।

काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करूं नको ॥ १ ॥

म्यां भटणीनें तुज पाळिलें । पाळिल्याचे बरेच उपकार फेडिले ।

माझें मज आणुन दिलें । त्यांत तुझें काय गेलें रे भटा ॥ २ ॥

मजपासूनि वेद कीं रे झाले । ते म्यां तुझ्या हातीं दिधले ।

शंकासुरानें चोरून नेले । माझ्याच भयानें ते परत आणिले रे भटा ॥ ३ ॥

त्याच्याच आधारानें मी बोलत आहें । काय रे मस्ती तुसीं आली आहे ।

मस्ती तुझी भटा ठाऊक आहे । आपले अंतरीं शोधुनी पाहे रे भटा ॥ ४ ॥

लहानाचा थोर तुला म्यां कीं रे केला । नव अवताराच्या हातीं मला ।

दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलया रे भटा ॥ ५ ॥

एका जनार्दनीं कारण । भटाचें हरपलें मीपण ।

उगाच गेला मौन धरून । चैतन्यरूप पाहिलें रे भटा ॥ ६ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:06.9130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गुरवाचें चित्त (लक्ष) नैवेद्यावर, वेड्‌याचे चित्त फोद्यावर

  • (अशिष्‍ट) वरीलप्रमाणेच. गुरवाचे लक्ष नेहमी देवापुढे ठेवल्‍या जाणार्‍या वस्‍तूंकडे असते. कारण त्‍या त्‍याला मिळावयाच्या असतात. तसे वेड्याचे लक्ष त्‍याला काही उद्योग नसल्‍याने वेडेपणाच्या गोष्‍टीवर असते. जो तो आपापल्‍यापरी आपल्‍या स्‍वार्थाकडे पाहतो. 
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.