मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ६९ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ६९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत देवहूतिकर्दमशान्ति प्राप्तिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद प्रल्हादासी सांगत । चिंतामणि माहात्म्य पुनीत । स्वायंभुव कर्दमास देत । आपुली कन्या देवहूती ॥१॥तिच्यापासून कपिल जन्मत । तो साक्षात् विष्णु अवतरत । कर्दमाच्या तपें प्रसन्नचित्त । तत्त्वज्ञान प्रकाशक ॥२॥त्या पुत्रासी पूजा करित । कर्दम महोत्सवांत । ब्रह्मादी देवगण येत । दर्शनार्थ तयाच्या ॥३॥त्या कपिलाची मुंज करित । देई तया यज्ञोपवीत । गायत्री मंत्र उपदेशित । सांग वेद अध्यापिले ॥४॥केवळ श्रवणमात्रें पाठ करित । कपिल झाला विद्यायुक्त । एकदां भक्तिसंयुत नमित । पत्नीसहित कर्दम तयासी ॥५॥म्हणे तयासी विनयान्वित । महाभागा तूं विष्णुदेव असत । तरी शुक्ल ज्ञान मजप्रत । सांग संसार तरावया ॥६॥ऐसें पित्याचें वचन । ऐकून सांगे गाणेशज्ञान । कपिल त्यासी विनीत वचन । म्हणे ताता ऐकावें ॥७॥मी तें महाज्ञान सांगेन । जें शांतिदायक पावन । मी अनुभविलें महान । सर्व मायामय जाणा ॥८॥पंचक पंचक असत । त्रिविध भ्रांतिरुप भेदयुक्त । भ्रान्तिधारक रुप चवथें असत । त्यांच्या अभेदें ब्रह्मज्ञान ॥९॥पृथ्वी जल तैसें तेज वर्तत । भ्रांतिदायक जगांत । वायू भ्रांतिधर असत । तुरीयात्मा त्यास म्हणती ॥१०॥त्यांच्या अभेदसंयोगें होत । आकाश ब्रह्म तें ख्यात । भूतांसी ज्ञानप्रद असत । तें स्वयं महाभूत नसे ॥११॥हें जैसें भूतपंचक । तैसेंचि जाणा अन्यपंचक । ब्रह्म मायामायिक । स्वानंद संज्ञित जें असे ॥१२॥कर्मेंद्रिय विकासक असत । ज्ञानेंद्रियेंही पांच जगतीं । पंच तन्मात्रांची ख्याती । ऐसें जाणा मुनिसत्तमा ॥१३॥पंच देव निज देहांत । कर्मेंद्रिय विकासक असत । ज्ञानेद्रियांचें अधिष्ठान होत । ऐसें ख्यात मानदा ॥१४॥स्थूल सूक्ष्मसम असत । चौथें आत्मप्रतीती देत । बिंदू पांचवा वर्तत । देहपंचक हें ख्यात ॥१५॥स्वर्ग मृत्यू पाताळ असत । चौथें ब्रह्मांड वर्तत । गुणेशवर्ण पांचवा प्रख्यात । ऐसें अंडपंचक वर्णिलें असे ॥१६॥ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । महामुने वर्णहीन तें पांचवें उग्र । ऐसे वर्णपंचक समग्र । योगीजन सांगती ॥१७॥ब्रह्मचारी तैसा गृहस्थ । तिसरा तो वानप्रस्थ । चवथा संन्याश्रमस्थ । पांचवा तो आश्रमहीन ॥१८॥ऐसें हें आश्रमपंचक । ऐका आतां योनिपंचक । अंडज स्वदेज उदभिज कित्येक । जारज मानस पांचवे ॥१९॥रक्त श्वेत श्याम नील । पिवळा हें रंगपंचक प्रबळ । देहांत देहरुप अभिमान सबळ । देहिपंचक तें जाणावें ॥२०॥शक्ति सूर्य ब्रह्मा असत । विष्णु रुद्रही प्रख्यात । गुणपंचक हयास म्हणत । भिन्नभावधर ताता ॥२१॥शक्ति सूर्य विष्णु असत । चौथा शिव असे ख्यात । गणेश पांचवा विप्र वदत । देवपंचायतन हें ऐसें ॥२२॥प्रकृति पुरुष स्वतः उत्थान संज्ञित । परतोत्थानरुप चौथें असत । त्यांचा संयोग पांचवा ख्यात । योगपंचक यांस म्हणती ॥२३॥असत् सत् आनंद उभयात्मक । अव्यक्त निजानंद नैज पंचक । देह देही बोध सांख्य चतुर्थक । स्वसंवेद्य पांचवें भवपंचक ॥२४॥प्रकृत्यालय विदेह भवप्रत्यय । उपाय प्रत्यय योग निर्भय । ऐसें हें योगपंचक ख्यात होय । ऐसी हीं पंचकें सर्व जाणा ॥२५॥सर्व पंचकांचें वर्णन । अशक्य तयांचें संकीर्तन । म्हणोनी मुख्यांचें विवरण । केलें मीं ताता तुम्हांपुढें ॥२६॥तेथ योगसेवेनें योगांत । महाशांतीचा लाभ होत । योगाहून परम अन्य नसत । वेदोक्त ब्रह्म निश्चित ॥२७॥सर्व ब्रह्म सुयोगाचा योग । न तेथ कोणत्या भावाचा संयोग । ब्रह्मदेव प्रजापतीचा संयोग । तेथ नसे कदापि ॥२८॥ऐसें जेव्हां पुत्र सांगत । तेव्हां त्यासी कर्दम प्रार्थित । कोणत्या उपायें शांतियोग लाभत । त्यास्तव कोणा पूजावें? ॥२९॥कपिल तेव्हां कर्दमा सांगत । शांतियोगप्रद प्रख्यात । गणेशभजन हाच उपाय वर्तत । ब्रह्मेश तो एकदन्त ॥३०॥योगाकारस्वरुपा त्यास भजावें । सर्वादीस मनोभावें । सर्वपूज्यासी । शरण जावें । सर्वाधार भक्तिभावें ॥३१॥जो आदि प्रलयांती असत । ज्येष्ठराज श्रुतिसंमत । गण समूहरुप वर्तत । त्यांचा स्वामी गणेशान ॥३२॥नाना जगतें त्याचें शरीर । नाना ब्रह्में त्याचें शिर । ज्यापासून हें संजात समग्र । ज्याच्यांत विलय अंतीं होतो ॥३३॥ऐसें तत्त्व गजशब्दें ज्ञात । हा भावार्थ असे वेदांत । गजशब्दें शिर होय ज्ञात । ऐसा हा ख्यात गजानन ॥३४॥त्रिविध भेदयुक्त खंडयुक्त । चवथें तें अखंडयुक्त । त्यांच्यायोगें गणेश ख्यात । देह मस्तक संयोगें ॥३५॥पंचविध चित्त असत । मोहही पंचधा जगांत । मोहरुपा महासिद्धि ख्यात । बुद्धि ती मोहधारिका ॥३६॥त्यांचा स्वामी गणाधीश । चित्तांत नित्य प्रतिष्ठित ईश । चिंतामणि महाभाग परमेश । लाभतो योगसेवेनें ॥३७॥पंचधा चित्ताचा त्याग करुन । तैसेंच पंचविध ऐश्वर्य त्यागून । योगशांतिमय पावन । ब्रह्मणस्पतीचा लाभ होतो ॥३८॥म्हणोनि एकाक्षरमंत्रें भजावें । त्यानें गणेशा तुष्ट करावें । तो शांतिप्रद योगाचें रुप आघवें । विशद करील उपासकांसी ॥३९॥ऐसें सांगून महायोगी थांबत । कपिल जो विष्णु साक्षात । प्रल्हादा महासाधो, जो अव्यक्तव्यक्त । कर्दममुनी वंदी त्यासी ॥४०॥तदनंतर कर्दममुनी आचरित । परम तपश्चयी वनांत । एकाक्षरमंत्र जपून अविरत । तोषविलें गजाननासी ॥४१॥तेव्हां भक्तवत्सल गजानन । शांतिमय आचरित । परम तपश्चर्या वनांत । एकाक्षरमंत्र जपून अविरत । तोषविलें गजाननासी ॥४२॥धरणीवरी संचार करित । लोकधारक महायोगी तो पुनीत । देवहूती जननीही साधित । गणेश योग तत्सान्निध्यें ॥४३॥गणेशास हृदयीं धारण करित । क्रमानें शांति झाली प्राप्त । तेव्हां त्याग करोनी चित्त । भरमवर्जित ती झाली ॥४४॥चिंतामणीशीं तदाकार होत । सिद्धिप्राप्त तिज पाहून कपिल जात । गंगेच्या दक्षिण तीराप्रत । तेथें भजे गणनायकासी ॥४५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते देवहूतिकर्दमशांतिप्राप्तिवर्णनं नामैकोनसप्ततितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP