मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४७ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत इंद्रतारकसमागमः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । तारक जेव्हां परतला । तेव्हां मदासुरा हर्ष जाहला । दैत्यांसहित त्या समयीं झाला । उत्सुक ऐकण्या शक्तिसंदेश ॥१॥तारकें मदासुरा प्रणाम करुन । वृत्तान्त सारा केला कथन । देवी असुर कुलदैवत असून । देवपक्षीं रत अमे ॥२॥तें ऐकून मद्यपी मदासुर । प्रतापी संतप्त अनिवार । देवांचें हनन करण्या आतुर । समुद्युक्त जाहला ॥३॥सुसज्ज दैत्यपतींसमवेत । महाकालासम मदासुर जात । शक्तिलोकीं सर्व सेनेसहित । शक्तिगणांते त्यानें मारिलें ॥४॥ते शक्तिगण छिन्न शरीर । स्वनगरांत धावले सत्वर । वृत्तान्त कथिती उद्वेगकर । दैत्यांच्या त्या स्वारीचा ॥५॥तें ऐकून शंकरादीसहित । महाशक्ति लढण्या जात । सवें सर्व महाबल सैन्य असत । संग्राममंडळी पातली ॥६॥सिंहारुढा चतुर्बाहुधरा । खड्गचर्मधरा धनुर्बाणधरा । नाना शक्ति समुदायधरा । क्रोधें ज्वलित अग्निसम ॥७॥तिच्या वामांगापासून । श्री झाली उत्पन्न । दक्षिणांगापासून । सावित्री निर्माण जाहली ॥८॥हृदयापासून संज्ञा जन्मत । त्याचें सैन्य पृथक असत । विष्णुशंकरादी देव वाहनीं स्थित । आपापल्या सेनेसह ॥९॥इत्यादि शक्तींनी युक्त । मोठें सैन्य देवसंयुत । परमदारुण ते पहात । दैत्येंद्र मुख्य त्या समयीं ॥१०॥दैत्यांनी तेव्हां शस्त्रोघ सोडिला । शक्ति सेनागण त्रस्त केला । महाघोर संतप्त हल्ला । असुरांनी तें चढविला ॥११॥शक्तीनें देव पाठविले । ते रणांगणीं शौर्य लढले । कलिकादी शक्तिसंघ झाले । अत्यंत क्रुद्ध त्या वेळीं ॥१२॥अकस्मात युद्ध रंगलें । देव दैत्यांचे सैन्य झुंजले । परस्परा मारण्या उत्सुक झाले । धूळ उसळली अपरिमित ॥१३॥सभोवार कांहीं दिसेना । सूर्याचा प्रकाश येईना । आपपरही समजेना । ऐसा आकांत माजला तें ॥१४॥घोडे खिंकाळती । रथचक्रें धडधडती । रणदुंदुभि वाजती । दिशा सार्या निनादल्या ॥१५॥शंखनादें सिंहनादें । रणांगण नाना नादें । निनादित होऊन उन्मादें । बधिरासम वीर युद्धांत ॥१६॥शस्त्रें अस्त्रें अनेक सोडिती । वृक्ष पर्वतखंडही फेकिती । युद्ध दुर्मद ते वीर करिती । परस्परांचा प्राणनाश ॥१७॥कोणी मेलें कोणी विद्ध झाले । रणांगणी मूर्च्छित पडले । कोणी शस्त्र विहीन बसले । शस्त्रधारी मारिती त्यां ॥१८॥शस्त्रें उभयतांची भंगती । तेव्हां ते मल्लयुद्ध खेळती । क्रोधें परस्परां आवळती । कित्येक झाले दिङ्गमूढ ॥१९॥तेथ धडे युद्ध करिती । हातात शस्त्रें फिरविती । आपुल्या परक्यासी मारिसी । स्वपरज्ञान वर्जित ॥२०॥बाणांनी बाण तोडिती । खड्गे खड्गांसी भिडती । गदा गदांवरी आपटती । उभय वीरांच्या त्या वेळीं ॥२१॥कोणी तोमर साहाय्यें लढती । कोणी परशू उगारिती । भिंदिपाल पाशांनी ओढिती । परस्परांसी जयोद्यत ॥२२॥रथारुढ गजारुढासह लढती । गजारुढ पायदळावरी हल्ला करिती । अश्वारुढांशी तैसे लढती । संभ्रम ऐसा बहु उपजे ॥२३॥देव दैत्यांचे युद्ध चालत । तुमुल ऐसे अत्यंत । उभयसेनेचा नाश होत । अवर्णनीय तें सारें ॥२४॥रक्ताच्या नद्या वाहती । धुळीने त्या माखती । तेव्हां प्रकाश उजळे नभप्रांती । प्रस्परज्ञान तेणें होय ॥२५॥जाणून दैत्य कोठें लपले । देवांनी तयांसी मारिलें । दैत्यांनीही सुरां वधिलें । क्रोधयुक्त मनें त्याचीं ॥२६॥शक्ति तेथ बहु कुपित । दैत्यांचा संहार करित । विविध शस्त्रास्त्रांनी लढत । चिरडून टाकिलें असुरेश्वरा ॥२७॥मेरुशीताचला समान । देव दैत्य अचल राहून । एक पदही मागे न जाऊन । परस्परांच्या वधोत्सुक ते ॥२८॥रक्तांच्या महानद्या वाहती । देव दैत्य कितेक मरती । त्या नद्यांतून तरंगती । प्रेते, असंख्य तयांची ॥२९॥चरबी मांसाचा चिखल होत । मांसखंड सर्वत्र दिसत । रणांगणीं रौद्र दृश्य दिसत । महामोह पसरला ॥३०॥रणांगणीं मृतगज पडत । रथ तैसे पशू अनंत । तेणें मार्ग होय खंडित । महाघोर दृश्य तें ॥३१॥एका क्षणीं भयभीत । देव पळून जाती त्वरित । दशदिशा ते पसरत । कोठें लपावे हया विचारें ॥३२॥तें पाहून आश्चर्य परम । देववीरांसह अनुपम । वज्रधारी इंद्र संग्राम । करुं लागला घनघोर ॥३३॥दैत्यांचा नाश करित । वज्राघातें चूर्ण करित । कितेक पडले मूर्च्छित । कितेक पडले मृत्युमुखीं ॥३४॥शक्ति आदि शस्त्रापातें मारित । अग्निचंद्रयमादी असुर संघात । सुरेश्वर ते क्रोधयुक्त । दैत्यांचें सैन्य संहारिती ॥३५॥असुरगण भयसंत्रस्त । धावूं लागले दशदिशांत । देवगण झाले हर्षयुक्त । जयजयकार करिती देवीवा ॥३६॥महामाया जयशक्तीस वंदिती । स्तुतिगीतें तिची गाती । तेव्हां तारक क्रोधें अती । शक्रासह लढण्या आला ॥३७॥रणभूमींत येऊन म्हणत । पुरंदरासी गर्वयुक्त । महीग्रासी तो मोहित । मदसंयुत होऊनीया ॥३८॥अरे देवेंद्रा तूं काय लढशील । माझ्या एक बाणें विद्ध होशील । त्याची सरही तुज न येइल । सुराधिप सुरांसहित ॥३९॥जरी बळवंत तूं असत । तरी अमरावती कां केली त्यक्त । सांग उत्तरासी त्वरित । अन्यथा वृथा मरशील ॥४०॥ऐसें त्याचें उद्धत वचन । ऐकोनि इंद्र क्रोधायमान । भक्षूं पाहे आरक्त नयन । दानवगणासी त्या वेळीं ॥४१॥म्हणे तारका वल्गना करिसी । आपुल्या बळाते स्तविसी । तरी आतां माझ्या पौरुषासी । पाहावें तूं रणांगणीं ॥४२॥तुझें सैन्य संहारीन । नंतर मदोद्धता तुज वधीन । शक्तीला करुन अभिवादन । अमरावतीस जाईन मी ॥४३॥प्रथम होतो शक्तिविहीन । म्हणोनी पराक्रमाचे अदर्शन । आता शक्तियुक्त करीन कंदन । तुझें सर्व असुरांसह ॥४४॥दैत्येंद्रा बहुत कां बोलावें । आपुल्या पराक्रमा तूं दाखवावें । नाहींतरी पाताळात जावें । मिथ्या वल्गना कां करिशी? ॥४५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे खण्डे एकद्ण्तचरिते इंद्रतारकासमागमी नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP