मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ३९ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ३९ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत च्यवनोत्पत्तिकथनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल सांगती तदनंतर । प्रल्हाद होता दैत्यनृपावर । वैष्णव परम भक्तवर । वैर सोडिलें तें देवांनी ॥१॥देव समान त्याचा करित । एकदा विघाता त्याच्या घरीं जात । परी दुष्ट महादैत्य करित । प्रल्हादासी त्या वेळीं ॥२॥संसर्गदोषें युक्त होत । पितामहा ना ओळखित । तेव्हां विधाता शाप देत । क्रोधसंतप्त होऊन ॥३॥अरे वैष्णवाधमा तुझें ज्ञान । नष्ट होईल आजपासून । प्रभाव तुझा निष्फळ होऊन । जगीं दुःख पावशील ॥४॥ऐसा प्रल्हादास शाप देऊन । ब्रह्मदेव गेले परतून । तिकडे प्रल्हाद करी हनन । देवांचें बहु त्वेषानें ॥५॥तो विष्णूसी न मानत । शंभूची पर्वा त्यास नसत । अमरनायकासी तुच्छ गणित । जिंकिलें सर्व देवांसी ॥६॥असुराधिप प्रल्हाद करित । त्रिभुवनीं राज्य तो बलवंत । तेव्हां मित्रभाव जोडित । देवगण त्याच्याशी ॥७॥त्याची दुष्टता सहन करिती । देव चातुर्य लढविती । विष्णुसहायें देव जिंकती । कालप्रभावें अन्य दैत्यांसी ॥८॥परी प्रल्हादासी रक्षून । स्वराज्यीं त्यास स्थापून । करिती त्याचा सन्मान । एकदा तेथे ये गृत्समद ॥९॥महामुनी जगांत हिंडत । प्रल्हादास भेटण्या येत । त्यास पाहून प्रणाम करित । महायश तो असुर राजा ॥१०॥आपुल्या आसनी त्यास बैसवित । भव भक्तीनें त्यास पूजित । मुनिवरांचे पाद संवाहन करित । बोले प्रल्हाद मधुर वचनें ॥११॥धन्य माझें कुल धन्य ज्ञान । धन्य विद्या तैसेंचि ज्ञान । तुमचे चरणयुगुल पाहून । पवित्र आज जाहलों ॥१२॥योगींद्रा मुख्या तुझे दर्शन । निःसंशय ऐसें शोभून । असुरसंगें दुष्ट कर्म करुन । शापभ्रष्ट मी जाहलों ॥१३॥स्त्री मद्य मांसादींत रत । ज्ञानहीन निरंतर असत । द्वेषानें देवासी मारण्या इच्छित । ऐसा पापी मी असे ॥१४॥सांप्रत आपुल्या पादपद्माचें दर्शन । महामुने मजसी होऊन । ज्ञान स्फुरलें पावन । यांत संशय कांहीं नसे ॥१५॥माझ्या पूर्व पुण्याचें फळ निश्चित । म्हणोनि आपुलें दर्शन होत । आसुरी प्रकृति नष्ट होत । आतां ज्ञान मज सांगावें ॥१६॥माहयोगिराजा मज तारावें । भवसागरांतून पार न्यावें । शिष्य म्हणोनि स्वीकारावें । शरण तुज मीं जगत्गुरो ॥१७॥मुद्गल म्हणती दक्षास । ऐकूनि प्रल्हादाच्या विनंतीस । गृत्समद म्हणे तयास । परम कृपावंत होऊनी ॥१८॥प्रल्हादा ऐक तुज सांगेन । शांति सुखप्रद ज्ञान । गणनाथाचें करितां भजन । विघ्नहीन तू होशील ॥१९॥मदासुर तो तुझ्या हृदयांत । प्रतापी दैत्येश निवसत । आसुर स्वभावें खंडन करित । सत्य ज्ञानाचें तुझ्या ॥२०॥म्हणोनि एकदंताचें करी भजन । तो करील मदासुराचें हनन । तुझ्या हृदयांत दृढ ज्ञान । तोचि प्रतिष्ठित करील ॥२१॥त्याचें तें वचन ऐकून । प्रल्हाद विचारी प्रसन्न मन । कोण हा मदासुर हृदयीं राहून । पापकर्म घडवित असे ॥२२॥एकदंताचें भजन करावें । कैसें तें मज सांगावें । मदासुरासी त्या देवें । पूर्वी कैसें मारिलें होतें ॥२३॥हें सर्व विस्तारपूर्वक सांगावें । मज शिष्यातें रक्षावें । माझें ज्ञान दृढ व्हावें । ऐसा उपदेश करावा ॥२४॥प्रल्हादाचें वचन ऐकून । गृत्समद सांगती मुदितमान । एकदंताचें चरित्र पावन । मदासुर विजया संबंधी ॥२५॥एकदंताचें हें चरित्र । सर्व सिद्दिप्रद पवित्र । प्रल्हादा ऐकता सर्वत्र । सौख्यलाभ होत असे ॥२६॥एके दिवशीं भृगूंच्या आश्रमांत । राक्षस एक प्रवेश करित । समिधा आणण्या वनांत । जेव्हां भृगुमुनी गेले होते ॥२७॥महाखल छिद्रदर्शी राक्षसा दिसत । भृगुपत्नी सुलोमा एकटी आश्रमात । तेव्हां तो तिज म्हणत । सांग मजसी सांप्रत ॥२८॥तुझा पिता होता संमत । मला तुझा दान देणयस इष्ट । परी भृगु ऋषि याचना करित । मध्यंतरी तुझ्या कराची ॥२९॥तेव्हां मजसी सोडून । भृगुसी कन्या देऊन । नृपानें केला अपमान । म्हणोनि तुझें हरण करीन ॥३०॥त्याचें क्रूर वचन ऐकत । तरी सुलोमा कांहीं न बोलत । तेव्हां राक्षस आश्रमाग्नीस म्हणत । महाभागा, सांग तूं ॥३१॥तूं साक्षी सर्वसंमत । ही माझी वा भृगूची पत्नी असत । तें ऐकून कांहीं न बोलत । शाप भयें हव्यवाहन ॥३२॥राक्षस पुन्हां विचारित । तरी अग्नि शांत राहत । राक्षस पुनरपि भय दावित । तेव्हां अग्नि बोलतसे ॥३३॥जो नर सत्य न जाणत । तो जगतीं संशयी पडत । विचारी जरी तो जाणत्याप्रत । सत्य न सांगणें पाप त्यासी ॥३४॥म्हणोनि मी तुज सत्य सांगेन । संशयातीत माझें वचन । मी सांगितलें होत निक्षून । सुलोमेच्या पित्यासी ॥३५॥राजा राक्षसास वचन देऊन । आता त्यासी फसवून । नरासी कन्या अर्पिसी म्हणून । दोष तुज लागेल ॥३६॥एकदा कन्यादान निश्चय केला । तरी पाहिजे तो टिकविला । जयासी प्रथम वचन दिलें त्याला । कन्या दिली पाहिजे ॥३७॥आशाभंगाचें पाप घडत । म्हणोनि सुलोमेचा पिता दोषयुक्त । राक्षसा तुजा अधिकार असत । शास्त्राधारें मज वाटे ॥३८॥परी ही स्त्री विवाहित । भृगूची भार्या आत असत । म्हणोनि परस्त्रीचा लोभ चित्तांत । राक्षसा तूम धरुं नका ॥३९॥अग्नीचें वचन ऐकत । परी राक्षस दुराग्रह धरित । बलात्कारें पकडून नेत । सुलोमेस त्या वेळी ॥४०॥तेव्हां ती गर्भवती होत दुःखित । भयविव्हल आक्रंदत । त्या आघातें होत मूर्च्छित । भृगु पत्नी सुलोमा ॥४१॥तिच्या उदरांतून स्वयं जन्मत । भृगुतेजधारी बलवंत सुत । होऊनि अत्यंत क्रोधयुक्त । राक्षसा मारण्या धावला ॥४२॥त्याच्या क्रोधाग्नीनें अधर्मरत । राक्षस झाला भस्मसात । राक्षस मरतां घेउनी स्वसुत । स्वगृहीं । ती परतली ॥४३॥वनांतून भृगु परतत । दुःखित सुलोमेसी पाहत भयविव्हल जी रुदन करीत । आपुल्या पतीसमोर ॥४४॥रडत सांगें वृत्तांत । तो ऐकून योगी कुपित । रुद्राचा अवतार भासत । खदिरांगारासम नयन त्याचे ॥४५॥म्हणे अग्निदेवा तुज मीं शाप देत । सर्व भक्षक होशील जगांत । दुष्ट कर्म परायण अपुनीत । अज्ञानी तूं होशील ॥४६॥अग्नीस ऐसा शाप देत । सुलोमेचें सांत्वन करित । म्हणे घन्य हा माझा सुत । प्रशंसापात्र कर्म केलें ॥४७॥मातेच्या उदरांतून झाला च्युत । म्हणोनि च्यवन नामे होईल ख्यात । मातृपालक हा माझा सुत । जगीं श्रेष्ठत्व पावेल ॥४८॥आपुल्या पत्नी पुत्रासहित । आनंदें कालक्रमणा नंतर करित । गणपतीस सदैव स्मरत । भृगुयोगी सर्वदा ॥४९॥ओमिति श्रीदमान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते च्यवनोत्पत्तिकथनं नामैकोनचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP