मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४६ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत तारकासुरसामवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । कैलासांत मदासुर राहत । कांही समय भोत भोगित । परम दुर्लभ जे असत । दैत्यवीरांसमवेत ॥१॥तदनंतर त्रिपुरासुरादी मदयुक्त । देवांच्या नाशार्थ उद्युक्त । म्हणती मदासुरासी वचन हित । महाभागा आमुचें ऐका ॥२॥शंभुमुख्य सर्व देव गेले । शक्तिलोकी सुखें राहिले । शक्तीनें त्या विशेष मानिलें । भयहीन ते सर्वही ॥३॥देव आपुले शत्रू असती । दैत्यांच्या हननीं निश्चितमती । त्याचें बळ वाढून होती । शक्तिलोकीं ते समर्थ ॥४॥हिरण्याक्षादी सर्व मारिले । छिद्र पाहून देवांनी भले । आपुले प्रख्यात वैरी झाले । देव सारे हे सर्व जाणती ॥५॥आमुची शक्ति पक्षपाती । तीही देवांची हितकर्ती । म्हणोनी शक्तिलोकीं झटिती । चाल करावी निःसंशय ॥६॥तेथ जाऊन अमर सर्व । ठार मारुंया जे करिती गर्व । दैत्यांचे वचन ऐकून मदासुर । म्हणे विनयपूर्वक ॥७॥त्रिपुरादींनो ऐका हित । शक्तिप्रसाद संभूत । माझें सफल ऐश्वर्य असत । इष्ट देवी पूजनीय ती ॥८॥तिचें भजन मी करित । विशेष भक्तिभावें जगांत । म्हणोनि तिचें करावें हित । सकलांनी तुम्ही सर्वदा ॥९॥देव तीस शरण गेले । हें जरी सर्व सत्य असलें । माझ्या दासभावें झालें । आदरें शक्तिचित्त यंत्रित ॥१०॥म्हणोनी देवपक्षपात । करोनी न आली त्वरित । आमुचा वध करण्या उद्युक्त । महामाया हें जाणावें ॥११॥जे तिच्या भजनीं आसक्त । ते मज माननीय वाटत । तिच्यासवें वैरभाव जगतांत । करुं नका असुरहो ॥१२॥मदासुराचें वचन ऐकून । दैत्यप म्हणती क्रुद्ध होऊन । मदोत्सिक्त उन्मन । देवांच्या वधास उत्सुक ॥१३॥दैत्येश म्हणती आठवावें । मागील वृत्त जें जाहलें । हिरण्यकशिपूचे आघवें । ज्यास मिळाला ब्रह्मवर ॥१४॥अनेक दैत्येश देवशत्रू झाले । देवपक्ष सोडून गेले । आपल्या धर्मीं रत झाले । ऐसी साक्ष इतिहासीं ॥१५॥कश्यपाचे दोन सुत । देवांचा पक्ष सोडित । देवसंहारांत रमत । तैसेचि आपण करावें ॥१६॥देवांचे मूळ उपटावें । वेदांतही वैर स्वभावें । सुरासुरांचे पहावें । कथिलें असे सर्वत्र ॥१७॥आपण सारे भक्तियुक्त । जाऊंया शक्तिलोकांत । शक्तीच्या सान्निध्यांत । देवांचें निदलिन करुंया ॥१८॥महामाया शक्ति घेईल । जरी आमुचा पक्ष सबळ । ती पूजनीय आम्हां होईल । कुलदेवता दैत्यांची ॥१९॥अन्यथा युद्ध करुं निश्चित । त्या शक्तीसमवेत । शत्रुपक्षाश्रित जरी होत । तरी त्यांत दोष नसे ॥२०॥दैत्येशांचें तें वचन । मदासुरा मान्य होऊन । तात्काल करी निर्गमन । शक्तिलोकीं मदासुर ॥२१॥शक्तीकडे दूत पाठवित । तारक नामक दुर्मति त्वरित । म्हणे महाबळा जाई देवीप्रत । सामवचन प्रथम करी ॥२२॥महामायेसी संदेश देत । प्रणाम करुन दूत निघत । तारक शक्तिसान्निध्यांत । जातां देवें सन्मानिला ॥२३॥महामायेस नमन करुन । त्या शक्तीपुढती हात जोडून । तारक तिजला म्हणे वचन । सामयुक्त त्या वेळीं ॥२४॥ऐक शक्ते महामाये आला । मदासुर तुझ्या दर्शनाला । माते त्यानें पाठविला । दूत म्हणोनी मजला येथ ॥२५॥मानदे शक्ती त्याचें वचन । जगदंबिके भावज्ञे घे ऐकून । भक्तिसंयुक्त जें केलें कथन । त्वदीय भक्तें विनमर भावें ॥२६॥तूं आमची कुलदेवी असत । यात संशय अल्पही नसत । आम्ही सारे असुर विनत । तुझे सेवक या जगीं ॥२७॥जेथ असुर विराजत । तेथ सुर हतप्रभ होत । हयांत संदेह कांहीं नसत । स्वभावें शत्रू उभय असती ॥२८॥म्हणोनी देवांचा त्याग करुन । असुरांचा घे सन्मान । आमुचे शत्रू ते मानून । शत्रू आपुलें तूं देवी ॥२९॥आम्हीं तुज करु वंदन । देवांचे करु हनन । त्यांसी त्वरित सोडून । आमुचा पक्ष भूषवावा ॥३०॥एका पक्षाचा आश्रय घ्यावा । जगदंबिके मथितार्थ जाणावा । असुरांचा वा सुरांचा स्वीकारावा । भक्तिभाव एकमेव ॥३१॥ऐसें हें कथिलें मदासुर वचन । करी तूं भक्त राजाचें पालन । गृत्समद सांगे पुढिल वृत्त प्रसन्न । क्रोध संतप्त देवी तें ॥३२॥मदाचें क्रूरवचन । तारकें केलें जें कथन । तें ऐकून कोपे तत्क्षण । महासुरा त्या सांगत ॥३३॥माझे नांव जगदंबा ख्यात । वेदांनी केलें प्रकाशित । तरी मी एक पक्षाचा आश्रय घेत । हें कैसे संभावेलं ॥३४॥जैसे देव तैसे असुर असत । मान्य मजला जगतांत । देव दैत्यें स्वधर्मरत । वर्तावें सर्वदा महासुरा ॥३५॥दैत्यांनी आनंदे पाताळांत । राज्य करावें देवांनी स्वर्गांत । याच्या विपरीत जे आचरित । त्यांसी संक्रुद्ध मीं ठार करीन ॥३६॥म्हणून माझ्या आज्ञेनें जावें । पाताळ लोकांत राज्य करावें । असुरांचे यात हित व्हावे । ऐसी माझी आज्ञा असे ॥३७॥शक्तीचें हें वचन ऐकत । महासुर तारक भय रहित । तेव्हां बोले संतप्त । शक्ती गर्व तूं करुं नको ॥३८॥आमुच्या तपें उत्कृष्टत्व पावलों । मनीं हें निश्चित उमजलों । शत्रुपक्षाश्रिते झालों । सावध आम्हीं असुर आतां ॥३९॥जगदंबिके तूं जगें निर्मित । कर्माधीन ही कृति असत । जैसें कर्म तैसें फळ लाभत । तूं तेथ काय करणार? ॥४०॥स्वकर्में प्रतापी मदासुर । दैत्यराज झाला थोर । ब्रह्मांडाचा अधिपति समग्र । देवांचें तो हनन करील ॥४१॥युद्धास सज्ज हो देवी त्वरित । सर्व देवांसमवेत । जगन्मये मी असुरांसहित । परततों मी मदसंनिध ॥४२॥ऐसें बोलून क्रोधसंयुत । महाशक्तीसी, परत जात । शक्तिलोकांतून तो उद्धत । तारक मदासुराजवळी ॥४३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमनौद्गल महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते तारकासुरसामवर्णनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP