मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ५२ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ५२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत एकदन्तप्रसन्नभावः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । ऐसी दीनवाणी प्रार्थना ऐकत । तेव्हां सनत्कुमार सांगत । आनंददायक वृत्तान्त । देवांप्रती त्या समयीं ॥१॥मदासुर विनाशाचा उपाय सांगत । ऐका सुरेश्वरांनो एकचित्त । गणेशा पूजावें भक्तियुक्त । विनयार्द्रचित्तें समस्तांनी ॥२॥तो मदासुराचें करील हनन । ऐसें सनत्कुमाराचें वचन । ऐकतां हर्षोत्फुल्ल मन । जाहलें देवर्षिसत्तमांचें ॥३॥त्यास प्रणाम करुन । भक्तीनें मान लववून । देवर्षी म्हणती पूजन । कैसें करावें गणेशाचें ॥४॥त्याचा उपाय सांगावा । आम्हांसी आपण धीर द्यावा । यथातथ्य तो कथन करावा । पूजाविधि सत्वर ॥५॥ऐसें महायोग्यासी विचारिती । देवगण मुनिगण उभय प्रार्थिती । तेव्हां आराधनेची रीती । गाण पत्य तो सांगत ॥६॥महायश तो कथित । एकाक्षर मंत्रें पूजावें यथायुक्त । गणनायक जो हृदयीं निवसत । तेणें संतुष्ट तो होय ॥७॥त्याचें ध्यान कैसें करावे । तें आता ऐकावं बरवें । तैसें करुन तोषवावें । श्रीगजाननासी सर्वांनीं ॥८॥एकदंत चतुर्बाहुधर । गजवक्त्र महोदर । सिद्धिबुद्धियुक्त देववर । मूषकारुढ मनोहर ॥९॥ज्याच्या नाभीवरी शेष असत । परशुकमल अभय करांत । प्रसन्नवदनांबुज भक्तांप्रत । नित्य वरप्रद जगतांत ॥१०॥अभक्तांचा संहार करित । ऐसा जो प्रभू मूर्तोमंत । त्यासी ध्यावें हृदयांत । सेवा करा एकदंताची ॥११॥सर्वांच्या हृदयीं हा निवसत । बुद्धिप्रेरक तो असत । स्वयं बुद्धिपती साक्षात । साक्षात् आत्मा प्राणिमात्रांचा ॥१२॥‘एक’ हया शब्दानें माया ज्ञात । देहरुपा जी विलसत । सत्तात्मक ‘दंत’ शब्द उक्त । यात संशय कांहीं नसे ॥१३॥मायेचा हा धारक संस्थित । सत्तामात्र एकदंत । गणेशान म्हणती वेदपंडित । सर्व सत्ताधरी जी ॥१४॥परिपूर्ण गजानन एकदंत । त्याची सेवा भक्तिभावयुत । करितां होईल सुख प्राप्त । जय हेरंब एकदन्त ॥१५॥ऐसें बोलून सनत्कुमार । हेरंबमंत्रांचा करी उच्चार । देवगण दीक्षा घेऊन घोर । तप करण्या सिद्ध झाले ॥१६॥एकाक्षर विधानें तोषविती । एकदंप्ताचा मंत्र जपती । पत्र भक्षण वा वायुभक्षण करिती । जळ पिऊनही राहती ॥१७॥कधी राहती निराहार । कधी घेती कंदमूल फलाहार । कधी जपहोमपर । नाना तपें आचरती ॥१८॥गणनायका उपासिती । ऐसी शंभर वर्षे जाती । तेव्हां गजानन प्रसन्नमती । प्रकटले वर द्यावया ॥१९॥गजानन देवमुनींसी म्हणत । वर मागा मीं तुष्ट असत । त्याचें वचन ऐकून हर्षित । देव ऋषि सर्व झाले ॥२०॥जे होते धानस्थित । त्यांनी उघडिले नयन त्वरित । तेव्हां आपुल्य पुढयांत । पाहती ते गजाननासी ॥२१॥मूषकवाहना त्यास पाहून । त्यांनी केलें विनम्र वंदन । भक्तिभावें केलें पूजन । देव देवेंद्र मुनींनी ॥२२॥यथाविधि पूजा करुन । आपुले दोन्हीं कर जोडून । एकदंताचें करिती स्तवन । भक्तिनमर प्रेमानें ॥२३॥गजवक्त्रासी गणेशासी । अनंत आनंद भोक्त्यासी । ब्रह्मासी ब्रह्मरुपासी । आदिमध्यांतहीना नमन ॥२४॥चराचरमयासी । अनंत उदरसंस्थासी । शेष ज्याचें नाभिभूषण त्यासी । नमो नमः अत्यादरें ॥२५॥कर्त्यांस संरक्षकास संहर्त्यास । त्रिगुणांच्या अधीश्वरास । सर्वसत्ताधारास निर्गुणास । सिद्धिबुद्धीपतीला नमन ॥२६॥सिद्धिबुद्धिप्रदासी । ब्रह्मभूतासी देवेशासी । सगुणासी परशुधरासी । कमलालंकारासी नमन ॥२७॥पाश अभय धरासी । महोदरासी मूषकारुढ देवासी । मूषकध्वजासी आदिपूज्यासी । सर्वपूज्यासी नमो नमः ॥२८॥सर्वांसी गुणसंयुक्त कायासी । निर्गुणात्मक मस्तकासी । त्यांच्या अभेदरुपासी । एकदंता तुला नमन ॥२९॥वेदांतगोचरासी योगाधीशासी । वेदांतें लभ्यकायासी । ब्रह्माधीशासी नानावतारभेदासी । शांतिदासी नमो नमः ॥३०॥अपार गुणधारासी । अनंतमाया प्रचालकासी । नमो नमः गजाननासी । गणनायका तुज नमन ॥३१॥धन्य आम्हीं धन्य समस्त । ज्यांनी पाहिला एकदन्त । ब्रह्मभूयमय साक्षात । प्रत्यक्ष आमुच्या पुढयांत ॥३२॥ऐसी स्तुति हर्षयुत । करुन नाचती भक्तियुक्त । त्यांच्या नेत्रांतून ओघळत । आनंदाश्रू त्या वेळीं ॥३३॥अंगावरीं रोमांच फुलत । त्यांसी ढुंढी तेव्हां म्हणत । एकदंत प्रेमयुक्त । वर मागा देवेशांनो ॥३४॥मुनीशांनो यथा ईप्सित । सांगा सारे भयमुक्त । दुर्लभ असलें तरी समस्त । देईन तुमचे मनोवांछित ॥३५॥तुम्हीं रचिलेलें स्तोत्र असत । मजला प्रिय सदा जगतांत । तें ऐकता वाचिता निश्चित । सर्व इच्छा पुरतील ॥३६॥नानासिद्धिप्रद हें होईल । शत्रूंचा विनाश करील । स्वानंद प्रदायक देईल । पुत्रपौत्रादिक सर्व कांहीं ॥३७॥गृत्समद कथा पुढे सांगत । सुरषीं हें ऐकून प्रमुदित । विनम्रभावें प्रणाम करित । भक्तिभावपूर्ण म्हणती ॥३८॥जरी संतुष्ट झालासी । सर्वेशा एकदंता आम्हांसी । महाप्रभो तरी महासुरासी । दुष्टासी आपण मारावें ॥३९॥स्थानभ्ररष्ट देवेश झाले । मुनीश्वर कर्मभरष्टता पावले । जगन्नाथा म्हणून विनविलें । ठार करी त्या असुरासी ॥४०॥तुझी अचल भक्ति लाभावी । मानदा जेणें खंडित व्हावी । संसारमाया आघवी । ऐसी प्रार्थना पुरवावी ॥४१॥ऐसें देवमुनि वचन । ऐकून ‘तथास्तु’ म्हणे गजानन । नंतर पावला अंतर्धान । प्रतापवंत एकदंत ॥४२॥महर्षि नंतर स्थापना करिती । महाभाग ते क्षेत्रीं पूजिती । विघ्नप गजाननाची मूर्ति । आग्नेय दिशेला विख्यात ॥४३॥एकदंताचें तें क्षेत्र होत । सर्वसिद्धिदायक पुनीत । तेथेच देवदेवेंद्र मुनी संस्थित । सेवा करण्या पूर्ण भावें ॥४४॥आपुल्या अधिकारें कलांशांत । त्या वैघ्नप क्षेत्रात । त्या विघ्नप मूर्तीच्या दर्शनें लाभत । प्राणिमात्र मनोवांचित ॥४५॥त्या क्षेत्रीं मरण उत्तम । प्रल्हादा मानिती निर्मम । महिमा वर्णनातीत मनोरम । अशक्य असे वर्णावया ॥४६॥वर्षकोटी शत वर्णन केलें । तरी ते अपूर्ण होणार असले । म्हणोनी सार हें सांगितलें । प्रल्हादा मीं तुजलागीं ॥४७॥तेथ विशेष सिद्धि लाभून । देवर्षि अमल होऊन । कृतकृत्यता पावून । विजयी अन्तीं ते झाले ॥४८॥धन्य जन्म मानवांचा वाटत । ज्यांनी पाहिला एकदंत । जन्ममृत्यूभय नष्ट होत । ईप्सित अर्थलाभ कृपाप्रसादें ॥४९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते एकदंतप्रसन्नप्रभावो नाम द्विपंचाशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP