मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ६१ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ६१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत भ्रूशुण्डीचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । भरुशुंडी नित्य पूजा करित । बाह्य तैसी मानसी पूजा अविरत । गणेशाची यथाविधी ॥१॥तूं जी मानसी पूजा विचारिली । ती आता सांगतों भली । ती करिता स्वल्पकाळी । गाणपत्य नर होईल ॥२॥असुरोत्तमा प्रल्हादा जगांत । चतुर्धा मानस पूजा ज्ञात । साधारा द्विविधा असत । निराधाराही द्विविधा ॥३॥मूर्ती गणेशाची हृदयांत । ध्याऊन उपचार सर्व अर्पित । मनानें देवासी पूजित । जाणावी पूजा तो साधारा ॥४॥अन्या एकाग्रचित्तें ठेवित । सर्वत्र एकात्म भावना सतत । त्यायोगें भोगादी पूजन करित । ती जाण दुसरी साधार पूजा ॥५॥एकात्म स्वरुपाचा आधार । लाभता ती पूजा साधार । सर्वात्म वर्जित निरोधकर । चित्तवृत्तीचा जयांत ॥६॥मनोवाणीमय सर्व अर्पित । उपचार तेंच पूजन असत । प्रल्हादा पूजा ती निश्चित्त । निराधारा गणेशाची ॥७॥चित्ताच्या पाचभूमींचा लय । करोनि समा स्थितीचा उदय । तेथ शांतिस्वरुप अभय । योगाकारें दिसत असे ॥८॥योगांत विधिनिशेधादि समर्पित । उपचार तेच गणेशपूजेंत । शांतियोगें निराधारा म्हणत । योगीजन ह्या पूजेस ॥९॥ऐसे चतुर्धा मानस पूजन । प्रल्हादा केलें भरुशुंडीने पावन । काशींत पावलें तें तत्क्षण । विनायकासी भक्तिभावें ॥१०॥हें भरुशुंडीचें चरित्र वाचित । जो नरोत्तम अथवा ऐकत । दुसर्यांसी वा ऐकवित । त्यास स्वानंदलोक लाभे ॥११॥जें जें तो वांच्छित । तें तें सर्व त्यास प्राप्त । महापुण्यकारक पुनीत । सांगितलें तुज हें कथानक ॥१२॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भरुशुंडिचरित नामैकषष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP