मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४३ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत च्यवनमाहात्म्यम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढे सांगत । भृगूचें वचन ऐकून होत । च्यवन ते अति लज्जित । प्रणाम करी भक्तीनें ॥१॥ओंजळ करांची जोडून । च्यवन म्हणे विनीतवचन । क्षमा करा केलें सर्जन । मदासुराचें अज्ञानाने ॥२॥अश्विन होते सोमभागहीन । तयांसी केलें भाग संपन्न । आता गणानाथाचें ज्ञान । सांगा मजला जें शांतिप्रद ॥३॥मदादिक तेणें सोडून । शांत मनीं मी होईन । त्याचे हें वचन ऐकून । भृगू त्यासी सांगतसे ॥४॥गणेश नामक योग सांगत । गणेश ब्रह्मरुप हा असत । पूर्ण शांतिमय ख्यात । भेदाभेदयोग लाभे ॥५॥मायामय हें सर्व असत । भेदाभेदमय जगांत । गणेश्वरत्वें जेव्हा त्यागित । तेव्हां चित्त कैसें संभवेल ॥६॥पाच चित्तवृत्तींचा नाश होत । यात संदेह नसत । योगशांतिमय पुनीत । म्हणोनी गणराजा त्या भजावें ॥७॥योगाच्या सेवनें भजत । माझ्या उपदेशासी अनुसरित । विधान सर्वही आचरितां । शांतियुक्त नर होय ॥८॥ऐसें सांगून थांबत । भृगु शांतिसमन्वित । त्यास प्रणाम करुन जात । च्यवन परम आदरें ॥९॥वनीं जाऊन तप करित । योगप्रदायक उदात्त । चित्तभूमींची शुद्धि साधित । क्रमानें तो तपोबळें ॥१०॥शम तैसाचि दम सेवित । भूमिनाशनें सर्व प्राप्त । सुलभ ब्रह्मविचारें होत । शांतियोग तो आचरी ॥११॥तेणें तदाकार राहत । गणेशाचे नित्य भजत । गाणपत्य स्वभावें होत । गणेश तेव्हां प्रसन्न झाला ॥१२॥त्यासी दर्शन देण्या जात । मूषकावरी तो बसत । चतुर्बाहुधर महोदर दिसत । गजानन तो प्रतापी ॥१३॥त्यास पाहून दंडवत । च्यवन मुनी प्रणाम करित । विधिपूर्वक पूजित । नंतर स्तुतिस्तोत्र गाई ॥१४॥हेरंब उपनिषदें स्तवित । गणनायक प्रसन्न होत । उत्तम वर त्यास देत । म्हणे विप्रेंद्रा ऐक तूं ॥१५॥जें जें मनी इच्छिसील । तें तें सर्व लाभशील । योगशांति त्वभावें अमल । मानदा सदा राहशील ॥१६॥माझ्या चरणीं दृढ भक्ति । जडून तुज सुखप्राप्ति । स्मरशील तेव्हां तुज पुढती । प्रकटेन मी सत्वर ॥१७॥ऐसें बोलून अंतर्धान । पावला प्रभु गजानन । च्यवनें केली स्थापन । चतुर्भुजा गणेशमूर्ति ॥१८॥त्या दिवसापासून राहत । च्यवनाश्रमीं गणेश सतत । त्याच्या दर्शने स्मरणें लाभत । तत्काळ भुक्ति तैशी मुक्ती ॥१९॥हे सर्व तुज पुण्य आख्यान । च्यवनाचें सांगितले महान । जें सर्व दोषाचें करी हनन । नाना सिद्धिफळप्रद ॥२०॥ओमिति श्रीमदान्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते च्यवनमाहात्म्यं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP