मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४५ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मदासुरस्वर्गविजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद सांगे कथा पुढती । दैत्येंद्र मदासुरा स्फूर्ति देती । त्रैलोक्य विजया उद्युक्त करिती । मदासुरा तें मान्य झालें ॥१॥शुक्राचार्यास भेटून । त्यास विनमरभावें करी नमन । त्याचें लाभून मार्गदर्शन । त्रैलोक्य जिंकण्या निघाला ॥२॥नाना दिशांतून असुर येती । तैसेंचि दैत्य दुष्टमती । राक्षस युद्धोत्सुक होती । मदोन्मत्त ते मदानुचर ॥३॥चतुरंग बळयुक्त । असंख्यात सेनेसहित । ऐशा मदासुरा भाट स्तवित । दिग्विजयार्थ निघाला तें ॥४॥यमासीही भयदायक । मेरुमंदारसम निःशंक । महाघोर जे नायक । दैत्य ऐसे पुढे जाती ॥५॥नाना शस्त्रादींनी युक्त । कवचादींनी समावृत । नाना वाहनांतून जात । वसुंधरेसी कांपविती ॥६॥कोणीं पाषाण करी घेती । कोणी वृक्ष उपटिती । कोणी पर्वत धरिती । हातांत महा बळशाली ॥७॥नाना भयंकर आकार । ऐसे सर्वबाजूस असुर । सर्व ब्रह्मांडांत हाहाकार । लोक सारे संशयग्रस्त ॥८॥परम दारुण दैत्य बांछिती । पृथ्वी जिंकावी प्रथम म्हणती । मदासुराची आज्ञा पाळिती । लढती नृपांसमवेत ॥९॥कोणी युद्ध करुन मरती । कोणी राजे शरण येती । नृप सकळ भयभीत चित्तीं । कोणी जाती च्यवनाश्रया ॥१०॥भूमीवरी सर्व लोक संत्रस्त । प्रलय ओढवला म्हणत । दैत्य भूमंडळ जिंकित । हर्षनिर्भर सर्व झाले ॥११॥सप्तद्वीपयुक्त पृथ्वी जिंकून । दैत्य महा असुरांचे मन । देवांसि जिंकण्या उन्मन । परम दारुणांचे जाहले ॥१२॥वायुवेगासम सर्व जात । स्वर्गलोकीं ते क्षणार्धांत । वनें उद्यानें भग्न करित । देवगंधर्वांचा तदा ॥१३॥देव सुरेंद्रासी निवेदिती । तेव्हां तो संतप्त चित्तीं । शस्त्रें घेऊन निर्भय चित्तीं । युद्ध करण्या तत्पर ॥१४॥बृहस्पतीजवळी जाऊन । सुरेश्वर करी त्यासी नमन । द्विजेंद्र करी सन्मान । भक्तितुष्ट तयाचा ॥१५॥नंतर तो म्हणत इंद्रास । महाकांति बृहस्पति वचनास । ऐक देवेंद्रा रहस्यास । मदासुराचा अवधानें ॥१६॥शक्तीचें वरदान प्राप्त । म्हणोनी मदासुर दुर्जय असत । म्हणोनी सर्व सोडून सांप्रत । पळून जावें सत्वर ॥१७॥देवगुरुचें वचन । सर्व देवांनीं मानून । केलें सत्वर पलायन । स्वर्गातून त्या वेळीं ॥१८॥मदासुरें सर्वं जाणून । अमरावतीस शीघ्र जाऊन । इंद्रासनीं विराजमान । जाहला तो महा असुर ॥१९॥अप्सरा त्यासी सेविती । गंधर्व यशोगान त्याचें गाती । विविध दिव्य भोग भोगिती । दैत्य असुर ते स्वर्गीं ॥२०॥देवांच्या पदीं दैत्यां नेमित । तारकादी असुर हर्षयुक्त । ते विविध स्वर्गसुखें भोगित । नंतर जिंकिती ब्रह्मलोक ॥२१॥विधाता स्थान सोडून । कैलासीं गेला निघून । तेव्हां सत्यलोकांत जाऊन । दुष्ट दैत्य राज्य करिती ॥२२॥विमानांतून उड्डाण । मनोवेगें सुखद महान । कृतकृत्यता मनीं मानून । महादैत्य गर्व करिती ॥२३॥ब्रह्मासनीं तेव्हां बसत । मदासुर तो मदोन्मत । असुरवीरांसमवेत । आनंदोत्सव करिता झाला ॥२४॥नंतर मित्रांसमवेत । दैत्य तो वैकुंठी जात । महाक्रुर तो ललकारित । विष्णूसी तेव्हां निर्भय मनें ॥२५॥रमापति पलायन करित । कैलास लोकीं आश्रया जात । मदासुर वैकुंठ जिंकित । बैसला आसनीं विष्णूच्या ॥२६॥वैकुंठसुखें सर्व महान । भोगिती दैत्यराज हृष्टमान । कल्पवृक्षाचें स्वामित्व लाभून । मनोवांछित पूर्ण करिती ॥२७॥वैकुंठ जिंकून मनांत । कैलास जयेच्छा उपजत । तेव्हां मदासुर कैलासी जात । जिंकण्या स्थान शंकराचें ॥२८॥शिवही होय भयभीत । ब्रह्मा-विष्णू देवांसहित । तो शक्तिलोकी आश्रया जात । कैलास जिंकला दैत्यांनी ॥२९॥दैत्येश्वर मदासुर । कैलासीं सुख भोगी अपार । जें जें अद्भुत सुखकर । कैलासीं तें भोगिलें ॥३०॥मदासुर भोगभावरत । स्वतःसी धन्य मानित । सर्व असुरांसमवेत । राज्य करी स्वर्गांचे ॥३१॥शक्तिलोकी देव समस्त । जातां ते भयग्रस्त । शक्ति सर्वांसी धीर देत । आश्वासनही देतसे ॥३२॥शिवादींसी ती आदिमाया सांगत । जगताची माता सृष्टिस्थिती संहार करित । सत्यार्थे जी जगाचा ॥३३॥आदि शक्ति ती आश्वासित । भय नसे मम सान्निध्यात । येथे रहा निश्चिंत । दैत्य तो येथ येईल न ॥३४॥माझ्याच वरदानें गर्वयुक्त । मदासुर झाला मदोन्मत्त । माझे वचन तो ऐकत । आज्ञा माझी पाळीळ ॥३५॥जरी येथ तो येईल । तरी मजला पूजील । माझा अवमान न करील । देवांनो ऐसे मज वाटे ॥३६॥परी गर्वयुक्त होऊन । पीडा माझ्या लोकांत महान । तो जर देईल तरी हनन । करीन त्याचें तत्क्षणीं ॥३७॥यांत संशय कांहीं नसत । ऐसें देवांसी समाश्वासित । तेव्हां भययुक्त सारे राहत । शक्तिलोकीं सुखानें ॥३८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे खण्डे एकदंतचरिते मदासुरस्वर्गविजयो नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP