मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४१ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत च्यवनतपोवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा सांगत । भृगूचा पुत्र तयासी वंदित । योगीशाची अनुमति घेत । नंतर गेला प्रयागक्षेत्रीं ॥१॥तेथ उग्र तप आचरत । उभा राहुनी जळांत । दहा सहस्त्र वर्षे लोटत । ऐसें प्रचंड तप त्याचें ॥२॥त्याच्या तेजें होत व्याप्त । ब्रह्मांड मंडळ समस्त । एकदा कोळी मासे पकडित । जाळें त्यांनी टाकिलें ॥३॥त्या जाळ्यांत मासे सापडले । दैववशे ऐसें झालें । भृगुपुत्राही धीवरें पकडिलें । त्या जाळ्यांत नकळत ॥४॥जेव्हां जाळें वरती ओढिती । तेव्हां त्या मुनिवरा पाहती । जाळ्यांतून त्यासी सोडविती । भयभीत होऊन नमिती तया ॥५॥नहुषनुपासी धीवर सांगत । मुनीचा त्या वृत्तान्त । नृपही होत भयभीत । भेटला भृगुपुत्रासी तेव्हां ॥६॥प्रधान ब्राह्मणांसमवेत । महाभाग तो प्रणाम करित । हात जोडून प्रणाम करित । पुढे उभा राहिला ॥७॥जलवियोगें मासे मरती । त्यांना स्वर्गांत देई गती । नहुषासी म्हणे तो येती । धीवरांपासुन सोडव मला ॥८॥माझ्या देहाचें मूल्य द्यावें । या कोळ्यांसी तू तोषवावें । तें ऐकून कोळी प्रसन्नभावें । मागती शंभर सुवर्णमुद्रा ॥९॥तेव्हां मुनी नृपास म्हणत । शतसुवर्णमुद्रा मूल्य अयोग्य असत । माझ्या शरीराचें त्वरित । योग्य तें द्यावें या धीवरांसी ॥१०॥तेव्हां एक लक्ष मुद्रा देत । परि मुनीस ते न संमत । एक ग्राम तें देऊं इच्छित । भयसंयुत नृप तेव्हां ॥११॥तेंही मुनीसी न संमत । तेव्हां नगरदान स्वीकारित । मुनीसी तेंही न रुचत । संपूर्ण राज्य देऊं करी ॥१२॥मुनीस तेही अमान्य होत । तेव्हां राजा अमात्यांसहित । होई भयभीत चित्तांत । काय करावें हें समजेना ॥१३॥आतां भृगुपुत्र हा च्यवन । शाप देईल क्रोधें उन्मन । माझें दैव प्रतिकूल म्हणून । यांत संशय कांहीं नसे ॥१४॥तेव्हां त्यासी पाहून व्यथित । च्यवन म्हणे राजेंद्रा ब्राह्मणांप्रत । जाऊन विचारी मूल्य काय असत । या च्यवनाच्या देहाचें ॥१५॥इतुक्या माजीं अवचित । भरद्वाज गाणपत्य तेथ येत । त्या योग्यासी प्रणाम करित । नहुषराजाला भक्तिभावें ॥१६॥नंतर तयासी सांगत । घडला जो सर्व वृत्तान्त । तेव्हां भरद्वाज नहुषाप्रत । म्हणे चिंता करुं नको ॥१७॥ब्राह्मणांचे आणि गाईचे असत । कुळ एकची परी द्विधा ते करित । कर्मसिद्धयर्थ धाता जगांत । दोन्हीही पूजनीय समत्वें ॥१८॥जैसें यज्ञांत गाईंचे घृत । हविरन्न असे उपयुक्त । तैसेचि ब्राह्मणांचे मंत्र पुनीत । घृतासम मंत्र मूल्यवान ॥१९॥म्हणोनी या धीवरांसी गोधन । देऊन मुनीसी बंधहीन । करी नहुषा तूं निश्चिंतमन । भरद्वाज ऐसा उपदेश करिती ॥२०॥भरद्वाज स्वच्छंदे निघून जात । तेव्हां नहुष धीवरां गाई देत । तेणें च्यवन मुनी संतोषित । आशीर्वाद विविध देई ॥२१॥त्या नृपाचा मान करुन । च्यवन गेला वनांत निघून । जेथ फळें बहुविध जल पावन । शीतल छाया सर्वत्र ॥२२॥तेथ राहून उग्र तप करित । सहस्त्र वर्षे निराहार राहत । त्यानंतर शर्याती नृप येत । मृगयासक्त त्या स्थळीं ॥२३॥च्यवनावरी मुंग्यानी बांधलें । वारुळ जरी तो न हाले । तपश्चर्येत निमग्न झालें । संपूर्णपणें चित्त त्याचें ॥२४॥अन्य अनुयायांसी आज्ञापित । म्हणे च्यवन मंडळी सांप्रत । प्रवेश तुम्हीं न करा निश्चित । मीं एकटा आंत जाईन ॥२५॥तरी शर्यातीची कन्या । नाम तिचें सुकन्या । प्रवेश करी क्रीडा करण्या । च्यवनाश्रमीं ती दैववशें ॥२६॥जेथ च्यवन उग्र तपांत । वारुळांत होत स्थित । त्या स्थळीं जाती विहार करित । सुकन्या आणिक सख्या तिच्या ॥२७॥वल्मीक तें पाहती उत्तम । त्यांतून चकाकले दोन नयन । आश्चर्य मनीं वाटून । अज्ञानें सुकन्या काय करी ॥२८॥एक कांटा करी घेऊन । वारुळांत खुपशिला मजा म्हणून । तेव्हा तो बैसला रुतून । च्यवन मुनींच्या डोळ्यांत ॥२९॥वारुळांतून रक्त वाहू लागला । तेव्हा ती होय भयभीत । मैत्रिणींसह परतत । शीघ्र शिबिरांत पित्याच्या ॥३०॥शर्यातीच्या सैन्यांत । तेव्हां आश्चर्य एक घडत । मलमूत्र क्रिया बंद होत । सैनिकांच्या अकल्पित ॥३१॥तेणें शर्याती भयभीत । च्यवनमंडळीं शोध करित । तेव्हां वारुळीं छिद्र दिसत । रक्त भळभळा वाहे तेथ ॥३२॥राजा विचारी कोणी कुपित । मुनींसी केलें अविचारें त्वरित । तें सांगा मज अविलंबित । कोणाचें हें दुष्ट कृत्य? ॥३३॥सुकन्या मानसी अति लज्जित । संक्षुब्ध तैसीच भयभीत । हात जोडूनी पित्यासी सांगत । घडला सर्व जो वृत्तान्त ॥३४॥वनांत क्रीडार्थ हिंडत । होतें तेव्हां वारुळ दिसत । त्यांत चकाकले कांही अवचित । छिद्रांमधून त्या वेळीं ॥३५॥उत्सुकता मनीं दाटत । मी कंटक त्या छिद्रांत । खुपशिला तेव्हां अवचित । रक्त वाहू लागलें ॥३६॥परी मज नव्हते माहित । मुनी कोणी त्या वारुळांत । बैसोनी तप असेल करित । अन्यथा ऐसें न होतें ॥३७॥तें ऐकून शर्याती जात । च्यवन जेथें होता वनांत । वारुळीं तपश्चर्या करित । स्तुति करी नम्रभावें ॥३८॥तेव्हां त्यासी भृगुनंदन । अज्ञानानें घडलें म्हणून । तुझ्या सुतेच्या हातून । शाप मी न देत तिला ॥३९॥परी माझ्या सेवाभावें । जीवन तिनें घालवावें । मज अंधासी जपावें । प्रेमळ भार्या होऊन ॥४०॥ऐसें जरी तूं करशील । कन्यादान या वेळ । तरीच मुक्ति लाभेल । सैन्य तुझें शापांतून ॥४१॥तुझी कन्या मजसी देशील । तरी सर्व सुखमय होईल । तेव्हां शर्यातीचें मनोबल । गळून गेलें पूर्णपणें ॥४२॥परी शापभयें निश्चय करित । सुकन्या च्यवनासी अर्पित । तेव्हां सैनिकांची पीडा सरत । मलमूत्रादिक निर्विघ्न होई ॥४३॥आपुलें सैन्य घेऊन । राजा मोदें जाय परतून । सुकन्या राजपुत्री वनीं राहून । सेवा करी च्यवन मुनीची ॥४४॥त्या महामुनीच्या सेवेंत । देहभरम सोडून आसक्त । असता सुकन्या तेथ येत । अश्विनीकुमार देववैद्य ॥४५॥मुनिशार्दूंला प्रणाम करुन । अश्विनद्वय म्हणती वचन । काय करावें सांगा सेवन । कार्य कांहीं महामुनें ॥४६॥तेव्हां च्यवन त्यांसी म्हणे नयन । द्यावे मज पुन्हां पावन । वृद्धावस्था दूर करुन । पुनरपि यौवन मज द्यावें ॥४७॥अश्विनीकुमार त्यास प्रार्थित । स्वतंत्र हविर्भाग यज्ञांत । देवांसहित आम्हां न मिळत । तो आपण मिळवून द्यावा ॥४८॥तपोबळें हें कार्य करावें । आम्हीही तुम्हांसी सेवावें । परस्परांचे हेतू पुरवावे । ऐसी आमुची प्रार्थना ॥४९॥च्यवनमुनीसी तें संमत । त्वरित तेव्हा त्यास नेत । अश्विनद्वय अद्भुत कुंडांत । स्नानार्थ त्यासी उतरविती ॥५०॥त्या कुंडांतून वरती येत । तिघेही समान रुपयुक्त । कामदेवासम भासत । असामान्य लावण्य त्यांचें ॥५१॥त्या तिघांसी पाहत । एकासारखे सर्व दिसत । विस्मित झाली सुकन्या मनांत । अश्विनांस तें प्रार्थी ॥५२॥अश्विनी कुमारांनो नमन । तुम्हांसी करितें मी विनमर मन । माझा पति दाखवा मजलागून । आपुलें रुपहीं स्पष्ट करावें ॥५३॥तिच्या पातिव्रत्यें संतुष्ट होत । च्यवन मुनीसी प्रकट करित । यज्ञीं हविर्भागयुक्त । होऊन प्रसन्न ते गेले ॥५४॥च्यवनही स्वाश्रमीं परतत । पुढें एकदा शर्याती येत । कन्या जामातासी पाहत । विस्मित झाला मानसीं ॥५५॥म्हणे हें काय अघटित । अंध जर्जर होता जामात । तो यौवनयुक्त डोळस दिसत । कैसें घडलें हें आश्चर्य ॥५६॥मुलीस विचारी वृत्तान्त । तिनें सांगितलें समस्त । च्यवनासी प्रणाम करित । शर्याती नंतर त्यास नेई ॥५७॥यज्ञ करण्या स्वराज्यांत । यज्ञसामुग्री हर्षभरित । जमवोनी यज्ञा आरंभित । सर्वसंपत्तियुक्त तो ॥५८॥त्या यज्ञी देव जात । अप्सरांच्या गणांसहित । नानादिशांतून येत । मुनिजनही यज्ञार्थ ॥५९॥सर्व वर्णांचे नर जमत । यज्ञ पाहण्या उत्सुक चित्त । आनंदोत्सव तेथ होत । पुढची कथा पुढिलें अध्यायीं ॥६०॥ओमिति श्रेमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते च्यवनतपोवर्णन नामैकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP