मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ११ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ११ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत भूगोलवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । जंबुद्धिपेश्वरा नव पुत्र झाले । नाभि किंपुरुष हरि इलावृत्त भले । हिरण्मय कुरु रम्य तैसे शोभले । भद्राश्व केतु मालक ॥१॥जनक त्या त्या नामक खंडें देत । ऐसे हे सात प्रियव्रताचे सुत । मुद्गल सांगती वनांत जात । तप करुनी गाणपत्य झाले ॥२॥अंतीं गाणेश्वर धामाप्रत । गेले पुनरावृत्ति शून्य पुनीत । योगाने अभेद पावत । ब्रह्मवादी ते सारे ॥३॥जंबुद्धीपाचा विस्तार । एकलक्ष योजनें उदार । दक्षा लवणोदकें परिसर । वेढिला असे तयाचा ॥४॥त्यांत मध्ये महाशैल । मेरुहेमपय तो अचल । नानाधातुयुक्त औषधींनी विपुल । शुभकारक विपुलजळ ॥५॥उत्तम पाण्याचा नद्या वाहती । गुहांत अनेक प्राणी राहती । लक्ष योजनें उत्सेध जगतीं । विस्तार योजनें साठ हजार ॥६॥बत्तीस सहस्त्र योजनें अधःस्थित । आठ हजार योजनें आसमंतात । ऊर्ध्व विभेदानें संस्थित । तो कनकाचल भूमींत ॥७॥पद्माकार रुपानें स्थित । पद्मपत्र आकारें व्यवस्थित । त्याच्या भोगतीं पर्वत । नाना धातुमय असती ॥८॥त्यावरती देवांचीं । गुहयकांची पक्ष्यांची । योगी सिद्धमहात्म्यांची । राक्षसाचीं निवासस्थानें ॥९॥नागेंद्रांचीं मुनींद्राची । गंधर्वांचीं पिशाचांची । भूतांची अद्भूत निवासें साचीं । प्रजापते तेथ शोभली ॥१०॥उद्यानें चित्रविचित्र । देवक्रीडा गृहे सुपात्र । वार्धक्य शोकहर पवित्र । उदकें सर्वत्र खरोखर ॥११॥कैलासादी आठ पर्वत । त्याच्या सभोवतालीं स्थित । त्यांत रुद्रादिदेवेंद्र वसत । दिशाधिपति तैसेची ॥१२॥मध्यमागीं महाअरण्य स्थान । ब्रह्मदेवाचें पावन । ऐश्या परीं सर्व देवांसी सुखस्थान । पर्वत तो शोभला ॥१३॥त्याच्या दक्षिण भागात । तीन द्वीपखंड असत । उत्तरभगीं खंडत्रय विराजत । पूर्वपश्चिम भागीं वर्षद्वय ॥१४॥मध्यांत समंत प्रदेशांत । एक वर्ष त्याचे असत । ऐशापरी नऊ खंड ख्यात । मध्यमद्वीपात त्या कालीं ॥१५॥हिमाचलादी तयांत । मर्यादागिरी स्मृत । दोन हजार योजनें रुंद असत । आठ योजन विस्तारें ॥१६॥योजन सहस्त्र विस्तार । प्रति खंडांत अपार । त्यांत मित्रभाव धर । लोक निवास करतात ॥१७॥वर्षांत पर्वत नानाविध । नद्या तैशाचि बहुविध । दक्षा तेथ सर्व लोक सावध । सुखे भोगितो अनंत ॥१८॥अजना भविहीन ख्यात । आठखंडे प्रकीतर्ति । त्यात सिद्धि स्वाभाविकी असत । स्थिर भावानें संस्थित ॥१९॥सदा यौवनयुक्त नर । सुरुप नाहीही समग्र । देवांसम सुखांचे भोक्ते उदार । साधुगूणयुक्त जे ॥२०॥परस्परांशी संसक्त । समकाळ भोगरत । वर्णाश्रमरत धर्मयुक्त । दयान्वित ते सारे ॥२१॥तेथ सामान्य जनांचे युगधर्म नसती । शीतोष्णादि भवें दुःखें नसती । त्या खंडांत सर्व जन राहती । विशेषयुक्त मानदा ॥२२॥अकराशें सहस्त्र जगती । द्वादश वा त्रयोदशशत आयु भोगिती । पंचशत वा दशशतवधि जगती । शत पंचवर्षे मानव ॥२३॥हिमाचलासमीप अजनाभ ख्यात । नाभीचा खंड प्रख्यात । कर्मात्मक सर्वमान्य असत । तेथ कर्मे करोनी ॥२४॥नर अन्य द्वीपांत जाती । खंडांत अथवा पातालांत वसती । भोग प्राप्तीस्तव गति । स्वर्गांत ते साधिती ॥२५॥तेथ कर्मफळ भोगून । पुनरपि येथ येती परतून । अथवा पापकर्मे करुन । नरकांत जाऊन परतती ॥२६॥नर तैसे नारीजन । येथ परतती कर्मार्थ उन्मन । येथ योगसाधनें महान । योगींद्र होतात निःसंशय ॥२७॥गाणपत्य स्वरुप लाभती । त्याची भक्ति सदैव करिती । म्हणोनी श्रेष्ठतपा म्हणती । हिमालय हा वर्ष जगीं ॥२८॥सर्वदातृत्वयुक्त । मान्य तयासी होत । भोगांत स्वल्परुप असत । बुधजन ऐसें सांगती ॥२९॥शीतोष्णदींनीयुक्त । नाना रोगसमन्वित । तेथ चार वर्ण निवसत । व्यभिचार त्यांचा होऊनी ॥३०॥नानाविध वर्ण उत्पन्न । त्यांचे धर्म विभिन्न । त्या युगधर्माचें मान। प्रकृति भिन्न नर असती ॥३१॥स्वार्थादींनी समन्वित । ऐसे जन तेथ राहत । विंध्य सह्याद्रि आदी असत । पुढती पर्वत बहुत तेथ ॥३२॥त्यांतून ज्यांचा झाला उगम । ऐशया पुष्कळ सरिता उत्तम । सर्वत्र वाहती पुण्यदा अनुपम । मिष्टा जाला महामते ॥३३॥त्यांत स्नान करिता पुण्य लाभत । नर त्रिविधाचार संयुत । कर्मकर भक्तिभावयुत । सर्व देवांची तीर्थे तिथे ॥३४॥ब्राह्मणांचीं स्थानें असती । त्या सेवकजनांची वसती । ऐसे गुणयुक्त जन राहती । हया वर्षांत शुभमय ॥३५॥कर्मांच्या भरणें भारत । सुज्ञजन यासी म्हणत । ऐसें हें भूमंडल समस्त । कथिलें तुला संक्षेपे ॥३६॥हें भूगोल वर्णन । वाचितां ऐकतां पापहारक महान । सूर्यमंडळाचें वर्णन । पुढिले अध्यायीं केलें असे ॥३७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते भूगोलवर्णन नामैकादशोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP