मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय २८ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय २८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत कश्यपसृष्टिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । प्राचेतस दक्ष आचरित । उत्तम तप वर्षशत । तेव्हां गणाध्यक्ष प्रसन्न होत । वर देई तयासी ॥१॥गणेश वरदानानें निर्मित । सिद्ध तो प्रजा समस्त । देवयक्ष मनुष्यादी सृजित । पिशाचादी नानाविध ॥२॥बहुविध प्रजा निर्मून । पाळी तियेसी नीतिपरायण । तदनंतर धरणींत प्रसन्न मन । मैथुनी सृष्टी निर्मी तो ॥३॥त्यास पुत्र दहा हजार । महा ओजस्वी झाले उदार । त्यांसी म्हणे दक्ष सत्वर । तपानें सृष्टिरचना करा ॥४॥ते तयासी प्रणाम करुन । तप आचरिती भावयुक्त मन । त्यांच्या मार्गांत ब्रह्मपुत्र महान । नारद सहसा अवतरले ॥५॥विधिपूर्वक योग मार्ग सनातन । केला त्यांनी तेव्हां कथन । त्यानें सर्वही युक्त होऊन । उत्तम सृष्टी ते न करिती ॥६॥कर्ममार्गाचा त्याग करुन । सर्व ते गाणपत्य होऊन । जितेंद्रिय भ्रमहीन । स्वेच्छेने निघून जाती ॥७॥आपुले ते पुत्र नष्ट झाले । म्हणोनि दक्षें पुन्हा निर्मिले । असिक्नीपासून लाभले । हजार पुत्र तेजस्वी ॥८॥त्यांसी म्हणे तो प्रेमयुक्त । तप आचरावें तुम्ही उदात्त । तेणें सृष्टि परमाद्भुत । तुम्हीं सर्वही निर्मावी ॥९॥त्याचें वचन ऐकून । भक्तीभावें प्रणाम करुन । तप आचरितो महान । सृष्टिरचना करावयासी ॥१०॥पुनरपि नारद त्यांसी भेटत । सुनिर्मल ज्ञान त्यांसी देत । ते सर्वही योगयुक्त । कर्ममार्गासी सोडिती ॥११॥ते सर्व स्वेच्छा विहार करित । दक्षासी समजला तो वृत्तांत । तो होऊन क्रोध समन्वित । शाप देई नारदासी ॥१२॥ब्रह्मपुत्रा माझे सारे सुत । तव उपदेशें झाले विरक्त । कर्म मार्ग सोडून भरष्ट होत । वर्णाश्रमाचा क्रम सोडिला ॥१३॥हें सर्व तूम केलेंस । दुष्टा, नारदा म्हणोनि विशेष । आतां घेई माझ्या शापास । प्रजाहीन तूं होशी ॥१४॥दोन मुहूर्ताहून एका स्थळांत । स्थिरता तुजसी न लाभेल जगांत । पृथ्वीवरी स्वर्गीं पातळांत । भटकत राहशील महादुष्टा ॥१५॥ऐसा माझा शाप सतत । निःसंशय बाधेल तुज जगांत । नारदासी शापून दक्ष भेटत । ब्रह्मदेवासी आदरें ॥१६॥त्यासी प्रणाम करुन । जगन्नाथा म्हणे विनीत वचन । नारदें दुष्टभावें करुन । माझी सृष्टी नाशिली ॥१७॥आतां देवेशा मज सांगावें । कोणत्या प्रकारें सृष्टिकर्म करावें । तें सारें मीं आचरावें । ऐसी शक्ती देई मला ॥१८॥तेव्हां ब्रह्मा त्यासी सांगत । सुलोचना कन्या तू जगांत । निर्माण करी तेणें इच्छित । सफल तुझें होईल ॥१९॥ब्रह्मदेवाचें वचन ऐकून । दक्ष स्वगृहीं गेला परतू न । निर्मिल्या साठ कन्या प्रसन्न । वीरिणीपासून तेजस्वी ॥२०॥महाभागा त्या अति सुंदर । सर्व प्राण्यांच्या माता उदार । सृष्टिरचना पृथ्वीवर । त्यांच्यामुळें वाढली ॥२१॥धर्मासी दहा कन्या देत । कश्यपासी तेरा अर्पित । सत्तावीस अब्जासी देत । चार दिल्या अरिष्टनेमीसी ॥२२॥बहुपुत्रासी दोन देत । तितुक्याच कृशाश्वासी देत । अंगिरसा दोन समर्पित । त्यांचा वंशविस्तार ऐक ॥२३॥मरुत्वती, वसुर्यामी, अरुंधती । लंबा भानू संकल्पा या पूजिती । संकल्पा मुहूर्ती साध्या भजती । विश्वा, भामिनी धर्मासी ॥२४॥दह धर्मपत्नी या असती । त्यांची ऐका पुत्रसंतती । विश्वेदेव साध्य यांची निर्मिती । जाहली त्यांच्यापासून ॥२५॥मरुत्वतीचे मरुत्वंत । वसूचे वसव झाले ख्यात । भानूचे भानू जगांत । मुहूर्तेचे मुहूर्तक ॥२६॥लंबेचे नादघोष सुत । यामीचे नागविथीक ख्यात । अरुंधतीपासून जन्मत । विषम पुत्र पृथ्वीवरी ॥२७॥संकल्पेचे ते संकल्प । धर्मपुत्र ऐसे निष्पाप । त्यांच्या पुत्रपुत्रींनी अमाप । अखिल जग समृद्ध झालें ॥२८॥आप, ध्रुव, सोम धन्य । अनल अनिल प्रत्यूष मान्य । प्रभास ऐसे आठ वसू धन्य । प्रख्यात असती जगांत ॥२९॥अदिति दिति कद्रू अरिष्टा । सुरसा दनु सुरभि विनता । तामरा क्रोधवृशा इरा दयिता । मुनि खशा सर्व धर्मज्ञा ॥३०॥त्यांच्या पुत्रांची नावें एक । विवस्वान धाता भग अंशक । त्वष्टा वरुणादी जे देव पावक । ते सर्वही अदितीपुत्र ॥३१॥दितीचे पुत्र दैत्य असत । शास्त्रांत सारे संमत । दनूचे ते दानव ख्यात । तार विप्रचित्ती शंबरादी ॥३२॥कपिल स्वर्भानू संकर । वृषपर्वा तैसा वीरधीर । प्रधान असती हे असुर । दानवगण जगतांत ॥३३॥सुरसाचे सहस्त्र सुत । सर्पकुळीं विख्यात । अरिष्टा ती जन्म देत । गंधर्वांसी सहस्त्र संख्य ॥३४॥शेषादी महानाग ज्ञात । कद्रूचे पुत्र ते जगांत । तामरेस सहा कन्या होत । सुंदर लोचन तयांचे ॥३५॥शुकी श्येनी भासी ग्रंथिका । सुग्रीवा शुची आदिका । त्यांचे पुत्रादिक ऐका । पक्षिवृंद सारे झाले ॥३६॥सुरभीपासून जन्मत । म्हैशी गायी असंख्यात । दूरेपासून उत्पन्न होत । वृक्षवल्ली तृणादिक ॥३७॥मुनीचे पुत्र ख्यात । यक्ष पुण्य जन समस्त । क्रोधवशा जन्म देत । दारुण रक्षोगणासी ॥३८॥विनतेचे दोन सुत । अरुण गरुड प्रख्यात । खशेचे खेचर होत । प्रेतादी पुत्रही तियेचें ॥३९॥ऐसे कश्यपाचे दायाद । स्थावर जंगमात्मक सुखद । वैवस्वताहून भिन्न दुरासद । ऐसा हा वंश तुज कथिला ॥४०॥अरिष्टनेमीचे पुत्र असत । वेधस रुपयुक्त । बहुपुत्राच्या पत्नी ज्ञात । चार विद्युत रुपांत ॥४१॥तैसेचि अंगिरसाच्या कान्ता । त्यांचे सुत ऋषि तत्त्वता । वृषसत्कृत कृशाश्वराचे जगता । देवर्षि गण ऐसे ख्यात ॥४२॥हे युगसहस्त्रांतात । पुनरपि जन्म घेत । मन्वंतरांत सर्वही होत । तुल्य कार्य स्वनामांनीं ॥४३॥इतुके पुत्र निर्मिले । परी कश्यपाचें मन तो तोषलें । त्या ब्रह्मर्षीनें आरंभिलें । उग्र तप पुत्रासाठीं ॥४४॥तप घोर तो आचरत । तेव्हां त्यासी झाले दोन सुत । वत्सर असित नाम ज्वलंत । ब्रह्मवादी महा ओजस्वी ॥४५॥वत्सरापासुन नैध्रुव जन्मत । तैसाचि रैभ्य प्रख्यात । रैभ्यापासून निर्माण होत । द्युतिमंत रुद्रगण ॥४६॥च्यवनाची सुता प्रेमें वरित । नैध्रुवा महात्म्यासी जगांत । सुमेधा तैशी जन्म देत । कुंडपायी पुत्रांसी ॥४७॥असितापासून एकवर्णेस होत । ब्रह्मिष्ठ देवल हा थोर सुत । योगाचार्य जो सर्वत्र स्मृत । शांडिल्य परम योगी तैसा ॥४८॥सर्वतत्त्वार्थज्ञ शुचि इत्यादि बहुत । कश्यपाचे झाले जगांत । ते तुज सांगितले स्मरण पुनीत । स्मरण त्यांचे इच्छा पुरवी ॥४९॥ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते कश्यपसृष्टिवर्णनं नाम अष्टविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP