मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय २७ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय २७ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत प्रचेतसां चरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । प्राचीन बर्हिषाचे पुत्र आचरित । उत्तम तप सहस्त्र वर्षेपर्यंत । तेणें जनार्दन तुष्ट होत । वर्द देण्या त्यासी आला ॥१॥गरुडवाहना चतुर्भुजासी पाहून । ते बर्हिष पुत्र करिती वंदन । पूजा करिती प्रसन्न मन । स्तवन करिती बहुविध ॥२॥केशवासी भूतभावनासी । निराकारासी कृष्णासी । विष्णूसी प्रभविष्णूसी । वासुदेवा तुला नमन ॥३॥आदीमध्यांतहीनासी । सर्व अज्ञान विनाशकासी । ज्ञानदात्यासी कृपालवासी । लक्ष्मीपती तुला नमन ॥४॥भक्तसंरक्षकासी भक्तिप्रियासी । शेषशायी देवा तुजसी । भुक्तिमुक्ति प्रदासी । वैकुंठपतीसी नमन असो ॥५॥नारायणासी शांतासी । सत्वयुक्तासी विष्णूसी । नमन आमुचें सर्वज्ञासी । धन्य आम्हीं सर्व झालो ॥६॥धन्य आमुचें माता पिता । जनार्दना दर्शन तुझें होता । आतां सृष्टिसामर्थ्यदायक तत्वता । वर देई विशेष आम्हां ॥७॥तेव्हां प्रसन्न होऊन । हरि त्यासी म्हणे वचन । अतुल सामर्थ्य लाभून । सृष्टिरचना कराल ॥८॥या तपानें सिद्धरुप । झालांत तुम्ही निष्पाप । जें जें इच्छित तें तें आपोआप । सफल होईल सत्वर ॥९॥तुमचे हें स्तोत्र वाचील । अथवा जो हें एकेल । त्यासी माझा प्रसाद लाभेल । भुक्तिमुक्तिप्रद सदा ॥१०॥ऐसें बोलून तो परपुरंजय । अंतर्धान पावला विष्णु अजय । आश्रम सोडून ते निर्भय । जाती आपुल्या गृहासी ॥११॥त्यांच्या मार्गांत अनेक वृक्ष दिसत । ते त्यांचा मार्ग रोधत । तेव्हां अग्नि निर्मिति क्रोधयुक्त । त्यानें जाळिलें वृक्ष सर्व ॥१२॥त्यांचा क्रोध शांत होत । तेव्हां तेथे चंद्र येत । वृक्षजा कन्या त्यासी देत । यथाविधि त्या वेळीं ॥१३॥ऋषिवीर्यापासून जी उत्पन्न । ऐसी ती अप्सरा महान । ती लाभता शांत होऊन । अग्नी त्यांनी विझविला ॥१४॥नंतर ते बर्हिष सुत । स्वराज्यीं परतून जात । प्रजा पालन आदरयुक्त । करिती ते सर्वही ॥१५॥आपुल्या पुत्रासमान । प्रजेस आपुल्या मानून । राज्ययंत्रणा सुखें करुन । तोषविती सर्वांसी ॥१६॥बर्हिषसुत ते प्रचेत । मारिषेपासून त्यांसी होत । दक्षा तूं त्यांचा निष्पाप सुत । तेजःपुंज सर्वज्ञ ॥१७॥गणेशवरदानानें न जाईल । ब्रह्मपुत्रत्व तुझे अमल । होशील तूं प्रजापाल । हयांत संदेह असेना ॥१८॥तुला राज्य देऊन । प्रचेतस वनीं गेले महान । तेथ आचरिलें तप गहन । योगशांती लाभार्थ ॥१९॥तेथ नारद योगी जात । गणेशाचें गायन करित । प्रचेतसांचें हित चिंतित । परम संतुष्ट चित्तांत ॥२०॥त्यास पाहून सारे हर्षित । प्रेमभावें प्रणाम करित । हात जोडून प्रार्थित । तेव्हां मुनिश्रेष्ठ त्यांसी म्हणे ॥२१॥प्रचेतसांनो आपुले इच्छित । सांगा सत्वरी मजप्रत । पुरवीन तें भावतोषित । तेव्हां त्यासी ते विनविती ॥२२॥शांतिप्रद योग आम्हांसी । करुणानिधे शरणागतांसी । सांगा जेणें चित्तासी । स्थिरत्व लाभेल आमुच्या ॥२३॥त्यांची ती प्रार्थना ऐकून । जाहला चित्तांत अति प्रसन्न । सांगे तयासी योग महान । शांतिलाभ जेणें होय ॥२४॥शांतियोगात्मक ऐसें वर्णिती । गणेशासी या जगतीं । योगज्ञान भावभक्ति । प्रचेतसांनो त्यासी भजा ॥२५॥गणेश आणि मी अभिन्न । ऐसा भाव दृढ करी मन । शांतिदायक हा योग पावन । विष्णूनेंमज सांगितला ॥२६॥त्यानें शांति लाभून । संचरतो गणेशा स्मरुन । भ्रांती सर्वही नष्ट होऊन । हर्षयुक्त मन माझें ॥२७॥चित्ताच्या पंचभूमीची भरांती । नर सोडितो जेव्हा जगतीं । तेव्हां शांतियोगाची प्राप्ति । निःसंशय त्यासी होईल ॥२८॥हें सर्व मायामय विलसत । भरांतिकारी बुद्धिलालित । त्याचा त्याग करोनी शांत । प्रचेतसांनो तुम्ही व्हावें ॥२९॥ऐसें सांगून नारद जात । हेरंबासी मनीं स्मरत । कैलासावरी स्वर्गांत । हर्षयुक्त मनानें ॥३०॥प्रचेतसाचे ते सुत । योग आचरती घेऊन व्रत । स्वयं गणेशरुप होत । ऐशी साधना तयांची ॥३१॥अंतीं गणेश देहांत । प्रजापति ते तदाकार होत । जाहले ब्रह्ममय शांत । ओजयुक्त प्रचेतसे ते ॥३२॥प्रचेतसांचे हें चरित्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । त्यासी भुक्तिमुक्ति लाभेल । सुखप्रद जी सर्वांना ॥३३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते प्रचेतसा चरितं नाम सप्तविंशातितमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP