मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ३१ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ३१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत पराशरसुतोत्पत्तिकथनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । दक्ष म्हणे गजासुर कोण । होता दैत्य तो परम दारुण । त्याचें चरित्र संपूर्ण । वधापर्यंतचे सांगा मज ॥१॥ज्याच्या स्तव गणराजा घेत । मुनिपुत्राचा सामान्य जन्म भक्तियुत । त्या असुराचा जन्म वृत्तान्त । सर्वही मुद्गला सांगावा ॥२॥सूत सांगती मुनिजनांस । दक्षाचें वचन ऐकून तयास । मुद्गल योगींद्र सांगत । सकल कथा गजासुराची ॥३॥पुरावृत्त हा इतिहास असत । पाप प्रशामक भुक्तिप्रद जगांत । महिषासुराचा वध करित । जगदंबिका हें सर्वश्रुत ॥४॥त्या महिषासुराचा पुत्र गजासुर । पितृवधानें राग अनिवार । तयास वाटून देववधार्थ आतुर । शंकराची आराधना करी ॥५॥शुक्राचा उपदेश ऐकत । त्यापरी शंकरासी पूजित । तो घोर तप आचरत । निराहार राहून ॥६॥पंचाक्षर विधानें तोषविलें । शंकरासी त्यानें जिंकिलें । दहा हजार वर्षे केलें । तप भयंकर उग्र त्यानें ॥७॥तेव्हा शंकर सुप्रसन्न । आले द्यावया वरदान । काष्ठवत् बसल्या गजासुरा पाहून । विस्मय त्यांसी वाटला ॥८॥त्या आपुल्या स्वभक्तासी । करुणानिधी म्हणे गजासुरासी । वर महामते सांग मजसी । कोणता तुज देऊ अता? ॥९॥तुझ्या तपानें तुष्ट झालों । वरदान देण्या आलों । दुर्लभही देण्या सज्ज राहिलों । वर माग तूं सत्वरीं ॥१०॥शंकराचें वचन ऐकून । गजासुर जाहला प्रसन्न । शोडषोपचारें पूजा करुन । प्रणाम करी नम्रभावें ॥११॥रुद्र अथर्वशीर्ष जपून । शंभूस करी प्रसन्न । वर मागितला महान । ऐक कोणता ते आतां ॥१२॥जरी देवेशा तुष्ट झालासी । महेश्वरा वर देईन मजसी । ब्रह्माडांत जे निवासी । मृत्यु न येवो मज त्यांपासून ॥१३॥ब्रह्मांडाचें राज्य द्यावें । सामर्थ्य माझें वाढावें । अतुल ऐश्वर्य नांदावें । अन्य कांहीं न मागे मी ॥१४॥गजासुरासी तैसा वर देऊन । शिव पावला अंतर्धान । महादैत्य तो हर्षयुक्तमन । आपुल्या गृहीं परतला ॥१५॥मातेनें केला सन्मान । मित्रासी वाटे अभिमान । सर्व दैत्य त्याच्या घरीं जाऊन । अभिनंदन करिती तयाचें ॥१६॥गजासुर शुक्राचार्यासी आणित । आपुल्या या गुरुसे वंदित । अभिषेक होऊन मुनि सान्निध्यात । राजा झाला दैत्य दानवांचा ॥१७॥त्यांच्या समवेत पृथ्वी जिंकून । स्वर्गाचेंही प्रभुत्व मिळवून । जगताचें करी शासन । देव पळाले भीतीनें ॥१८॥शंकराचा आश्रय घेत । त्यास सांगती सर्व वृत्तान्त । शंकर क्रोधसंयुक्त । उपाय चिंतिती मानसीं ॥१९॥गजासुर दैत्यांसमवेत । कैलासावरी चालून जात । तेव्हां देवगणांसहित । शंकर जाती युद्धासी ॥२०॥देव दानवांचे युद्ध झालें । प्रारंभीं दैत्य रणीं हरले । भयभीत होऊन पळूं लागले । तेव्हां गज दैत्य संतापला ॥२१॥त्यानें बाणवृष्टि परम दारुण । करोनि गाजविले रण । अनेक देवांचे ओढवलें मरण । अनेक विकलांग रणीं पडले ॥२२॥वाटे प्रलय काळ ओढवला । इंद्रादी दिक्पालगण विद्ध झाला । गदाप्रहारें विष्णुही पडला । रणभूवरी त्या वेळीं ॥२३॥तेव्हा क्रोधसमायुक्त । शंकर त्रिशूल हातीं घेत । क्रोधें गजासुरा मारित । प्रलयाग्नि सम तो वाटे ॥२४॥त्रिशूलानें शंकर मारित । परी गजासुरासी कांहीं न लागत । शंकराच्या वरप्रदानें होत । सर्व शस्त्रें व्यर्थ तेव्हां ॥२५॥अचानक शिवासमीप जाऊन । दैत्येश पकडी त्याचे चरण । अभिमानें अट्टहास करुन । महेशा दूर भिरकाविला ॥२६॥तेव्हां देवगण सर्वही पळाले । राक्षसांच्या भयें त्रासले । दशदिशांत ते विखुरली । गजासुर गेला शिवलोकीं ॥२७॥देवांच्या पदावरीं स्थापित । श्रेष्ठ दानवांसी सन्मानसहित । स्वर्गभोग सारे भोगित । दैत्यदानव वैकुंठलोकीं ॥२८॥संहर नामा दैत्य स्थापिला । कैलासांत मुख्यत्वें त्या वेळा । गजासुर पृथ्वीवरी परतला । दैत्य वीरांसमवेत ॥२९॥महिष नांवाच्या नगरांत । दुष्ट गजासुर निवास करित । त्रैलोक्याचें राज्य उपभोगित । महाबल दैत्यामित्रांसह ॥३०॥ऐसा बहुत काळ लोटत । देव राहती पर्वत गुहांत । विचार विनिमय परस्परांत । गजासुर वधार्थ करिती ते ॥३१॥तेव्हां विष्णु बोलती वचन । ते ऐकून देव होत प्रसन्न । ब्रह्मांड निवाश्यांपासून । गजासुरासी मृत्यु नसे ॥३२॥ऐसा वर त्यासी असत । म्हणोनि आम्हीं पराजित । स्वानंदलोक भिन्न असत । ब्रह्मांड लोकांपासूनी ॥३३॥त्या स्वानंदलोकाचा पति । देवनायक तो गणपति । त्याच्या हातून जगतीं । गजासुर मृत्यु पावेल ॥३४॥म्हणोनि त्या देवदेवेशा भक्तियुक्त । आराधूंया आपण समस्त । देव ऋषिगणांसहित । परम तप आचरुंया ॥३५॥तो गणेश गजासुरासी मारील । आपुलीं स्थानें आपणांसी देईल । त्याची भक्ति करतां होईल । परम हित सर्वांचे ॥३६॥विष्णूचे वचन ऐकून । देव मुनिगन आनंदून । म्हणती कल्पना ही शोभन । तेणें तप आचरती ॥३७॥कोनी मंत्र जप करिती । कोणी नाम जपांत रमती । कोणी मानसपूजा करिती । कोणी करिती स्तवन ध्यान ॥३८॥कोनी निराहार राहती । कोणी वायुपत्रादि भक्षिती । कोणी यज्ञयागादि यथारीती । करिती पंचाग्नि धूम्रमान ॥३९॥ऐशापरी विविध भक्ति । करुनी देवासे तोषविती । ऐसीं शंभर वर्षें लोटती । तेव्हां प्रकटले गजानन ॥४०॥भक्तवत्सल देव म्हणत । देव मुनींनो सांगा इच्छित । दुर्लभ असलें तरी त्वरित । देईन तुम्हांसी मी संतोषें ॥४१॥गणेशवचन ऐकून । प्रणाम करिती सर्वजन । साष्टांग नमस्कार घालून । परम भक्तीनें पूजिती तया ॥४२॥विविध परीनें स्तवन करिती । आनंद भरला त्यांच्या चित्तीं । रोमांच फुलले शरीरावरती । देवर्षि गाती स्तुतिस्तोत्रें ॥४३॥गणेशाची गणपालक मूर्तीसी । गणरुपासी सर्वत्र संस्थितासी । मूषकारुढासी अनादि रुपासी । पुनःपुन्हा नमन असो ॥४४॥आकारादि विहीनासी । तैसेचि आकारयुक्तासी । हेरंबासी भक्ति संरक्षकासी । विघ्नेशा तुज नमन असो ॥४५॥भक्तवत्सलभावासी । सिद्धिपतीसी सिद्धिदात्यासी । ढुंढीसी बुद्धदात्यासी । सर्वांतर्धारीसी नमन असो ॥४६॥स्वानंदपतीसी स्वसंवेद्यासी । योगरुपासी शांतासी । योग्यांच्या पतीसी कर्त्यासी । आदिमध्यान्तहीना नमन ॥४७॥संहर्त्यासी पालकासी । त्रिगुणहीनासी गुणेशासी । वक्रतुंडासी विनायकासी । लंबोदर देवा नमन तुला ॥४८॥सर्वांच्या हृदयीं तूं वससी । वर्णनातीत तूं वेदासी । तरी तुझी स्तुति आम्हांसी । कैसी यथार्थ शक्य होय ॥४९॥ऐसी स्तुति करुन । गणेशासी करिती अभिवादन । त्याच्या रुपाचें करिती मनन । भक्तिभाव पूर्ण मनीं ॥५०॥ते सर्वही भयभीत । कर जोडोनि गणेशाची प्रार्थित । संतुष्ट जरी तूं आम्हांप्रत । मनोवांछित देई वर ॥५१॥देवेशा गजासुरासी मारावें । आमुचें स्थान आम्हां द्यावें । तुझ्या भक्तीनें भरावें । मानस आमुचें सर्वदा ॥५२॥गणेशा तुझी भक्ति करिती । त्यांची सर्व दुःखें दूर होती । विघ्नेशा तूं आम्हांवरती । कृपा एवढी करावी ॥५३॥ऐसें देवाचें वचन । ऐकता भक्तवत्सल गजानन । देई त्यांसी आश्वासन । गणाध्यक्ष तो आनंदे ॥५४॥गजासुराचा वध अति दुष्कर । परी तुम्हांस्तव करीन सुकर । देव मुनींनो तुम्हां अमर । पुनरपि मी करीन ॥५५॥माझी अचल भक्ति मनांत । सुदुर्लभ तुम्हां सुलभ होत। परशराचा मी होईन सुत । गजासुराचा वध करण्यां ॥५६॥तुम्हीं रचिलें हें स्तोत्र । मम प्रीतिवर्धक सुपात्र । सुखप्रद इहपरत्र । भुक्तिमुक्तिप्रद सदा ॥५७॥जो हें स्तोत्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यासी सर्वसिद्धि लाभतील । सर्व दुःखें त्याची दूर होती ॥५८॥सुबुद्धि त्यासी लाभेल । सर्वं संपत्ति मिळतील । ऐसें बोलून महाबळ । अंतर्धान पावला ॥५९॥तदनंतर पराशराच्या घरीं । जन्म घेई वत्सलेच्या उदरीं । जातकर्मादि संस्कार करी । पराशर मुनी तेव्हां त्याचे ॥६०॥माता पितरां तोषवित । गणपति बाललीला करित । पांचव्या वर्षीं त्याच्या होत । व्रतबंध सोहळा आश्रमीं ॥६१॥षडंगासहित वेदाध्ययन । पूर्ण करी गजानन । मरिचीच्या सुता दोन । सिद्धिबुद्धि विवाहीं अर्पिल्या ॥६२॥ऐसे पराशर सुताचें चरित । सांगितलें तुजसी पुनीत । आतां गजासुरांचे चेष्टित । सांगेन तुजसी सविस्तर ॥६३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पराशरसुतोत्पत्तिकथनं नामैकत्रिंशोध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP