मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ५४ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ५४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मदासुरशान्तिप्राप्तिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मदासुरें परशू वंदिला । यमसंनिभ जो तयास वाटला । विविध परीनें स्तुतीला । करी ब्रह्ममय शस्त्राची ॥१॥शस्त्रराजा तुज नमन । परशो तुज माझें वंदन । तेजःपुंजमया अभिवादन । कालकाला नमो नमः ॥२॥एकदंताचें जें वीर्य असत । स्वधर्मस्थापनात्मक जगांत । तें तूच यांत संदेह नसत । रक्ष मजला शरणागतासी ॥३॥कालरुप तूच अससी । महाप्रलयसूचक भाससी । तुझ्या वेगा सहन करी ऐसी । कोणा शक्ति देहधारका? ॥४॥म्हणोनि तुज प्रणाम करित । ज्योतीरुप तूं महाअद्भुत । रक्ष मजला मे भयभीत । शरणागत वत्सल तूं ॥५॥ऐशी स्तुति मदासुर करित । तेव्हां परशू शांत होत । मदासुरासी सोडून त्वरित । गेला वक्रतुंडाच्या करीं ॥६॥नंतर मदासुर एकदंताप्रत । भयभीत होऊन शरण जात । प्रणाम करुनी पूजा करित । भक्तिभावें सादर तो ॥७॥यथान्याय पुजून । साष्टांग दंडवत घालून । गणेशाचें करी स्तवन । तेणें गणेश संतोषला ॥८॥मदासुर म्हणे एकदंतासी । मायामायिक रुपासी । सदा ब्रह्ममयासी । गणेशा तुज नमो नमः ॥९॥मूषकारुढरुपासी । मूषकध्वजासी बंधहीनासी । सर्वत्र संस्थिता तुजसी । नमन माझें पुनः पुन्हा ॥१०॥चतुर्बाहुधरा लंबोदरासी । सुरुपासी नाभिशेषासी । हेरंबासी चिंतामणीसी । चित्तस्थासी नमन असो ॥११॥गजाननासी गणाधिपतीसी । नानाभूषण युक्तासी । अनंत विभवासी अनंतासी । माया प्रचालका नमन ॥१२॥भक्तानंद प्रदात्यासी । विघ्नेशासी योगपतीसी । योग्यासी योगदायकासी । योगाकार स्वरुपा नमन ॥१३॥एकदंतधारका मायाकारासी । एक शब्दें मायामयासी । दंत शब्दें सत्तामय अससी । तव मस्तका नमन असो ॥१४॥माया सत्ताविहीन । त्यांचा योगकारक तूं उत्तम । तुझी स्तुति करण्या पावन । समर्थ कोण जगी असे? ॥१५॥शरणागतपाला तुज नमन । शरणागत वत्सला वंदन । सिद्धिबुद्धिपते अभिवादन । तुज करितो मीं पुनः पुन्हा ॥१६॥एकदंता रक्षण करी । मज शरणागताचें सत्वरीं । भक्तां मातें संसारीं । तारुन नेई गजानना ॥१७॥ऐसें बोलून प्रणाम करी । प्रदक्षिणा घाली स्तवन करी । हातांची ओंजळ जोडी नंतरी । देवा सन्निध उभा राहे ॥१८॥त्यास म्हणे गणाधीस वचन । अंतरीं झाला तो प्रसन्न । मदासुरा पाहून विकारहीन । भक्तिपूर्ण विनम्र ॥१९॥एकदंत म्हणे क्रोधयुक्त । आलों तुज मारण्या निश्चित । परी आतां तूं शरणागत । म्हणोनि तुजला न मारीन ॥२०॥माझ्या आज्ञेचें करी पालन । देवाचें वैर दे सोडून । माझ्या भक्तींत सदैव मन । रमवी आपुलें मदासुरा ॥२१॥वर माग जो इच्छित । तुझ्या विनयानें मी संतुष्ट बहुत । स्तोत्र रचिलें जें अद्भुत । त्यानेंही प्रसन्न मीं झालों ॥२२॥जो हें स्तोत्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास इष्ट काम प्राप्त होतील । मदजनित भय न त्यासी ॥२३॥अंतीं स्वानंददायक होईल । तूं रचिलेलें स्तोत्र अमल । माझी भक्ति वाढेल । भक्तांच्या हृदयीं सर्वदा ॥२४॥आसुरभाव सोडून । शांतरुप बोले वचन । जरी गजानना तूं प्रसन्न । एकदंत पदीं भक्ति देई ॥२५॥भक्तिनाथा दॄढ करावी । शाश्वती वृत्ति मज द्यावी । जी उपभोगून करावी । पूजा तुझ्या पदकमळांची ॥२६॥मदाचे वचन ऐकून । तथास्तु म्हणे गजानन । माझी दृढ होऊन । मदासुरा तू तरशील ॥२७॥जेथ माझें प्रथम पूजन । स्मरण तैसें करिती भजन । ऐश्या कर्मीं मदा प्रसन्न । शांतीचें राज्य स्थापन कर ॥२८॥विपरीत जे वागती । आसुर स्वभाव ते असती । त्यांच्या कर्मांचे फळ निश्चिती । भक्षण करी मदासुरा ॥२९॥ऐसें एकदंताचें वचन । ऐकून महादैत्य करी नमन । आपुल्या नगरीं परतून । झाला एकदंत भक्त ॥३०॥त्रिपुरकादी दैत्य जात । उद्विग्न मनें पाताळांत । देव परतले स्वस्थानांत । ऐसा महिमा एकदंताचा ॥३१॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मदासुरशांतिप्राप्तिवर्णनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP