मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ३८ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ३८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत वाराहमाहात्म्यम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । हिरण्यकशिपूचा नाश होत । तेव्हां हिरण्याक्ष राजा होत । दैत्यांचे तेज वाढवित । भातृवधानें अति संतप्त ॥१॥हिरण्याक्ष देव जिंकत । त्यांचे मूळ नाशावें म्हणत । तेव्हां त्यासी युक्ति सुचत । कर्मनाश करण्याची ॥२॥जरी यज्ञ कर्माचा नाश होत । देवांचें मरण निश्चित । कर्मरुपी अमृत न मिळत । तरी ते देव निष्प्रभ ॥३॥अन्न नष्ट होता हरतील । आपुलें देह कैसे पोसतींल । ऐशा विचारें तो खल । भूमी जिंकी पराक्रमें ॥४॥कर्ममूलमयी भूमि जिंकित । नंतर ती घेऊन पाताळात जात । तेव्हा देव मुनी प्रजाप्रतीप्रेत । जाऊन सांगती वृत्तान्त ॥५॥चराचर नष्ट होत । दैत्यांचें कर्म कथन करित । तेव्हां ब्रह्मा त्यांसी घेऊन जात । वैकुंठांत अति आदरें ॥६॥रमानाथासी स्तवून । दैत्यांचें कृत्य त्यास सांगून । तेव्हां विष्णूस दया येऊन । त्यानें घेतलें वराह रुप ॥७॥कैलासीं गणपासी नमून । झणीं पाताळांत गेला नारायण । दाढेच्या टोकावरती घेऊन । पृथ्वीसि वरतीं प्रकटला ॥८॥तेव्हां हिरण्याक्ष आव्हान देत । युद्धाचें अति निर्भयचित्त । नंतर महाघोर युद्ध तयांत । झालें बहु काळ प्रजापते ॥९॥परी शुष्क आर्द्र दंष्ट्रेनें मारित । संध्याकाळीं त्या दुष्टा ठार करित । धरणीसुत वराहा जय लाभत । पुनरपि स्थापी पृथ्वीतें ॥१०॥पृथ्वीची स्थापना करित । वराह मयूरेशाप्रत जात । अक्षर ब्रह्मरुप सर्वांसी होत । ज्ञानदायक त्या वेळीं ॥११॥स्त्रीस्वभावें पृथ्वी सेवित । पत्नी भावें तयाप्रत । कर्ममूलमयी जी प्रख्यात । अक्षराधरा सुखप्रदा ॥१२॥वराह पृथ्वी आचरत । गणेशानुष्ठान भक्तियुक्त । दृढ वास सिद्ध होण्या इच्छित । स्वानंदरुपी क्षेत्रांत ॥१३॥तेव्हां देवनायक गणेश । प्रसन्न होऊन म्हणे ईश । वर मागा जो मनीं विशेष । तेव्हां पूजिती गणनायका ॥१४॥नामाष्टक तें जपिती । सामवेदही प्रेमें गाती । तेव्हां गणेश कृपा करिती । भक्ति जाणती महोग्र त्यांची ॥१५॥नंतर सूर्यासी म्हणती वचन । पृथ्वीवराहा तवांगीं सामावून । शुक्लगतीचे तव द्वार महान । मुक्तिद ऐसी ख्याती असे ॥१६॥सूर्य त्यांची आज्ञा मानित । ते दोघे दारीं स्थित । गणेशाचें उत्तरांग पूजित । पृथ्वी तैसा वराह तें ॥१७॥हें वराहरुपाचें माहात्म्य सांगितलें । तें ज्यानें ऐकिलें । अथवा भक्तिभावें वाचिलें । तरी होय तें सर्व मुक्तिद ॥१८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीपन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते वाराहमाहात्म्यं नामाष्टात्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP