मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ३० खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ३० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत पराशरवरप्रदानम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढें सांगती । वसिष्ठापुढें प्रकटलें गणपति । तेव्हां साष्टांग नमस्कार घालिती । स्तवन करिती यथामती ते ॥१॥आज धरणी झाली धन्य । मातापिता माझीं धन्य । तप आश्रम विद्याव्रतादी धन्य । आपुल्या पददर्शनें गजानना ॥२॥तूं कर्ता कारणांचें कारण । गम्यागम्यमय शांतिपूर्ण । वेदांत ऐसें असें वर्णन । वेदवेत्ते तें जाणती ॥३॥सर्वरुप तूं सर्वहीन । सर्वप्रकाशक महान । योग अभेदमया स्तवन । गणाधिपा कैसें करुं मी? ॥४॥तथापि भक्तिपाश यंत्रित । गजानना स्तवन करित । नामरुपधर तूं कृपावंत । अनुग्रह करण्या आलासी ॥५॥तुझ्या दर्शनें जो बोध झाला । त्यानेंच तुज मी स्तविला । ब्रह्मनायका वेदादींसी वाटला । जरी अगम्य महिमा तुझा ॥६॥गणनाथासी सर्वसाक्षीसी । सर्वाकारा स्वसंवेद्यासी । सिद्धिबुद्धिपते तुजसी । सिद्धबुद्धिप्रदा नमस्कार ॥७॥अमेयशक्तीसी देवदेवासी । असंप्रज्ञाततुंडासी । संप्रज्ञातशरीरा नमन तुजसी । त्यांच्या योगें योगात्मदेहा ॥८॥शांतियोग प्रकाशकासी । शांति योगमयासी । योग्यांसी योगदात्यासी । योगेशा तुला नमन असो ॥९॥वक्रुंतुंडासी एकदंतासी । ब्रह्माकारासी आत्मचिन्ह धारकासी । नमन असो गजाननासी । स्तविता हर्षे कंठ भरला ॥१०॥नाचूं लागला देहभाव सुटून । भक्तिरसांत तो निमग्न । शरीरावरी रोमांच फुलून । महाभक्त तो त्या वेळीं ॥११॥त्यांस पाहून गजानन। भावज्ञ भावपूरक बोले वचन । तूं रचिलेलं हें स्तोत्र उत्तम । भक्तिरसप्रद निश्चित ॥१२॥धर्मार्थ काम मोक्षदायक । होईल जगतीं निःशंक । तुझी भक्ति अचल पावक । माझ्यावरी दृढ होईल ॥१३॥स्मरण करिता तुजसमोर । प्रकटेन मी सत्वर । मुनिसत्तमा तूं मज प्रिय फार । ऐसें म्हणोनी त्या वेळीं ॥१४॥गणाधीश अंतर्धान पावले । माझ्या हृदयीं परी दिसले । त्यांच्या दर्शनें मानस झालें । शांतिपूर्ण माझे तें ॥१५॥गाणपत्य स्वभावें मूर्तिपूजेंत । मन माझें रममाण होत । महाभाग योगिवंद्य होत । वसिष्ठ मी जगतांत ॥१६॥वत्सा तुज हें ज्ञान । शांतियोगप्रद कथिलें महान । शुभ सुखद त्यानें पावन । गणेशातें भज आता ॥१७॥ऐसें ऐकता त्याचें वचन । पौत्र पराशर त्यासी नमून । वनीं जाऊन करी मनन । परम तप गणेशाचें ॥१८॥पितामहें जैसें सांगितलें । तैसें सर्व योगज्ञान आचरिलें । योगभूभींचे क्रमाने त्यागिले । बंध त्यानें योगबळें ॥१९॥अन्तीं गाणपत्य झाला त्यावा पुत्र विष्णु अवतरला । व्यासनामें ख्यात जगाला । तथापि तप घोर त्यानें आचरिलें ॥२०॥वत्सला पत्नीसहित । महाघोर तप आचरित । पुत्रकामार्थ अविरत । महामुनी त्या वेळीं ॥२१॥गणराज स्वयं माझा सुत । व्हावा ऐसी इच्छा करित । दहा हजार वर्षे ऐशी लोटत । गजानन तें प्रसन्न झाला ॥२२॥वर देण्यासी प्रकटात । भक्तिभावें त्याच्या तोषित । त्यास पाहून कर जोडित । प्रणाम करुनी स्तुती करी ॥२३॥पत्नी सहित स्तोत्र गात । गजवक्त्रा तुजसी नमित । निराकारा तुज वंदित । नरकुंजररुपा तुला ॥२४॥गणेशाची निर्गूणासी । गुणाधाररुपा परमात्मयसी । परात्परासी देवयानादि सिद्धासी । अनंत विभवा तुज नमन ॥२५॥अनंत आननधारकासी । अनंत कर-अंध्रि धरासी । गकारासी सर्वहीनासी । माया द्वयवर्जिता नमन ॥२६॥सदा ब्रह्ममयासी । णकारा वंदन करितो तुजसी । गकार णकारांच्या स्वामीसी । गणेशा तुला नमन माझें ॥२७॥स्वानंदवासीसी । पूर्ण भुक्तिमुक्तिप्रदासी । परब्रह्मा नमितों तुजसी । तुझी स्तुती कैसी करुं? ॥२८॥वेदवेदांतानाही अगम्य वाटत । स्वरुप परब्रह्मा तुझें अद्भुत । जरी तुष्ट झालासी मजप्रत । देवेशा तरी पुत्र हो माझा ॥२९॥आमुचा पुत्र तूं होशील । तरी मन माझे स्थिर होईल । आमुचा कुलदेव तूं निर्मल । गणनायका परब्रह्मा ॥३०॥विघ्नपा ब्रह्मभावें तुज भजतों । सदैव तुजला मनीं ध्यातों । संसारांत तुझें इच्छितों । सुतभावें संगोपन ॥३१॥तेणें संसार सफल होईल । ब्रह्म रुपत्व मज लाभेल । त्याची प्रार्थना ऐकून अमल । गणाधीश म्हणे तयासी ॥३२॥योगधारका त्या भक्ताप्रत । पराशरासी गणेश म्हणत । तुझें सफल होईल वांछित । तुझा पुत्र मी होईन ॥३३॥गजासुराचा वध करीन । त्यासाठी तो अवतार घेईन । तुझ्या या स्तोत्रें मी प्रसन्न । त्याचा पाठ इष्टप्रद ॥३४॥जो कोणी हें वाचील । अथवा प्रेमें ऐकेल । भुक्तिमुक्ति त्यास लाभेल । ऐसी वर माझा असे ॥३५॥ऐसें बोलून पावला अंतर्धान । ब्रह्मनायका गजानन । पराशर मनीं प्रसन्न । पत्नीसहित त्या वेळीं ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते पराशरवरप्रदानं नाम त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP