मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ६ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत दक्षकन्यावंशवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढें सांगती । स्वायंभुव होई मनु प्रजापती । धर्मनीतीनें राज्य करी जगतीं । महातेजस्वी गाणपत्यप्रिय ॥१॥शतरुपा त्याची कान्ता । तिजपासून दोन सुत तीन दुहिता । मैथुनमार्गे रममाण होतां । जाहल्या मनुप्रजापतीस ॥२॥प्रियव्रत उत्तानपाद सुत। तीन कन्या आकृति देवहूति प्रसूति ख्यात । सुलोचना त्या समस्त । महात्मा मनू प्रजापतीच्या ॥३॥प्रसूती पुत्री दक्षा तुजसी । आकृती देत रुचि प्रजापतीसी । देवहूती कर्दमासी । देता झाला मनू तें ॥४॥कर्दमानें तप करुन । विष्णू तोषविला महान । शतवर्षांनी प्रसन्न । प्रकटला वर देण्या तयां ॥५॥तेव्हा कर्दम विनवीत । देवा व्हावें माझा सुत । वर तैसा देऊन जात । वैकुंठांत विष्णुदेव ॥६॥त्या वरानुसार जन्मत । देवहूतीच्या उदरीं भगवंत । विष्णु कर्दमपुत्र होत । कपिल नावें प्रख्यात ॥७॥रुचिप्रजापती लाभत । आकुतीपासून जुळें दांपत्य पुनीत । यज्ञ आणिक दक्षिणा ख्यात । ज्यानी जग संवर्धिले ॥८॥यज्ञरुप विष्णु निर्मित । दक्षिणेच्या उदरीं द्वादश सुत । ते यामादेव ऐसे ख्यात । नंतर यज्ञ करी तप ॥९॥स्त्रीसहित योगमर्गानें तोषवित । गणपासी यज्ञ तें विनत । प्रसन्न गणपति वरदान देत । त्यास अद्भुत योगाचें ॥१०॥मणिमयी मूर्ति गणेशाची करुन । चतुर्भुज जी शोभन । नित्य मुनिगणांसहित पूजन । भक्तिभावें करीतसे ॥११॥तेणें गणपति तोषला । त्याच्या वरदानें योगींद्र मुख्य झाला । गाणपत्य तो ख्यात झाला । यज्ञदेव जगतांत ॥१२॥हेरंब नामाचा जप सतत । भक्तिभावें तो करित । शिष्यांसी गाणपत्य योग अर्पित । प्रमुदितमनें सर्वदा ॥१३॥दक्षप्रजापति प्रसूतीसहित । तेव्हा प्रेमें रमामण होत । चोवीस कन्यांसे तें जन्म देत । शक्तीच्या अंश सर्व माना त्या ॥१४॥श्रद्धा लक्ष्मी धृती तुष्टी । मेधा क्रिया तशी तुष्टी । बुद्धि लज्जा वपू शांती । सिद्धि कीर्ति या तेरा सुता ॥१५॥धर्मासी पत्नीत्वें देत । तो दक्ष महामुनी हृष्टचित्त । त्यांची प्रजा पुढें वाढत । वाढत । नावें तिची सांगतों ॥१६॥श्रद्धेचा पुत्र काम होत । अर्थ झाला लक्ष्मीसुत । धृतीचा सुत नियम ख्यात । तुष्टीचा संतोष सुत शोभत ॥१७॥पुष्टीचा लाभ हा सुत । मेधापुत्र शम स्मृत । क्रियेचे दोन पुत्र विख्यात । दंड आणि समय नाम ॥१८॥बुद्धीचा सुत बोध अप्रमाद । लज्जासुत विनय सुखद । वपूचा सुत व्यवसायक मोदद । शांतिपुत्र क्षेम नामा ॥१९॥सिद्धीचा सुत । कीर्तिचा ‘यश’ हा तनय ख्यात । ऐसे हे धर्मपुत्र जगांत । प्रसिद्ध झाले धर्मशील ॥२०॥कामाचा ‘हर्ष’ सुत । आनंद अपर स्मृत । ऐसी ही सुखरुप असत । धर्मप्रजा विनयशील ॥२१॥प्रसंगोपात्त आता कथन । करितों अधर्माच्या प्रजेचें विषण्णमन । ब्रह्मदेवाच्या पाठींतून । एक मिथुन जन्मलें तें ॥२२॥अधर्म हिंसा हें तें मिथुन । त्यांचा पुत्र अनृत होऊन । निकृति नामक सुता जन्मून । भयादिकही उपजले ॥२३॥तैसाच नरक त्यांचा सुत । माया वेदना सुता । मृत्यू दुःखा जन्म देत । मृत्यूपासून निर्माण होत । व्याधी वार्धक्य शोक तृष्णा ॥२४॥क्रोधही त्यापासून जन्मत । अधर्मप्रभव हे सर्वंही ख्यात । संसारकारक दुःखदायक जगांत । ऊर्ध्वरेत प्रसवहीन ॥२५॥अन्य अकरा सुतांचा इतिहास । सांगतों आता तुज सुरस । सती रुद्रास देत । ख्याती भृगूऋषीला ॥२६॥संभूसी मरीचासी । तैसीच स्मृति अंगिरसासी । प्रीती दिती पुलस्त्यासी । पुलहासी वरिलें क्षमेनें ॥२७॥क्रतूस संनती देत । अनसूया अत्रिसी अर्पित । ऊर्जा देत वसिष्ठाप्रत । स्वाहा दिली अग्नीला ॥२८॥स्वधा पितरांसी देत । दक्ष प्रजापती हर्षित । त्यांचा वंश तुज सांप्रत । कथन करीन श्रवण करी ॥२९॥सतीपासून शंकरासी । महाबळ कारिकेय निर्मून त्यासी । देवांच्या सेनापतिपदीं त्यासी । अभिषिक्त केला विधात्यानें ॥३०॥ख्यातीपासून भृगूसी लाभत । लक्ष्मी सुता नारायणप्रिया जी होत । धाताविधाता जावई स्मृत । मेरुपर्वताचे धन्य ॥३१॥मेरुची कन्या अयती वरित । धात्यासी पुत्र तिज होत । मृकंड नामे प्रख्यात । मार्कंडेय पुत्र त्याचा ॥३२॥नियती मेरुकन्या वरित । विधात्यासे तिजही सुत । प्राण नामें विख्यात । वेदशिर पुत्र त्याचा ॥३३॥मरीचीस संभोतीपासून होत । पूर्णमास पुत्र सर्वलक्ष्णमंडित । चार कन्याही ज्या ज्ञात । कृषी वृष्टि कृष्टी अपचिती ॥३४॥पूर्णमासाचे दोन सुत । विरज अणिक पर्वत । पुलहापासून क्षमेस होत । कर्मश्रेष्ठ मुनिपुंगव ॥३५॥आता अत्रीच्या वंशाचें वर्णन । अनसूया त्याची पत्नी शोभन । सोम दुर्वास दत्ताभिधान । तीन पुत्र अत्रि अनसूयेचे ॥३६॥हे तीन देवांचे अंश असती । ब्रह्मा शंकर विष्णु विलसती । दत्तात्रेय योगधर प्रसिद्ध जगती । दुर्वास कोपिष्ट तैसा मुनी ॥३७॥स्मृतीपासून अंगिरसासी होत । कन्या सिनीवाली सुलोचना कुहू विनत । अनुमती ही चवथी असत । पतिव्रता जी प्रसिद्ध ॥३८॥प्रीतीपासून पुलस्त्यास लाभत । अयोनिसंभव एक सुत । पूर्व जन्मीं जो विप्रेश असत । अगस्त्य नामें प्रख्यात ॥३९॥देवबाहु तशीच कन्या शोभिनी । ही दोन अन्य अपत्यें गुणी । संततीपासून क्रतु मुनी । लाभला साठ हजार सुत ॥४०॥ते सर्व ऊर्ध्वरेत । वालखिल्य नामें स्मृत । ऊर्जेपासून वसिष्ठासि होत । सात पुत्र तेजस्वी ॥४१॥चित्रकेतू सुरोचक सुत । विरजा मित्र नामे अन्य ख्यात । उल्बण वसुभृत् द्युमान ज्ञात । शक्ति आदी अन्य पुत्रा ॥४२॥कमलपत्राक्षी कन्या तयाची । स्वाहा भार्या रुद्रात्मक अग्नीची । ती माता तीन सुतांची । अग्निरुपें ते प्रख्यात ॥४३॥पावक पवमान शुचि ख्यात । पंधरा एकोणपन्नास ज्ञात । ते सर्वही यज्ञभाग घेत । पवमान ससुत निर्मथ्य ॥४४॥पावक ससुत वैद्युत शास्त्रसंमत । सूर्यातील अग्नी शूची ख्यात । सर्वत्र संचरे तो रुद्रात्मा उक्त । ब्रह्मपुत्र अग्नि ऐसा ॥४५॥बर्षिषद अमूर्त अग्नींत आप्त । पितर स्वधा दोन सुता जन्मत । मेना धरणीनाम ब्रह्मवित्तम असत । मेनेचे सुत सांगतों ॥४६॥हिमालयापासून होत । मैनाक क्रौच हे दोन सुत । मेनेस कन्याद्वय लाभत । गंगा आणिक पार्वती ॥४७॥लोकपवित्र गंगा वरित । परमेश्वरी पार्वतीही जगतांत । शंकर देवा प्रेमयुत । वरदान प्रभावानें ॥४८॥धरणी मेरुशैलाची कान्ता । आयति नियतीची ती माता । ऐसी दक्षकन्यांच्या संततीची वार्ता । फलप्रद सर्वांसी ॥४९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते दक्षकन्यावंशवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP