मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४८ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत इंद्रपराजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा पुढें सांगत । देवेंद्र ऐसें बोलून त्वरित । रणमंडळीं शरवृष्टी करी अविरत । तारकासुर सैन्यावरी ॥१॥मंत्रित बाणाच्या प्रभावें होत । दैत्य संघात पीडित संत्रस्त । दैत्या सेनानायक सरसावत । देवसेनेवरी बाण सोडिती ॥२॥देववीर अनेक हत । अनेक छिन्नांग रणीं पतित । मिळे तेथे पळून जात । भयभीत देवगण ॥३॥प्रलयकाळीं त्राता नसत । प्रजेसी जेवी जगांत । तैसी देवांची स्थिति होत । संरक्षक कोणी नसे ॥४॥पुनरपी देव धीर धरित । दैत्यांवरी बाणवर्षाव करित । तेव्हां राक्षस मरती बहुत । दैत्याधिप पुढे सरसावला ॥५॥तारकें सुदृढ बाण ओढला । तो प्रज्वलित होऊन वेगें गेला । इंद्राच्या हृदयावरी पडला । तेणें मूर्च्छित झाला तो ॥६॥परी क्षणानंतर सावध होत । वज्र घेई हातांत । दैत्यपुंगवा तारका ताडित । पडला तो धरापृष्ठीं ॥७॥वरुण वन्ही वायु धर्म मारित । अनेक दैत्यांसी रणांत । हाहाकार तेव्हा माजत । दैत्यसेनेंत सर्वत्र ॥८॥परी शुक्राचार्ये सावध केले । तारकादे असुर जे विद्ध झाले । संजीवनी विद्येचे झाले । प्रात्यक्षिक त्या वेळीं ॥९॥तारक असुरांसहित । क्षणीं उठला रणभूमींत । अग्निमंत्रांने युक्त । ऐसा बाण सोडिला तेणें ॥१०॥देवसेनेवरी तो पडत । तेव्हां एक अग्निपुरुष प्रकटत । तो देवांचे भक्षण करित । महाबळवंत प्रलयाग्निसम ॥११॥अग्निज्वाला सर्वत्र पसरत । मेरु मंदारासम सर्वत्र संचरत । देवसंघासी जाळित । भयानक तो पुरुष ॥१२॥हाहाकार माजला देवसैन्यांत । देव दशदिशा पळत । परी त्यांचा पाठलाग करित । आदि पुरुष त्यांसी भक्षण्या ॥१३॥तेव्हा क्रोधसंतप्त । महेंद्र वारुणास्त्र सोडित । तेणें पर्जन्यवृष्टि होत । महावन्हि शांत झाला ॥१४॥त्या अस्त्रानें अग्निपुरुष पडत । रणभूमीवरी पराजित । देवगण सावधान होत । दैत्यां संकट अतिवृष्टीचें ॥१५॥मेघगर्जना भयंकर । वीज चमके सर्वत्र । विद्युज्ज्वालांनी दग्ध असुर । कालौघांतही वाहून गेले ॥१६॥त्या असुरांचे रक्षण करित । तारक वायव्यास्त्र सोडित । मेघ पळाले दशदिशांत । देव सेना उडूं लागली ॥१७॥पाला पाचोळा उडत । तैसे देवसैन्य समरीं पांगत । तारकासुर भयानक सरसावत । खड्गें हाणी इंद्रासी ॥१८॥खड्गाचा होता आघात । देवेंद्र पडला मूर्च्छित । तेव्हां आपुल्या सेनेसहित । तारक स्वगृहीं परतला ॥१९॥मदासुरासी मागें ठेवित । तो मूर्च्छित देवेंद्रा बोधित । पाश आवळले समंतात । अनाथ झाले देवगण ॥२०॥यमास गदाघातें विद्ध करुन । तारक गेला परतून । असुरसेना विजयें प्रसन्न । देव पकडिले तयांनी ॥२१॥अनाथ देवसैन्य पळत । भयाकुल आसमंतात । कोणी मृत कोणी मूर्च्छित । ऐसी स्थिती देवांची ॥२२॥दैत्येंद्रासी विजय मिळाला । त्यांनी आनंदें घोष केला । देवगणांनी आश्रय घेतला । शिवशंकरांचा त्यावेळीं ॥२३॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते इंद्रपराजयो नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP