मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ३२ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ३२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत गजासुरसैन्यवधः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गजासुर सभेंत संस्थित । नारद मुनी तेथ येत । दैत्यनायक त्याचा सन्मान करित । त्यास म्हणे कलहप्रिय तें ॥१॥दैत्याधिपा प्राज्ञा ऐक वचन । हितकारक तूं महान । अरण्यांत आराधिला गजानन । देवमुनींनी भक्तिभावें ॥२॥तुझ्या वधार्थ तो अवतरला । पराशरसुत झाला । कथिला वृत्तान्त हा तुला । आतां करी योग्य तें ॥३॥ऐसी कळ लावून । नारद जाती निघून । त्या दिव्यदर्शनाचें वचन ऐकून । रोषयुक्त झाला गजासुर ॥४॥देवर्षींचा वध इच्छित । जाई जेथ देव मुनी संस्थित । महाबळ वीर दैत्यांसहित । मारु लागला देवांना ॥५॥ऋषिगणांसी जेव्हां मारित । तेव्हां सारे विघ्नपा स्मरत । स्मरताची गणाध्यक्ष प्रकटत । बुद्धिभेद करी गजासुराचा ॥६॥दैत्य तैसा तें वागत । म्हणे हे देव विप्र माझ्या अंकित । हयांना दंड द्यावा समुचित । जेणें सत्त्व हरण होय यांचें ॥७॥नंतर कधी काळीं मारीन । बळयुक्त मी त्यासी पकडून । ऐसा निश्चित संकल्प करुन । गजासुर म्हणे त्यांसी ॥८॥देवांनो मुनिगणांनो साधा हित । माझें वचन ऐका त्वरित । जरी जीवितीं आशा असत । तरी माना आज्ञा माझी ॥९॥हातांनी कान पकडून । आपुलें शिर वाकवून । माझ्या चरणावरी घासून । सत्त्वर क्षमा मागा माझी ॥१०॥ऐसे जरी तुम्हीं कराल । तरी बंधयुक्त व्हाल । अन्यथा शिरच्छेद होईल । देवेशांनो सर्वांचा ॥११॥तुम्ही गणेशा पार्थिला । पराशर घरीं जो सुत झाला । त्याच्यासंगे पाहिजे केला । साष्टांग नमस्कार सर्वांनी ॥१२॥ऐसें त्याचें वचन उद्धत । ऐकतां गणेशासी मनीं स्मरत । विष्णु सामवचन उत्तर देत । आज्ञा मानूं तुझी आम्हीं ॥१३॥तू सांगितला दंड आचरुं । त्या गणेशासी जाऊन विचारुं । त्यास आणून येथ करुं । जैसी आज्ञा केलीत ॥१४॥परी सर्व देवमुनींना सांप्रत । सोडून द्यावें अविलंबित । त्या देवेशासमीप त्वरित । जाऊन आणू त्यास येथें ॥१५॥तुझ्या पादकमलांची सेवा । करुं सर्वही दैत्यरावा । जाण आमुच्या भक्तिभावा । दैत्यराजा भरांत पडली तें ॥१६॥गणेशमायेनें प्रेरित । प्रतापी गजासुर तें मानित । देव ऋषिगण समस्त । सोडून दिले तत्काळ ॥१७॥त्यांसी तेव्हां दरडावीत । पाच दिवसांच्या आंत । जरी न परताल मजप्रत । तरी सर्वांसी ठार करीन ॥१८॥त्याची ती अट मान्य करुनी । सर्वही जाती पराशरसदनीं । गजानन तेथ पाहोनी । साष्टांग दंडवत घालिती ॥१९॥पराशर विस्मित चित्त । त्या सर्वांची पूजा करित । अचानक कां आलांत म्हणत । वृत्तान्त सगळा सांगती ते ॥२०॥गजासुराचें सर्व चेष्टित । पराशरासी ते सांगत । कान पकडूनी आम्ही विनत । कैसें व्हावें असुर चरणीं ॥२१॥त्या नीचासी न करुं नमन । परी मरणा स्वीकारुं प्रसन्न मन । म्हणोनी गजानना करी हनत । देवांचे वा दैत्यांचे ॥२२॥मुद्गल म्हणती दक्षाप्रती । ऐकोनि ही देवउक्ती । स्मित करोनी प्रभू म्हणती । भक्तवात्सल्यपूर्ण ते ॥२३॥चिंता तुम्ही न करावी । व्यथा मनीची विसरावी । माझी युक्ति ऐकावी । हनन करीन गजासुराचें मीं ॥२४॥दैत्येंद्रानें दंड सांगितला । तो सर्वथा मज आवडला । माझ्या चरणासमीप या क्षणाला । तैसा तुम्ही आचरावा ॥२५॥महाघोर दैत्यासी । मारीन मी त्या दुष्टासी । न्यावें त्याच्या सन्निध मजसी । संदेह मानसीं धरु नका ॥२६॥गणेशाचें रम्य वचन । ऐकून हर्षले देवर्षिसत्तम । करिती परस्पर मुखावलोकन । स्मितपूर्वक त्या वेळीं ॥२७॥तेव्हां शंभू हित वचन । सांगती गणेश कुळदेव महान । आमुचा त्याचें वचन । देव ऋषींनो सर्वांनी ॥२८॥ऐसें बोलून कान पकडित । स्वकरांनी शंभू त्वरित । गणेशाचरणीं मस्तक रगडित । तेव्हां मधुर ध्वनि उठला ॥२९॥तो मृदु मधुर शब्द उठत । ऐकता गजानन हृष्ट होत । चरणांवरी त्याच्या ठेवित । अन्य देवही स्वमस्तक ॥३०॥विष्णु भृगु आदि देव नमित । गणेशासी भक्तियुक्त । तेव्हा गजानन परम मुदित । मूषकावरी स्वार झाला ॥३१॥चार आयुधें करी धरित । गजासुरवधार्थ निघत । गणेश महिषपुरात जात । सिंहनाद तें केला ॥३२॥तो सिंहनाद ऐकून । भ्रांत झाले असुर उन्मन । गजासुरही विस्मित मन । गुल्मस्थ असुर हल्ला करिती ॥३३॥परी ते सर्व विद्ध झाले । छिन्न विहीनांग धावले । गजासुरासी सांगितलें । त्यांनी भयप्रद तें वृत्त ॥३४॥असुर म्हणती राजेश्वरा । आता आमुचें रक्षण करा । गणेशाधारें देवमुनिवरा । बळ अद्भुत प्राप्त झालें ॥३५॥ते सारे मदोन्मत्त । मारिती आम्हा युद्धांत । त्यांचे वचन ऐकून म्हणत । महा प्रतापी गजदैत्य ॥३६॥सर्व दैत्यांनी सज्ज व्हावें । युद्धभूमिवरी जावें । माझ्या मागून तुम्ही यावें । पराक्रम माझा पहावा ॥३७॥स्वतः होऊन सुसज्जित । रथांत तो बैसत । दैत्यसैन्य पाठून जात । पडले महिषपुराबाहेर ॥३८॥अपारसेनेसमवेत । गजासुर तेथ येत । गजानन त्यासी पाहत । प्रसन्न झाला काळभयद ॥३९॥गजासुर आज्ञा देत । दैत्यनायकांसी त्वरित । मारा सुरमुनी समस्त । यक्ष विद्याधरही सारे ॥४०॥दैत्येंद्रासी आज्ञा सुटत । असुर विजयेच्छू हल्ला करित । शस्त्रास्त्रांनी मारुं लागत । देवामुनींना त्या वेळीं ॥४१॥देवहो क्रोधसंयुक्त । जिंकू किंवा मारु म्हणत । नानाविध शस्त्रास्त्रांनीं प्रहरत । दैन्यसैन्य तें महान ॥४२॥देव दैत्यांचें परमदारुण । युद्ध चाललें होई हनन । उभयतांचे ओढवलें मरण । रक्ताच्या नद्या वाहती ॥४३॥दैत्यगण प्रहारपीडित । भग्न झाले रणागणांत । लाज सोडून तेव्हां पळत । रणभूमी सोडून तें ॥४४॥तें पाहू न दैत्यराज विस्मित । आवाहान करी दैत्यवीरांप्रत । ते देवसेनेसी पीडित । महाबळी देवांसी मारिती ॥४५॥परी इंद्रादी देव लढती । महाशौर्य दाखवितो । असुर बहू ठार मारिती । कित्येक मूर्च्छित ॥४६॥हाहाकार फार माजला । दैत्य गणांत आकांत झाला । दश दिशा पळूं लागला । असुरवीरांचा समुदाय ॥४७॥तें पाहून गजासुर मनांत । झाला अत्यंत विस्मित । म्हणे काय हें विपरित । अग्नि कैसा शीतल झाला ॥४८॥माझी सेना पराजित । देवांनी केली आज निश्चित । हे कैसें घडलें अकल्पित । संतापला गजासुर तें ॥४९॥क्रोधें आरक्त त्याचे लोचन । रथारुढ तेव्हां होऊन । युद्ध करण्या जाई तत्क्षण । गजासुर तो स्वयं वेगे ॥५०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते गजासुरसैन्यवधो नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP