TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
होळी

भारूड - होळी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


होळी
१००५.
अवघेचि बोंबलती । होळी भोंवते भोविती ॥१॥
मायाहोळी प्रज्वळली । सृष्टि वेढारे लाविली ॥२॥
ज्याकारणे गुंडाळती । तेचि वाचे उच्चारती ॥३॥
होळीमध्ये खाजे आहे । ते तूं विचारुनि पाहे ॥४॥
खाजे खातां सुख होय । परी कठिण हातां नये ॥५॥
खोल दृष्टीने पाहिले । खाजे त्याच्या हातां आले ॥६॥
एक झडा घालूं जाती । लंडी चकचकून पळती ॥७॥
एक देहाचे पांगिले । ते आंगी हुर्पळले ॥८॥
उडी अवघ्यांचीच पडे । परि ते हातांसी न चढे ॥९॥
एके थोर धिंवसा केला । खाजे घेऊन पळाला ॥१०॥
एक आपणचि खाती । एक सकळांसि वांटती ॥११॥
एक घेऊन पळाले । परी कवंठी वरपडे जाले ॥१२॥
रामीरामदासी होळी । केली संसाराची धुळी ॥१३॥

१००६.
अझुनि काय रे दुश्चित । सावधान होईं आतां ॥१॥
नागविले योनीद्वारे । म्हणोनि बोंबलती पोरे ॥२॥
सकळ नाडियेले वोजे । अवघी एक बोंब गाजे ॥३॥
धूळी टाकिती मस्तकी । कोणी दाद घेईना की ॥४॥
राडी ऐसे नर्क होती । म्हणोनि प्रत्यक्ष दाविती ॥५॥
झोंबी लोंबी घेऊनि । जाती टाकिती नेऊनि ॥६॥
नेघे नेघे म्हणती बळी । बळे घालिती पाताळी ॥७॥
धरुनि अकस्मात नेती । अवघी कौतुक पाहती ॥८॥
तेथे असेना मर्यादा । थोर करिती आपदा ॥९॥
घरोघरी फेरे करिती । तैशा होति पुनरावृत्ति ॥१०॥
रामदास सांगे खूण । जावे संतासी शरण ॥११॥

१००७.
शिमग्याचा खेळ बोंबेचा सुकाळ । बोलणे बाष्कळ जेथे तेथे ॥१॥
जेथे तेथे भंड उभंड वाचाळी । राख माती धुळी शेणकाला ॥२॥
शेणकाला पाणी तडक मारिती । तेथे न्यायनीती कोठे आहे ॥३॥
आहे तेथे आहे विचारुनि पाहे । बाष्कळ न साहे नेमकासी ॥४॥
नेमकाचा संग भाग्याचा उदय । दास म्हणे जय प्राप्त होतो ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:49.8670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गायीचो पाडो खंय तरी वाढो

  • मूल कोठे तरी सुखरूप असूं दे, या अर्थी. 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.