TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भक्तिपर अभंग

विविध विषय - भक्तिपर अभंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


भक्तिपर अ

५०७ .

तत्त्वमसि महावाक्याचा उपदेश । पाहिला निरास चौदेहांच ॥१॥

तयांमध्ये सार मानली साचार । भक्ति निरंतर राघवाची ॥२॥

कुंडलिनि गोर्‍हाट श्रीहट त्रिकूट । आणि मूळपीठ ब्रह्मरंध्र ॥३॥

मंत्र तंत्र मुद्रा आसन समाधि । दास म्हणे बुद्धि देखण्याची ॥४॥

५०८ .

ज्ञानेविण निर्नासिक । न ये संताचे सन्मुख ॥१॥

असोनि इंद्रिये सकळ । काय करावी निर्फळ ॥२॥

नाही कथा निरुपण । हे चि बधिरा श्रवण ॥३॥

नाही देवाचे वर्णन । ते गे तेंचि मुकेपण ॥४॥

नाही पाहिले देवासी । अंध म्हणावे तयासी ॥५॥

नाही उपकारा लाविले । ते गे ते चि हात लुले ॥६॥

केले नाही तीर्थाटण । व्यर्थ गेले करचरण ॥७॥

काया नाही झिजविली । प्रेतरुप चि उरली ॥८॥

नाही देवाचे चिंतन । मन हिंडे जैसे श्वान ॥९॥

नये परमार्थी बोलणे । जिव्हा नाही तेणे गुणे ॥१०॥

दास म्हणे भक्तिविण । अवघे देह कुलक्षण ॥११॥

५०९ .

भक्ति रामाची करावी । वंशावळी उद्धरावी ॥१॥

तनु मन आणि धन । सर्व लौकिक सांडून ॥२॥

पांच पंचकांचा भार । सर्वकाळ अत्यादर ॥३॥

रामीरामदास म्हणे । दृढ भक्तीचेनि गुणे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-24T09:44:05.1100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गिलावा

  • पु. १ लेप ( भिंतीस दिलेला चुना , माती इ . चा ); चुन्याचा अगर मातीचा थर ; गारा . २ लिंपण ; सारवण . [ फा . गिल = माती + आवा ; फा . गिल्ला = ओली ; गिल्लावा = तयार माती . तुल० प्रा . दे . गिलोइया , गिलोई = भिंतीची खपली ] 
  • ना. थर , लिंपणे , लेप , सारवण ( भिंत ); 
  • m  Plaster (as of a wall). 
  • ना. पाणी , मुलामा ( देणे , चढवणे ). 
RANDOM WORD

Did you know?

वारी म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.