TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
झडपणी

भारूड - झडपणी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


झडपणी
९३६.
पंचभूतांची झडपणी । जाली जीवासी जाचणी ॥१॥
पूर्वस्मरण राहिले । आणि आंगी घुमारिले ॥२॥
बाधा जाहली अंतरी । मना आले तेंचि करी ॥३॥
बोलो जातां सारासार । त्यासि कळेना विचार ॥४॥
जड देहाचि भावना । समजेना ओळखेना ॥५॥
रामीरामदास म्हणे । संत बोलावा शाहाणे ॥६॥

९३७.
आले संत पंचाक्षरी । शब्द मारिती अंतरी ॥१॥
पोटी प्रस्तावा घालती । अनुतापे पोळविती ॥२॥
दुःखमूळ हा संसार । विवेकाचा फोकेमार ॥३॥
धिःकाराचा धूर देती । तेणे होतसे विपत्ती ॥४॥
संसाराची रक्षा भली । त्याचे अंगी बाणविली ॥५॥
दास म्हणे ते निगुती । प्राणियास बोलविती ॥६॥

९३८.
कोण कोठील आहेसी । आम्हां सांग निश्चयेसी ॥१॥
स्थूळ सूक्ष्म कारण । सांग तुझे कोण स्थान ॥२॥
पिंड ब्रह्मांड रचना । अष्टदेहविवंचना ॥३॥
पिंड ब्रह्मांड तुझे स्थळ । किंवा तत्त्वांचा पाल्हाळ ॥३॥
सांग मायेचे अरण्य । किंवा तुझे ब्रह्मारण्य ॥५॥
रामीरामदास म्हणे आतां बोला हे स्मरणे ॥६॥

९३९.
चहुं निगमीची बीजे । कानी सांगितली सहजे ॥१॥
तेणे प्राणी उमजला । पाहे विचार आपुला ॥२॥
नित्यानित्य हा विचार । केला विवेक साचार ॥३॥
संतस्वरुप दाविले । अंता अनंता भाविले ॥४॥
नाना साधनी सायासी । दृढ केले निश्चयेसी ॥५॥
दास म्हणे निरुपणी । केली भूतांची झाडणी ॥६॥

९४०.
कांही एक उमजले । पुन्हां संदेही पडिले ॥१॥
म्हणे मज खाया देणे । मग संदेह सांडणे ॥२॥
आले मीपणासरिसे । मनी विषयसंतोषे ॥३॥
येणे निष्ठेसी सांडिले । मग आम्हां सांपडले ॥४॥
देहबुद्धीचे अज्ञान । मागे संशयाचे ज्ञान ॥५॥
रामदासी उमजले । भूतांपासुनि सोडविले ॥६॥

९४१.
पंचभूतांचे अज्ञान । गेले निःशेष निघोन ॥१॥
म्हणे येथे काय जाले । जन कासया मिळाले ॥२॥
मी तो आहे सावधान मज कां केले बंधन ॥३॥
पूर्वस्मरण मजला । भूत लागले जनांला ॥४॥
मी तो वस्तूचि केवळ । वायां मिळाले सकळ ॥५॥
रामीरामदास म्हणे । संतकृपेचेनि गुणे ॥६॥

९४२.
( पद; राग-काफी; ताल-धुमाळी )
मायेचे घुमारे । सर्व आंगी भरले वारे ।
धरुनी उदंड शरीरे । लहान थोरे नाचती ॥१॥
भूतांपरते भूत । तयांपरते महद्भूत ।
गुज जाणतील संत । महंत खूण सांगती ॥२॥
पंचभूते नाचविते । पंचभूते खेळविते ।
तयाकरितां भुतेकेते । एके ठायी नांदती ॥३॥
एको विष्णो महाद्भूत । पृथक भूते अनेक भूते ।
ऐसे बोलिला भगवंत । गीतेमध्ये अर्जुना ॥४॥
जे जे जयाला ध्याती । ते ते तया लोकां जाती ।
संगत्यागे सुखी होती । महानुभाव सज्जन ॥५॥
भूते भूत ते झाडिले । दासे आत्मनिवेदिले ॥
पंचभूतिक सरले । निवारले भवभय ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:41.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

imperfect dielectric

  • न्यून पराविद्युत 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.