TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
८११.
कर्ता तूं नव्हेसी करविता नव्हेसी । जाण निश्चयासी आलया रे ॥१॥
चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा । जीवविती कळा देवापासी ॥२॥
देवे केले अन्न केले ते जीवन । तेणे पंचप्राण स्थिर जाले ॥३॥
दास म्हणे मना तुज देवे केले । मग त्वां देखिले सर्व कांही ॥४॥

८१२.
आई आदिपुरुष हेंचि विचारावे । आपुले करावे समाधान ॥१॥
समाधान होय देव देखिलीयां । देवेविण वायां शिणो नये ॥२॥
शिणो नये देव असोनी सर्वत्र । हे तो देहयंत्र नाशिवंत ॥३॥
नाशिवंत देहो त्या नाही संदेहो । दास म्हणे पाहो परब्रह्म ॥४॥

८१३.
गगना लावूं जातां पंक । लिंपे आपुला हस्तक ॥१॥
ऊर्ध्व थुंकतां अंबरी । फिरोनी पडे तोंडावरी ॥२॥
हृदयस्थासी देता शिवी । ते परतोनी झोंबे जिवी ॥३॥
प्रतिबिंबासी जे जे करी । ते आधींच तोंडावरी ॥४॥
रामीरामदासी बुद्धि । जैसी होय तैसी सिद्धि ॥५॥

८१४.
बहुसाल शीण होतसे कठिण । देवासी जतन करावया ॥१॥
करावया भक्तिभावे महोत्साव । देवासाठी राव वोळगावा ॥२॥
वोळगावा राव राखावया देव । देवासी उपाव मनुष्याचा ॥३॥
मनुष्याचा देव पूजितां कष्टलो । कासावीस आलो वाउगाची ॥४॥
वाउगाचि देव पाषाणाचा केला । भाव हा लागला तयापासी ॥५॥
तयापासी मन अखंड लागले । तो तया फोडिले कोण्हीएके ॥६॥
कोण्हीएके बरा विवेक पहावा । देवा आदिदेवा ओळखावे ॥७॥
ओळखावे देवा निर्मळ निश्चळा । निर्गुणा केवळा निरंजना ॥८॥
निरंजना देवा कोण्ही उच्छेदिना । फुटेना तुटेना कदाकाळी ॥९॥
कदाकाळी देव पडेना झडेना । दृढ उपासना रामदासी ॥१०॥

८१५.
कर्ता तो कारण हेंचि अप्रमाण । कुल्लाळ रांझणे केंवी घडे ॥१॥
केंवी घडे ब्रह्म आकारासी आले । तेणे गुणे जाले सर्वब्रह्म ॥२॥
ब्रह्म तेंचि सर्व सर्व तेंचि ब्रह्म । दास म्हणे भ्रम मावळेना ॥३॥

८१६.
एकवीस स्वर्ग विस्तारला । देव संपुष्टी घातला ॥१॥
केले देवासी बंधन । तेंचि पावला आपण ॥ध्रु०॥
देव ठायींचा अनंत । त्यास भावी अंतवंत ॥२॥
रामदास म्हणे भावे । जैसे द्यावे तैसे घ्यावे ॥३॥

८१७.
सर्व ब्रह्म ऐसे बोलिले लौकिके । परी हे विवेकी मानिजेना ॥१॥
मानिजेना जैसे नाथिले आभाळ । की ते मृगजळ वाउगे ॥२॥
वाउगेचि आहे सर्व पंचभूत । नव्हे तो अनंत भूतांऐसा ॥३॥
भूतांऐसा देव कदां मानूं नये । वेगी धरी सोय शाश्वताची ॥४॥
शाश्वताची सरी मायिकासी देणे । काय विचक्षणा मानिजेल ॥५॥
मानिजेल ब्रह्म पदार्थासारिखे । तेथे एक मूर्ख विश्वासती ॥६॥
विश्वासती परि सर्वही मायिक । सर्वातीत एक परब्रह्म ॥७॥
परब्रह्म सर्वी सर्व परब्रह्मी । गेलियाने ऊर्मि चोजवेल ॥८॥
चोजवेल सत्य जाण यथातथ्य । तेंव्हा सर्व मिथ्य जाणवेल ॥९॥
जाणवेल ब्रह्म निर्मळ निश्चळ । दृश्याचा विटाळ जेथे नाही ॥१०॥
जेथे नाही द्वैत त्या नांव अद्वैत । भक्ताचा एकांत निःसंदेह ॥११॥
संदेह तयाचे तोंडी पडो माती । देव आदिअंती एकरुप ॥१२॥
एकरुप देव येर सर्व माव । हाचि दृढ भाव ज्ञानियांसी ॥१३॥
ज्ञानियांसी खूण पूर्ण समाधानी । धन्य तेचि जनी दास म्हणे ॥१४॥

८१८.
स्वरुप सांडुनी मीच देह भावी । तो जीव रौरवी पचईल ॥१॥
पचईल नर्की देहाच्या संबंधे । सज्जनांच्या बोधे सांडवला ॥२॥
सांडुनी विवेक वेद महावाक्य । जीवशिवा ऐक्य जयाचेनि ॥३॥
जयाचेनि तुटे संसारबंधन । तयाचे वचन दृढ धरा ॥४॥
दृढ धरा मनी अहं ब्रह्म ऐसे । सांगतो विश्वासे रामदास ॥५॥

८१९.
ताकही पांढरे दूधही पांढरे । चवी जेवणारे जाणिजे ते ॥१॥
जाणिजे ते चवी गूळसाखरेची । पाहतां तेथेंचि भेद आहे ॥२॥
भेद आहे तैसा अभेदाचे परी । जाणिजे चतुरी दास म्हणे ॥३॥

८२०.
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ॥१॥
शोधितां शोधितां मीपणचि नाही । मीपणाचे पाही मूळ सर्व ॥२॥
मूळ बरे पहा नसोनियां रहा । आहां तैसे आहां सर्वगत ॥३॥
सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:26:35.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

off-and-on

  • मधूनमधून 
  • मधूनमधून 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site