TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उपदेशपर

विविध विषय - उपदेशपर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


उपदेशपर
६१२.
गर्भवासी दुःख होय वनितांसी । काय पुरुषांसी दुःख नाही ॥१॥
दुःख नाही नरा त्रिविध तापांचे । किंवा मरणाचे दुःख नाही ॥२॥
दुःख नाही ऐसा कोण आहे जन । सर्व पराधीन दास म्हणे ॥३॥

६१३.
स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळो लागे ॥१॥
स्वप्न वेगी सरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहीकडे ॥२॥
दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरे । भ्रमिष्टासी बरे निद्रासूख ॥३॥

६१४.
अस्त्रियांचे जिणे पराधेन जाले । पुरुषे विकिले आपणासी ॥१॥
आपणा विकिले या पोटाकारणे । पराधेनपणे सहजचि ॥२॥
सहजांचे जाले सर्व पराधेन । सत्यचि वचन दास म्हणे ॥३॥

६१५.
श्रोती व्हावे सावधान । मना आले ते गाईन ॥१॥
ताळ जातो एकीकडे । माझे गाणे भलतीकडे ॥ध्रु०॥
शेंडा मुळ ते नाकळे । माझे गाणे चि मोकळे ॥२॥
रामीरामदास म्हणे । जेणे गुंतती शाहाणे ॥३॥

६१६.
राग मूर्च्छना कळेना । ताल ध्रृपद वळेना ॥१॥
यावेगळे सर्व ठावे । श्रोती सावधान व्हावे ॥ध्रु०॥
अर्थ प्रबंध विचार । न कळे कांही पाठांतर ॥२॥
भक्तिज्ञानाचा विश्वास । नाही म्हणे रामदास ॥३॥

६१७.
गळे बांधले पाषाणी । आत्मलिंग नेणे कोणी ॥१॥
जीव जीवाचे स्वरुप । कोण जाणे कैसे रुप ॥२॥
लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ॥३॥
रामीरामदास म्हणे । भेद जाणती शहाणे ॥४॥

६१८.
अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ॥१॥
ऐसे जनाचे करणे । कैसा संसार तरणे ॥२॥
देव व्यापक सर्वांसी । त्यासी म्हणती एकदेशी ॥३॥
रामदासी देव पूर्ण । त्यास म्हणती अपूर्ण ॥४॥

६१९.
आला आला रे बागुल । म्हणतां शंका धरिती मुले ॥१॥
परि ते शाहाणे जाणती । तैसी माया हे मानिती ॥२॥
मृग म्हणती मृगजळ । अवघे दाटले तुंबळ ॥३॥
पाहो जातां दृष्टिबंधन । मूर्खा वाटे समाधान ॥४॥
पाहे स्वप्नींची संपत्ति । सत्य मानी मंदमति ॥५॥
रामीरामदास म्हणे । ऐसी मूर्खाची लक्षणे ॥६॥

६२०.
पोते आहे खांद्यावरी । गेले म्हणुनी हांका मारी ॥१॥
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणा आपण ॥२॥
नेणोनियां जनां पुसे । पाहो जातां हाती वसे ॥३॥
शोके जाला रे विकळ । पाहो जातां कंठी माळ ॥४॥
वस्तु बांधोनि पदरी । पुसतसे घरोघरी ॥५॥
रामदास म्हणे जना । जवळी असोनी कळेना ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-26T07:49:46.6230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

security of employment

  • सेवायोजनाची सुरक्षितता 
  • सेवायोजनाची सुरक्षितता 
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.