TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
स्वप्न

भारूड - स्वप्न

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


स्वप्न
१००१.
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
सपनिं सपन वो बाईये ॥ध्रु०॥
टाळमृदंगध्वनि उमटति गगनी ।
ऐकोनि माझिये मनी आनंदू वाटे ॥१॥
पाहो जातां नीट दिसे लखलखाट ।
देखोनि लक्षितां धीट होऊनि गेलो ॥२॥
ऐसे मज दाखवीले म्यां डोळां देखिले ।
जागे होउनि पाहिले आतां न दिसे ॥३॥
तैसे देखावे वाटे पहावया प्राण फुटे ।
तंव येऊनि भेटे स्वामी माझा ॥४॥
तेणे नवल केले पाहणे उडविले ।
दृश्यावेगळे दाखविले स्वरुप माझे ॥५॥
पाहतांहि अनेक सकळही मीच एक ।
एकपणाचे कौतुक वाऊगे जाले ॥६॥
भेद हा उडाला अभेद बुडाला ।
कोणे लेखी मोक्षाला मिटावे तेथे ॥७॥
स्वप्नाची होळी केली जागृति जागी जाली ।
असेल अनुभवा आली अनुभवियासी ॥८॥
ऐसी जागृति जाली रामदासी पाहिली ।
स्वप्न होउनि गेली तत्काळचि ॥९॥

१००२.
( राग-काफी; ताल-धुमाळी )
सघन गमले, मन सघन गमले ॥ध्रु०॥
निद्राकाळी स्वप्न देखिले जागृती गेले ॥१॥
मायिक जे ते मायिक जाले । प्रत्यया आले ॥२॥
आले ते ते अभ्र उडाले । तैसे हे जाहले ॥३॥
दास म्हणे रे चंचळ गेले । निश्चळ ते उरले ॥४॥

१००३.
( राग-प्रभाती; ताल-धुमाळी )
वृत्तिवरी नवचे वृत्तिवरी नवचे बापा ।
निवृत्तीपदी राहि स्वात्मसुख पाही न लिंपे या
भवपापा कामक्रोधमदमत्सरतिरस्कारे जाजावीले परोपरी ।
जागृतीचे सुख स्वानंदाचे मुख असतां चि ठेले पै दुरी ।
पडलो शोकाते सद्गुरु माउलीये चेवविले दैवे करी रे रे ॥१॥
ऐसे दुस्वप्न सरले महद्भय हरले जागृती पाहाले सुख ।
पाहातो आत्मदृष्टी दुजे नाही सृष्टी तेणे ओसंडला हरुष ।
परी वृत्तिशय्येहुनी झडकरी उठोनी निवृत्तीआसनी बैसे ।
अविद्याउर्मी पुढती लागल्या नेत्रपति
सवेंचि विन्मुख होसी दुःखोन्मुख रे रे ॥२॥
ऐसा रामे रामदास चेवविला आपे आपणियाते विसरोनि ठेला ।
तेथे जागृती मन ना उन्मन आठव विसर हारपला ।
तेथे देही ना विदेही जनी ना विजनी सहजी सहज स्थिरावला रे रे ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:49.1800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

dimensional accuracy

  • परिमाणी अचूकता 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site