TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
संतसंग

विविध विषय - संतसंग

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


संतसंग

३२४ .

पाहतां दिसेना तेंचि बरे पाहे । तेथे रुप आहे राघवाचे ॥१॥

राघवाचे रुप जाणावे अरुप । सिद्ध सस्वरुप निराकार ॥२॥

निराकार राम देखतां विश्राम । दुरी ठाके श्रम संसारीचा ॥३॥

संसारीचा श्रम राघवी असेना । परी तो दिसेना राम डोळां ॥४॥

राम डोळा आहे अनुभवे पाहे । मीपण न साहे रामरुपी ॥५॥

रामरुपी राम हेंही दोनी नाही । तेथे मना राही सर्वकाळ ॥६॥

सर्वकाळ रामदर्शन होतसे । निर्गुणी विश्वासे मन माझे ॥७॥

मन माझे रामरुपी हे संचरे । तेणे देही भरे विदेहता ॥८॥

विदेहता देही अलक्ष लक्षावे । निःशब्द बोलावे संतसंगे ॥९॥

संतसंगे घडे निःसंगाचा संग । राघवाचा योग रामदासी ॥१०॥

३२५ .

ब्रह्मा विष्णु रुद्र जयाचे अवतार । तोचि देव थोर जाण बापा ॥१॥

जाण बापा देव देवांसि निर्मिता । तो एक तत्वतां ठायी पाडी ॥२॥

ठायी पाडी देव साधूचे संगती । दास म्हणे गति पावशील ॥३॥

३२६ .

जन्मोजन्मीचा सांगात । भेटि जाली अकस्मात ॥१॥

आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥२॥

सदां नित्य निरंतरी । देव सबाह्य अंतरी ॥३॥

त्याग करिता संयोग । नव्हे कल्पांती वियोग ॥४॥

दास म्हणे संती केले । देवां भक्तां मेळविले ॥५॥

३२७ .

सर्व धर्म कर्म हातीचे सांडावे । सत्वर धुंडावे शाश्वतासी ॥१॥

शाश्वतासी ठायी पाडावे विवेके । निरुपणी एके साधुसंगे ॥२॥

साधुसंगे बोध साधूनियां घ्यावा । वेगे चि करावा चमत्कार ॥३॥

चमत्कारे आतां प्रचीत बाणावी । स्थिति ओळखावी सज्जनाची ॥४॥

सज्जनाची स्थिति सज्जन जाणती । साधकासि गति दास म्हणे ॥५॥

३२८ .

देव जवळी अंतरी । भेटी नाही जन्मवरी ॥ध्रु०॥

भाग्ये आले संतजन । जाले देवाचे दर्शन ॥२॥

मूर्ति त्रैलोकी संचली । दृष्टी विश्वाची चुकली ॥३॥

रामदासी योग जाला । देही देव प्रगटला ॥४॥

३२९ .

संत सज्जनांचा मेळा । त्यासि लोटांगण घाला ॥१॥

तेथे जाउनि उभे रहा । रामदास नयनी पहा ॥२॥

गुण श्रीरामाचे गाती । कथा रामाची ऐकती ॥३॥

तेथे रामही असतो । कथा भक्तांची ऐकतो ॥४॥

जेथे राम तेथे दास । सदृढ धरावा विश्वास ॥५॥

३३० .

बाळकालागी जेंवि न विसंबे जननी । आम्हां संतजनी न विसंबिजे ॥१॥

तुम्ही कृपासिंधु मी तुमचे पोसणे । म्हणुनी निरुपण न विसंबिजे ॥२॥

रामदास म्हणे मी लडिवाळ तुमचे । विसंबतां न वांचे क्षणभरी ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-07T22:14:39.7930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

optic nerve

  • दृष्टि चेता 
  • दृष्टि चेतनी 
  • Anat. नेत्र चेता 
  • दृकतंत्रिका 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.