TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०३६.
( चाल-श्रीगुरुचे चरणकंज; ताल-दादरा )
सगुण शाम राम मनी ध्यावा हो बाई ॥ध्रु०॥
जनकसुतारमण तापशमन चापधारी ॥
दिनकरसम अनुपम तप भ्रमतमशम वारी ॥१॥
मदनतुल्य वदन सदन शांतिचे विलोका ॥
सुखकारक भयदारक हारक भवशोका ॥२॥
संतसंग धरुनि करुनि दास्य तरुनि जाऊं ॥
गिरिजाधर महिजावर दास म्हणे गाऊं ॥३॥

१०३७.
( राग-धनाश्री; ताल-दादरा )
स्वामी मी धामीं कासया राहो ।
दुःखे वियोगे केंवि साहो ॥ध्रु०॥
राम वनासी जातां मागे लागली सीता । नववधु जनकदुहिता ।
पतिवियोग न साहे पतिव्रता । हर्षे निर्भर रामासवे जातां ॥१॥
राम म्हणे शयनी राहे राजभुवनी । आहो उपभोग भोगी तूं स्वजनी ।
कष्टसी तूं थोर घोरवनी । वेळु न गमे तुजविण जनी ॥२॥
नयनी जळवृष्टी चरणी घातली मिठी । अहो उदास न करी जगजेठी ।
रामा वांचुनी अंधार सृष्टी । रामवियोगे न मने भोगवृष्टि ॥३॥
सवे प्राणपती मज कैंच्या विपत्ती । सर्व सेवा करीन मी प्रेमप्रीती ।
त्याचे सेवने सुखासि विश्रांती । चंद्रदर्शने चकोरासि तृप्ती ॥४॥
भक्ति जनकबाळी नव्हे रामावेगळी । रामहि तयेसि जवळी ।
नित्य नूतन प्रीतीची नव्हाळी । रामीरामदास हृदयकमळी ॥५॥

१०३८.
( राग-धनाश्री; ताल-दादरा )
जावा ना जावा ना राम वाटताहे । नयन सजल कंठ दाटताहे ।
सर्व हि सांडुनि जातो उदासिन ॥१॥
नगर उद्वस वाटे पाहवेना । रामाचा वियोग आम्हां साहवेना ।
जीव हा व्याकूळ जातो राहवेना ॥२॥
तोडिली तोडिली येणे सर्व आस । सेविला कठीण थोर वनवास ।
धुंडित चालिले रामीरामदास ॥३॥

१०३९.
( राग-ध्रुवक किंवा केदार; ताल-त्रिताल )
काय रे निष्ठुर रामा । सांडूनी जातोसी आम्हां ।
तुजविणे गुणधामा । कंठवेना ॥ध्रु०॥
तुझीया वियोगे जाण । मी न ठेवी प्राण ।
लटिके केली तरि आण । मजला तुझी ॥१॥
धनुष्य भंगिले हेळा । वरिली जनकबाळा ।
तया मागींचा सोहळा । वनवासी ॥२॥
रामीरामदासी भाव । बंदी पडले ते देव ।
सर्व सांडुनियां धांव । घातली रामे ॥३॥

१०४०.
( राग-मारु; ताल-विताल )
जाऊं नको रे रामा । जाऊं नको रे ॥ध्रु०॥
तुजविण देश वाटे विदेश । कां करिसी उदास ॥१॥
राज्य त्यजावे त्वां नवजावे । भाकेसि रक्षावे ॥२॥
रामदासस्वामी उदास । सेवीला वनवास ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:48:13.7730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नऊ पायक, दहावा नायक

  • ही म्हण वरच्या म्हणीच्या उलट आहे पण ही सयुक्तिक आहे 
  • नऊ शिपाई दहावा नाईक. 
  • नऊ इद्रियावर दहाव्या मनाचा ताबा असतो. 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.