TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०६१.
( राग-बिलावल; ताल-झंपा )
प्रभू रामराजा प्रभू रामराजा । प्रभू रामराजा कपी भार फौजा ॥ध्रु०॥
लागली रणतुरे । भार भारी भरे । मारिती नीकुरे एकमेकां ।
सकळ निर्जरबळे । बंदजर्जर सळे । कोंडिले कूटिले रावणाने ॥१॥
उठावले भार । मांडला भडमार । होतसे संव्हार समरंगणी ।
खवळली कपिदळे । चालिली तुंबळे । एकमेकां बळे झोडिताती ॥२॥
दैत्य काळे कडे । चालिले मेहुडे । भार भारी भिडे स्वामीकाजा ।
हस्त उठावेल । स्वार चौताळले । पायिंचे धांवले लखलखाटे ॥३॥
चालिले अचळ । मेरु मंद्राचळ । रीस गोलांगुळ तैशापरी ।
एक हुंकारती । एक भुभुःकारती । एक ते थारती अंतराळी ॥४॥
थोर हलकालोळ । कपीवीर कल्लोळ । टाकिती अचळ शृंगसीळा ।
होतसे चकचूर । श्रोणितांचे पूर । धुरेवरी धूर । गांठि घाली ॥५॥
करर करर करर । भरर भरर भरर । सरर सररसरर बाण जाती ।
दोही दळी घात । मांडला कल्पांत । धुकट ज्वाला जात धुंद जाली ॥६॥
धिमिकी धिमिकी नभी । दाटल्या दुंदुभी । रणदेवता उभी ग्रासितसे ।
हे मही डळमळी । सागरु खळबळी । दाटली पोकळी बाणजाळी ॥७॥
कडकड कडीत । कडकड कडीत । कडकड कडीत कटक कापे ।
बाण ते पसरती । रिपुदळे घसरती । अद्भुते कसरती देव दैत्य ॥८॥
लखलख लखीत । लखलख लखीत लखलखीत भाली ।
तेज हेलावले । ब्रह्मांड बिंबले । चकित चाकाटले कटक कांपे ॥९॥
शंकराच्या वरे । मस्त रजनीचरे । निर्जरे दैन्यवाणी ।
देव जाजावले । रघुराज पावले । दास उठावले मारिताती ॥१०॥

१०६२.
मंचकभंगा पाहुनी प्लवंगा । आनंद बहु जाला मानसी ॥ध्रु०॥
रामचरण ठेवितां कडकडे । साध्वीहृदय तेव्हांचि गडबडे ।
दाशरथी ते पाहुनी मुरडे । व्याकुळ ती जाहली अबला ॥१॥
अरे मर्कटा खुटिया केला । घात मंचक हा कोरविला ।
सच्चितसुख रघुविर हा आला । स्वपतिमृत्युते कथिते तुजला ॥२॥
रामरतिसुख या शरीराला । घडेल पतिचा घातचि केला ।
पात्रचि नरकाला जाहले हो । परि नाही की मनोरथ पुरला ॥३॥
शापे भस्मचि करिते आतां । जाळीन रविला तुझी काय कथा ।
जाळीन रविला तुझी काय कथा । रामदास म्हणे सरले आतां ।
रघुवीर हा अंतरला मला की रे ॥४॥

१०६३.
( राग-तिलककामोद; ताल-धुमाळी )
रामराजा चालिल्या फौजा । कितीएक बोलती पैजा ।
लंकेमध्ये तो गाजावाजा असंख्यात ॥१॥
पहाड पर्वत उठिले जैसे । रीस वानर चालिले तैसे ।
दैत्यकुळा कल्पांत भासे ॥२॥
दशग्रीव उणेंचि लक्षी । बंदिशाळे सकळ रक्षी ।
देव म्हणति आला कैपक्षी ॥३॥
लंकेवरी घातला घाला । हुडहुडा पताका ढाला ।
समरंगणि संहार जाला ॥४॥
दैत्य आले बहुत भांडले । किती वेळ जिंकोनि गेले ।
किती वेळ जिंकोनी गेले । काळ आला सेखिं निमाले ॥५॥
सकळांसहित रावण रणी । प्रेतरुपी समरंगणी ।
देव मुक्त घाव निशाणी ॥६॥
सुरवर नर वानर । ऋषीश्वर नारद तुंबर ।
आनंदाचे जयजयकार । ॥७॥
बिभीषणाते राज्य दिधले । सौख्य जाले त्रैलोक्य घाले ।
लोटांगण दासे घातले ॥८॥

१०६४.
( राग-धनाश्री; चाल-मनु हा वेधला हो । )
लंका घेतली हो ॥ध्रु०॥
कांचनकोट अलोट लुटाया चालिला दळ भार ।
वानरवीर गिरिवर जैसे देताति भुःभुकार ॥१॥
काळकृतांत उभा रघुनंदन कंदन होत असे ।
सीतशरांकित अंकित बाणी युद्धकळा विकळासे ॥२॥
रिपुदळ आट विराट कराया चालिला जैसा ।
कर्कश वेष उभा रणरंगी राघव हा तैसा ॥३॥
बाण चपेट लपेटीत पुढे काळ चळाळितसे ।
रविकुळटिळक अंतक जैसा भुवन जाळितसे ॥४॥
घोष कडक तदक तडाडी जाला धुमधुमकार ।
बाण झणाण खणाणित भाली होताहे भडिमार ॥५॥
चाप करार भरारित पीछे भूमि थरारितसे ।
शेष धाके थरके फणिमंडळ । कूर्म गरारितसे ॥६॥
सुरवर किन्नर देव दुंदुभी आनंदे धडके ।
दास म्हणे जयवंत निशाण रामाचे फडके ॥७॥

१०६५.
( राग-कानडा; ताल त्रिताल )
लोक सकळ पीडिला । त्रिकुटाचळी रणी रावण पाडिला ॥१॥
मोठा आनंद जाहला । दीनवत्सले बंद खलास केला ॥२॥
बहुत पीडिले लोक । पडिला रणी रावण भुवनकंटक ॥३॥
टाळ मृदंगध्वनी । लागल्या बळे देव दुंदुभी गगनी ॥४॥
गाती नारद तुंबर । विद्याधर गीत संगीत किन्नर ॥५॥
आनंदली जगती । विमानीहुंनि देव सुमने वर्षती ॥६॥
दास म्हणे धन्य हा रघुवीर । कृपाळुपणे फेडिला भूमिभार ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:51:52.5400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

pratum

  • शाद्वल 
  • meadow 
RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.