TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०७१.
( राग-धनाश्री; ताल-धुमाळी; चाल-अभ्यास पाहिजे )
नयेल काय आजिं रामु । माझिया जिवाचा विश्रामु ॥ध्रु०॥
दिवस पुरले धैर्य सरले । वियोगे प्राण शमूं ॥१॥
पुढती उभा राहे अष्ट दिशा पाहे । विकळ होय परमू ॥२॥
रामीरामदास वेधले मानस । केव्हां भेटेल सर्वोत्तमू ॥३॥

१०७२.
( राग-असावरी; ताल-दीपचंदी )
धन्य रघूत्तम धन्य रघूत्तम धन्य रघूत्तमलीळा ।
त्रिभुवनकंटक राक्षस मारुनी फोडियल्या बंदिशाळा ॥ध्रु०॥
प्रजापालक हा रघुनायक ऐसा कदापि नाही ।
उद्वेग नाही चिंता नाही काळदुष्काळहि नाही ॥१॥
व्याधि असेना रोग असेना दैन्य वसेना लोकां ।
वार्धक्य नाही मरण नाही कांहिच नाही शंका ॥२॥
सुंदर लोक सभाग्य बळाचे बहु योग्य बहुत गुणांचे ।
विद्यावैभव धर्मस्थापना कीर्तिवंत भूषणाचे ॥३॥

१०७३.
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा ।
भार फेडिला भूमीचा । आत्मा सर्वांचा ॥१॥
पाळक प्रजाचा योगी योगियांचा ।
राजा सूर्यवंशीचा तो अयोध्येच ॥२॥
राम सामर्थ्याचा कैवारी देवांचा ।
मेघ वोळला सुखाचा न्यायनीतीचा ॥३॥
उद्धार अहिल्येचा एकपत्नीव्रताचा ।
सत्य बोलणे वाचा जप शिवाचा ॥४॥
नाथ अनाथांचा स्वामी हनुमंताचा ।
सोडविता अंतीचा रामदासाचा ॥५॥

१०७४.
( राग-धनाश्री; ताल-दीपचंदी; चाल-अभ्यास० )
राघव पुण्यपरायण रे० ॥ध्रु०॥
पुण्यपरायण धार्मिक राजा । आनंद केला बहुत ॥१॥
धर्मपरायण धार्मिक राजा । सकळहि नीति न्याय ॥२॥
रामराज्य सुखरुप भूमंडळ । दुःखशोक दुरि जाय ॥३॥
दास म्हणे हा पूर्णप्रतापी । महिमा सांगो काय ॥४॥

१०७५.
( राग-विलावल; ताल-धुमाळी; चाल-ऐसे ध्यान समान० )
वैकुंठवासी रम्य विलासी देवाचा वरदानी ।
तेहतीस कोटी सुरवर सोडी भक्तांचा अभिमानी ॥ध्रु०॥
तो राघव ध्याय सदाशिव अंतरि नाम जयाचे ।
रमणीय सुंदर रुप मनोहर अंतरध्यान तयाचे ॥१॥
त्रिंबकभंजन मुनिजनरंजन गंजनदानवपापी ।
बाणी जर्जर घोर महावीर केले पूर्ण प्रतापी ॥२॥
वरद हरिगण दास बिभीषण सेवक वज्र शरीरी ।
भूमि चराचर चंद्र दिवाकर तंवरी भय अपहारी ॥३॥

१०७६.
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
अनेक सप्तस्वरी भरण गगनोदरी विवर विवरो करी भेदाभेद ॥ध्रु०॥
राजीवलोचन अमरमोचन । दुरितसंकोचन नाम तुझे ॥१॥
झणझणझणझण खणखणखणखण । दणदणदणदण घनस्वर ॥२॥
रंग कामाचे सारासार मंडळ तोरा । सारंगीचा वारा विणेध्वनी ॥३॥
सुंदर नाचती सवेंचि उफाळती । सरस नाचती गाति अनेक भेद ॥४॥
खळखळखळखळ खुळखुळखुळखुळ । निवळ निवळ कळा चपळ गाणे ॥५॥
धिधिकट धिधिकट ध्रिमिकट ध्रिमिकट ॥ बिकटबिकटबिकट खलप ताळे ॥६॥
अनेक सुस्वरे भेदे अनेक वचनभेदे । अनेक गायनभेदे वेधु लागे ॥७॥
नेत्रन्यास करन्यास सिरन्यास पदन्यास । शरीरे अंतरन्यास सकळ कांही ॥८॥
उदंडचि सुख लोटे अमृत नलगे वाटे । संगीते अंत दाटे बोलतां न ये ॥९॥
रामदास म्हणे आतां गुण सगुण गातां । भक्तिपंथे जातां समाधान ॥१०॥

१०७७.
( राग-श्रीराग; ताल-झंपा )
मुगुट तेजाळ नाना रत्नांची कीळ ।
भव्य भाळ विशाळ मुख रसाळ ॥१॥
आकर्ण नयन ध्यानस्थाचे ध्यान ।
सौम्य लीळा गहन जनपावन ॥२॥
भूषणमंडित चापशरांकित ।
भद्रासनी शोभत पुढे हनुमंत ॥३॥
सर्वांगे सुंदर कासे पीतांबर ।
चरणी ब्रीदाचा तोडर वांकीगजर ॥४॥
सर्व भुवनपाळ दीनाचा दयाळ ।
करी भक्ताचा सांभाळ त्रैलोक्यपाळ ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:53:26.6800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

constabulary

  • न. शिपाईदल 
  • न. शिपाईदल 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.