TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
अध्यात्म

विविध विषय - अध्यात्म

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे.


अध्यात्म
८६१.
नित्य निरंतर सर्वांचे अंतर । तोचि निराकार बोलिजेतो ॥१॥
बोलिजेतो संत महंत जाणती । खुणेसी बाणती विवंचिता ॥२॥
विवंचिता राम रामचि होइजे । ये गोष्टीची कीजे विचारणा ॥३॥
विचारणा सार विचारे उद्धार । साधु योगेश्वर विचारेंचि ॥४॥
विचारेंचि जनी होतसे सार्थक । धन्य हा विवेक दास म्हणे ॥५॥

८६२.
ब्रह्म हे जाणावे निर्मळ निश्चळ । व्यापक पोकळ व्योमाकार ॥१॥
व्योमाकार ब्रह्म बोलताती श्रुति । पाहो जातां मती तदाकार ॥२॥
तदाकार मती श्रवणे होईल । संदेह जाईल अंतरींचा ॥३॥
अंतरींचा भाव निर्मळ लागतां । होइजे तत्त्वतां निर्मळचि ॥४॥
निर्मळचि होणे निर्मळाच्या गुणे । श्रवणे मनने दास म्हणे ॥५॥

८६३.
ब्रह्म हे निर्गुण मुळी निराकार । तेथे चराचर कैसे जाले ॥१॥
जाले निराकारी अहंतास्फुरण । एकी एकपण प्रगटले ॥२॥
प्रगटले एक आकार नसतां । निर्गुणी अहंता कोणे केली ॥३॥
कोणी नाही केली सर्वही माईक । निर्गुण ते एक जैसे तैसे ॥४॥
जैसे तैसे सर्व माईक रचले । निराकारी जाले कोणेपरी ॥५॥
परी हे नाथिली साच मानूं नये । नाही त्यासि काय पुससील ॥६॥
पुससील काय वांझेची लेंकुरे । मृगजळपुरे वाहवसी ॥७॥
वाहावसी वायां मुळाकडे पाही । मुळी तेथे कांही जाले नाही ॥८॥
नाही कां म्हणतां प्रत्यक्ष दिसते । सत्यत्वे भासते चराचर ॥९॥
चराचर सत्य हे कईं घडेल । अंधारी बुडेल रविबिंब ॥१०॥
बिंबताहे मनी दिसते लोचनी । ते कैसे वचनी मिथ्या होय ॥११॥
मिथ्या होय स्वप्न जागृति आलिया । तेचि निजलीयां सत्य वाटे ॥१२॥
सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य । ऐसे आहे कृत्य अविद्येचे ॥१३॥
अविद्येचे कृत्य तुम्हीच सांगतां । मागुते म्हणतां जाली नाही ॥१४॥
नाही जाले कांही दृष्टीचे बंधन । तैसे हे अज्ञान बाधीतसे ॥१५॥
बाधीतसे परी सर्वहि नाथीले । कांही नाही जाले ज्ञानियांसी ॥१६॥
ज्ञानियांसी दृश्य दिसते की नाही । देहचि विदेही कैसे जाले ॥१७॥
जाली विदेहता देहींच असतां । दिसते पहातां सर्व मिथ्या ॥१८॥
मिथ्या हे सकळ मज हे वाटेना । संशयो तुटेना अंतरीचा ॥१९॥
अंतरी संशयो तुटे संतसंगे । कृपेचेनि योगे दास म्हणे ॥२०॥

८६४.
पहिले प्रथम मुळी परब्रह्म । व्यापक सूक्ष्म जेथे तेथे ॥१॥
जेथे तेथे वस्तु आहे निराकार । शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥
प्रगटीत आहे दिसेना ना नासे । विचारे विलसे ज्ञानियांसी ॥३॥
ज्ञानियांसी ज्ञाने कळे निरंजन । आणि जन वन सारिखेचि ॥४॥
सारिखेंचि आहे देवा ओळखतां । जेथे तेथे जातां देव भासे ॥५॥
देव भासे मनी नित्य निरंतर । बाह्य अभ्यंतर व्यापुनीयां ॥६॥
व्यापुनियां आहे सर्वांचे अंतरी । अनुभवे हरी ओळखावा ॥७॥
ओळखावा परी ओळखतां नये । म्हणोनि उपाय साधुसंग ॥८॥
साधुसंग धरी श्रवण विवरी । सारासार करी विचारणा ॥९॥
विचारणा करी देवांब्राह्मणांची । आणि सगुणाची उपासना ॥१०॥
उपासना कर्म हे आधी पाळावे । मग सांभाळावे ब्रह्मज्ञान ॥११॥
ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे । सन्मार्गी पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥
क्रियाभ्रष्ट कर्म उपासनेविण । नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥
सर्व मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाही । क्रियाकर्म कांही सोडवीना ॥१४॥
सोडवीना कर्म या कर्मापासूनी । भगवंतांवाचूनी तारांबळी ॥१५॥
तारांबळी जाली देवासी नेणतां । कर्मी गुंडाळता देव कैंचा ॥१६॥
देव कैंचा भेटे कर्म उफराटे । संशयोचि वाटे सर्वकाळ ॥१७॥
सर्वकाळ गेला संशयी पडता । नित्य चोखाळितां कळेवर ॥१८॥
कळीवर काय नित्य धूत गेला । लावितो कोणाला उपकार ॥१९॥
उपकार कैंचा सेवक देहाचा । आणि कुटुंबाचा भारवाही ॥२०॥
भारवाही जाला देवासी चुकला । लौकिकचि केला जन्मवरी ॥२१॥
जन्मवरी केले अंती व्यर्थ गेले । कासावीस जाले वांयांवीण ॥२२॥
वांयांवीण काळ गेला की निर्फळ । कर्म हे सबळ सुटेना की ॥२३॥
सुटेना की कर्म कोण सोडवीता । सांडूनी अनंता कर्म केले ॥२४॥
कर्म केले देह चालतां निर्मळ । खंगतां ओंगळ देह जाले ॥२५॥
देह जाला क्षीण सदा हागवण । मृत्तिकेचा सीण कोण करी ॥२६॥
कोण करी तेव्हां कर्माचे पाळण । जाली भणभण शरीराची ॥२७॥
शरिराची जाली जेव्हां भणभण । तेव्हां नारायण भजो पाहे ॥२८॥
भजो पाहे तेव्हां नारायण कैंचा । गेला अभ्यागाचा सर्वकाळ ॥२९॥
सर्वकाळ गेला देव न भजतां । देह चोखाळितां चोखाळेना ॥३०॥
चोखाळेना देह वाढवी संदेह । अंतकाळी पाहे दैन्यवाणा ॥३१॥
दैन्यवाणा देह देवा न भजतां । लेट तुला आतां कोण सोडी ॥३२॥
कोण सोडी देव धुंडिल्यावांचोनी । म्हणोनी भजनी सावधान ॥३३॥
सावधानपणे देवासी शोधावे । तेणेंचि साधावे परलोक ॥३४॥
परलोक साधे संतांचे संगति । चुके अधोगति गर्भवास ॥३५॥
गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां । वस्तूसी पाहतां वस्तुरुप ॥३६॥
वस्तुरुप होणे विवेकाच्या गुणे । नित्य निरुपणे सारासार ॥३७॥
सारासारे घडे असाराचा त्याग । योगिये निःसंग सहजचि ॥३८॥
सहजचि कर्मापासुनी सुटला । बोध निवटला परब्रह्मी ॥३९॥
परब्रह्मी हेतु लागतां अहेतु । देही देहातीतु रामदास ॥४०॥

८६५.
ओंवीचेनि मिसे स्वरुपासि जावे । सत्वर पावावे समाधान ॥१॥
समाधान नाही स्वरुपावांचोनी । म्हणोनिया मनी तेंचि असे ॥२॥
तेंचि असे रुप निर्गुण रामाचे । सुख विश्रामाचे समाधान ॥३॥
समाधान योगी ते हे सुख भोगी । मनी वीतरागी याचि सुखे ॥४॥
याचि सुखे नर जो पाही निवाला । तोचि आहाळला फार दुःखे ॥५॥
दुःख शोक नाही राम आठवीतां । अमृत सेवितां मृत्यु नाही ॥६॥
नाही जन्म मृत्य अभेद भक्तांसी । रामीरामदासी अनुभव ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-01-29T20:31:38.7800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

post mortem examination

  • स्त्री. शवपरीक्षा 
  • स्त्री. मरणोत्तर तपासणी 
  • स्त्री. उत्तरीय तपासणी 
  • = autopsy 
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site