TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
मारुती

देवताविषयक पदे - मारुती

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


मारुती
१११३.
कैवारी हनुमान, आमुचा ॥ध्रु०॥
पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान ॥१॥
नित्य निरंतर रक्षी नाना परी । धरुनियां अभिमान ॥२॥
द्रोणागिरी करि घेउनि आला लक्ष्मणप्राणनिधान ॥३॥
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण ॥४॥

१११४.
मारुति सख्या बलभीमा रे० ॥ध्रु०॥
अंजनिचे वचनामृत सेवुनि । दाखविसी बलसीमा रे० ॥१॥
वज्रतनू अति भीम पराक्रम । संगित गायनसीमा रे० ॥२॥
दास म्हणे तूं रक्षी आम्हां । त्रिभुवनपालनसीमा रे० ॥३॥

१११५.
( राग-देशीखमाज; ताल-धुमाळी; चाल-बहुरंगा रे० )
महिमंता रे हनुमंता । संगितज्ञानमहंता रे ॥ध्रु०॥
बलभीमा रे गुणसीमा । सीमाचि होय निःसीमा रे ॥१॥
कळिकाळा रे विक्राळा । नेत्रिं भयानक ज्वाळा रे ॥२॥
हरिधामा रे गुणग्रामा । दास म्हणे प्रिय रामा रे ॥३॥

१११६.
( राग-देस; ताल-त्रिताल )
मारुति हा श्रीरामाचा दास । ध्यावा मनी हो ॥ध्रु०॥
कुंडलमंडित पीतांबर कांटे ॥ गर्भी सुवर्णाची कास ॥१॥
वानरवेषे हा बलसागर । भेदियले सुर्यमंळास ॥२॥
अणिमादिक कर जोडूनि ठेले । न पाहे त्यांची वास ॥३॥
रामभजनपर दास निरंतर । संभाळीतो धरा विश्वास ॥४॥

१११७.
( राग-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो रे० )
आनंदरुप वनारी रे तो आनं ॥ध्रु०॥
सुरवरनरमुनिजनमनमोहन । सकळ जनां सुखकारी रे ॥१॥
अचपळ चपळ तनु सडपातळ । दास म्हणे मदनारी रे ॥२॥

१११८.
( चाल-उद्धवा शांतवन० )
किती प्रताप वर्णू याचा । श्रीसमर्थ मारुतीचा ॥ध्रु०॥
सूर्य तपेल बारा कळी । पृथ्वीची होईल होळी ।
अंतक जो कळिकाळाचा ॥१॥
कल्पे अनंत होती जाती । नोहे वृद्ध तरुण मारुती ।
अजरामर देह जयाचा ॥२॥
दास म्हणे धन्य बलभीमा । सहस्त्रमुखा न वर्णवे महिमा ।
काय बोलूं मी एक जिभेचा ॥३॥

१११९.
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
सामर्थ्याचा गाभा । तो हा भीम भयानक उभा ॥
पाहतां सुंदर शोभा । लांचावले मन लोभा ॥ध्रु०॥
हुंकारे भुभुःकारे । काळ म्हणे रे बा रे ॥
विघ्न तगेना थारे । धन्य हनुमंता रे ॥१॥
दास म्हणे वीर गाढा । रगडित घनसर दाढा ॥
अभिनव हाचि पवाडा । पाहतां न दिसे जोडा ॥२॥

११२०.
( राग-सारंग; ताल-धुमाळी )
पिंगाक्ष भव्य वदना । देवा निर्भय भक्तसदना ॥ध्रु०॥
चंचल रुप वितंड स्वरुप । दया रघुभूप उदंड करी ॥१॥
पुच्छे लपेटून दैत्य झपेटून ।
काळ चपेटून नेत असे जयवंत हरिवर ॥२॥
भव्य भयानक तो कपिनायक ।
मज वरदायक दास म्हणे महिमा न गणे हर ॥३॥

११२१.
( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी )
अचाट बळ या भीमाचे । अघटित घडवी नेमाचे ॥ध्रु०॥
सीताशुद्धि लागेना लागेना भूगोळ फिरतां भागेना ॥१॥
घमंड केली त्रिकुटी त्रिकूटी । राक्षसाला कुटाकूटी ॥२॥
उदंड मोठा धाकूटा धाकूटा । हडबडले त्रिकूटा ॥३॥
लांगूळ लांब उदंड उदंड । वेढो शके ब्रह्मांड ॥४॥
वज्रशरीरी छेदेना छेदेना । कळिकाळ भेदेना ॥५॥
वानर मोठा हटवादी हटवादी । त्रिकूटी जन रोधी ॥६॥
उदंड गगनी उडाला उडाला । द्रोणगिरी घेउनि आला ॥७॥
धुराची नेल्या पाताळा पाताळा । साधुनि आला त्या काळा ॥८॥
आवडी मोठे कामाचा कामाचा । दास म्हणे प्रिय रामाचा ॥९॥

११२२.
( राग-देशी खमाज; ताल-धुमाळी )
अचाट बळ या भीमाचे । कार्य करितो नेमाचे ॥१॥
अवघड लंका रोधिली रोधिली । बळेंचि सीता शोधिली ॥२॥
दुरिपंथ तो उडाला उडाला । द्रोणागिरी घेउनि आला ॥३॥
रघुनाथाला विश्वास विश्वास । धन्य मारुती निकट दास ॥४॥

११२३.
( राग-कानडा; ताल-त्रिताल )
तो हा प्रळयरुद्र हनुमान । न वर्णवे महिमान ॥ध्रु०॥
नील शैल्यसम भीषण भीमवारण वज्रशरीरी ।
ठाण उड्डाण मांडूनी उभा लांगुळ भूमी थरारी ॥१॥
कांचकच्छ पीतांबर कांसे वाहुनी पहा चपेटा ।
तीक्ष्ण नखे रोमावळी सित काळासी देत थपेटा ॥२॥
कुंडले लोळ कपोळ झळाळित लोचन पीटतावी ।
विक्रांतानन दशन भयंकर अदट वरि दटावी ॥३॥
ब्रह्मचारी शिखा सूत्रधारी मेखळा अती शोभताहे ।
दास उदास रामासन्मुख हस्तक जोडूनी आहे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T22:04:43.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लव्हा

  • पु. एक पक्षी . 
  • पु. मोठी तरवार . राया जाधव जप्तन - मुलुख लव्हा केला । - ऐपो ३३५ . १९ . 
  • वि. लहान . [ सं . लघु ; प्रा . लघु ] 
  • पु. तृणविशेष ; दर्भासारखे गवत . हा चार फूट वाढतो व ओढ्याच्या आणि खाडीच्या तीरांवर प्रायः आढळतो . याचा घराची छप्परे , चटया इ० कडे उपयोग करतात . [ सं . लव - वा ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Sarva namaskar havet.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.