TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
रजक

भारूड - रजक

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


रजक
९७१.
( राग-भैरव; ताल-दीपचंदी )
रे मी निंदक आलो राघवे धाडिलो ।
धुतां धुतां आळस आला जिवे मारिलो ॥ध्रु०॥
मी रजक तुमचा नफर फुकाचा ।
तुकडाही नलगे आम्हां थोरपणाचा ॥१॥
देहबुद्धि मळकी नवां ठायी फाटकी ।
ते द्या रे मजपाशी मी धुतो नेटकी ॥२॥
अरे मी नफर असतां कां मळिण दिसतां ।
मळे द्याल की नेद्याल मी नये मागुता ॥३॥
आस जो करीं दंभ जो धरी । मूर्ख त्यां सरी दुसरी नाही ॥४॥
वृत्ति वळेना अभिमान गळेना । किती धुवूं वाजी आलो डाग ढळेना ॥५॥
स्नेह लागले बहुत मळले । धुतां धुतां ऊन देतां निर्मळ जाले ॥६॥
रामदास रे राम त्यास रे । यातिकुळ आढळेना भेदभास रे ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:46.2400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तादीब

  • स्त्री. शिक्षा ; उपदेश . - आफ . ( अर .) 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा कोणत्या वस्तुपासून बनविलेला असावा?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site