TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
पाळणा

देवताविषयक पदे - पाळणा

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


पाळणा
१०३०.
ब्रह्मयाची कुमारी अहिल्या सुंदरी रे ।
विधाता निर्धारी पण केला रे ॥१॥
पृथ्वीप्रदक्षणा दोनी प्रहरा जाणा रे ।
करी जो प्रमाणा त्यासि द्यावी रे ॥२॥
ऐकोनियां इंद्र वरुण कुबेर ते रे ।
यम वायु त्वरित सर्व गेले रे ॥३॥
तंव तो गौतमऋषी गाई प्रसूतीसी ।
केली त्रिवारेंसी प्रदक्षणा रे ॥४॥
वेदांत पाहूनि ब्रह्मा कन्यादान रे ।
गौतमा अर्पणे रामदास रे ॥५॥

१०३१.
देवराया धांवे रे । धांवे रे देवराया ॥ध्रु०॥
अहिल्या कष्टली वनी । बोले करुणावचनी ॥१॥
मी तरी दीन अनाथ । समर्था तूं दीनानाथ ॥२॥
दयानिधी तुजविण । मजला सोडवी कोण ॥३॥
अंतर जाणसी तरी । धांवोनी ये लवकरी ॥४॥
रामदास म्हणे भावे । ब्रीद तरी सांभाळावे ॥५॥

१०३२.
( चाल-अंजनीगीत )
स्वयंवराचिये काळी । नवमंदिरी मैथिली । राम पाहतसे वेल्हाळी ।
सखियांसी ॥ध्रु०॥
रामराजीवलोचन । सुकुमारु चिद्घनु । दुर्येतवर्ये पण । जनकाचा ॥१॥
गावाक्षद्वारे दृष्टी । राम अवलोकी गोरटी । तंव तन्मय जाली दृष्टी ।
रामरुपी ॥२॥
देहभाव पारुषले । चित्त चैतन्य मिळाले । सबाह्य कोंदाटले । रामरुपी ॥३॥
ऐसी निश्चेष्टित शक्ति । तंव सखिया सांवरिती ।
सावध केली भक्ती सीतादेवी ॥४॥
पुढती पद्मनयना । अवलोकी रामराणा । अवलोकी रामराणा ।
तंव आठवला पणा । पितयाचा ॥५॥
बहु कठिण धनुष्य । राम सुकुमार राजस ।
धरुनि त्र्यंबकवेषे । विघ्न आले ॥६॥
रामकरतल सुकुमार । कैसे ठाण मनोहर ।
अतिशय दुर्धर । महेशचाप ॥७॥
ऐसी जानकीची भक्ति । देखोनि भक्तपती ।
धनुष्य वोढोनी श्रीपती । भग्न केले ॥८॥
रामदास प्रार्थी । सीता मीनली रघुनाथी ।
ते सुख जाणे पशुपती । महादेव ॥९॥

१०३३.
( राग-रामकली; ताल-धुमाळी; चाल-अभंगाची )
पैल कोण वो साजणी । उभा कोदंडपाणी ।
पहातां न पुरे धणी । या डोळ्यांची ॥ध्रु०॥
रम्य निमासुर । श्रीमुख साजिरे ।
कुंडले मकराकार । तळपताती ॥१॥
घननीळा सांवळा । कांसे सोनसळा ।
मृगनाभीटिळा । रेखियेला ॥२॥
अहिल्या गौतमवधू । मुक्त श्राप संमंधू ।
तयाचा लागला वेधू । रामदासी ॥३॥

१०३४.
( राग-जोगी मांड, ताल-दीपचंदी )
रामा चाल रे झडकरी । त्रिभुवन हरुषे भारी ॥ध्रु०॥
शरयूनदीतीरी अयोध्यापुरी । रमणीय रचिली भारी ॥
तीसी प्रतिमल्ल सरी ऐसीच दुसरी । नाही पृथ्वीवरी ॥
ते वैकुंठमंदिरी । आनंद सचराचरी ॥१॥
तेथे ऋषिकुळ सकळ नांदति निर्मळ । उत्साहाचेनि उसाळे ॥
ते धोत्रे सोज्वळे झेलिती करतळे । विभूतीचे गोळे ॥
जे ध्यानी नाकळे मना नाढळे । ते रुप पाहती डोळे ॥
आणि क्रूर विशाळे वधिली ढिसाळे । पावोनि यज्ञफळे ॥२॥
तेथे ब्रह्मनंदिनी शापबंधनी । असतां निजपतिवचनी ॥
ते रामागमनी ऐकतां क्षणी । हरुषत अंतःकरणी ।
म्हणे श्रीचरणी होतां मिळणी । पालटेन पाषाणी ॥
ऐसे चिंतुनि मनी दिवस रजनी । पथ पाहे लोचनी ॥३॥
तेथे सुरवर नाचति वाद्ये वाजती । वरुषति पुष्पे जिमूति ॥
तेथे गंध वातगती नेती दिगंती । घ्राणा होतसे तृप्ती ॥
तेथे दिशा झळकती सफळ वनस्पती । पक्षी शुभ बोलती ॥
आला म्हणती राम सीतापती । जयजयकारे गर्जती ॥४॥
तेथे दशरथ मानसी राम श्रवणशशी । तुंबळ सुखसिंधूसी ॥
तेथे जनकसरितेसी मिळणी कैसी । होताहे गजरेसी ॥
तेथे भक्त चकोरासी आनंद अहर्निशी । पाहताती उदयासी ॥
ऐसे देखुनि भक्तीनवमीसी । प्रगट रामदासी ॥५॥

१०३५.
( चाल-सावाईची )
रामे सज्जीले वितंड परम चंड ।
रामे उचलिले त्र्यंबक कौशिकऋषि पुलकांक ॥
रामे ओढिले शिवधनु सीतेचे तनुमनु ।
रामे भंगिले भवचाप असुरां सुटला कंप ॥१॥
फरफरफरफर ओढिति कुंजर । धनुष्य आणिले भूपे ॥
हरहर हरहर अति पण दुष्कर । सुंदर रघुपति रुपे ॥
वरवरवरवर थरथरथरथर भू कंपे ॥२॥
कडकडकडकड भग्न कडाडे । तडतडतडक फुटे ॥
गडगडगडगड गगन कडाडी । धडधडधड धडक उठे ॥
भडभड भडभड रविरथ चुके । घडघडीत कुटे ॥३॥
दुमदुमदुमदुम दुमित भूगोळे । स्वर्ग मृत्यु पाताळे ॥
धुमधुमधुमधुम धुमकट कणी । विधिस बैसले टाळे ॥
हळहळहळहळ अति कल्होळ । हर्षे पंचमुख डोले ॥
खळखळखळखळ उचंबळत । जळसिंधूसी मोहो आंदोळे ॥४॥
धकधकधकधक धकीत धरणी । धराबधिर जाले कर्ण ॥
चकचकचकचक चकीत निशाचर । करविले दीर्घशयन ॥
थकथकथकथक थकीत सुरवर । वरुषती पुष्पे तसे ॥
लखलखलखलखलखलख रत्नमालिका । जनवकालिका लग्न ॥५॥
जयजयजयजय जयति रघुराजवीर । गर्जति जयकारे ॥
धिमधिमधिमधिम नृपदेव दुदुंभि । गगन गर्जले गजरे ॥
तरतरतरतर मगंळतुरे । विविध वाद्ये सुंदरे ॥
समरस रसरस दासा मानसी । रामसीता वधूवरे ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-02-10T21:47:28.8700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Recardian Theory of Rent

  • रिकार्डो का लगान सिद्धांत 
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.