TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
उंदीर

भारूड - उंदीर

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


उंदीर
८९७.
देवा तुझी पागा थोर देते दगा । धान्ये वस्त्रे की गा नाशियेली ॥१॥
नाशियेली घरे पाडिली विवरे । घरांत उकीर ढीग केले ॥२॥
ढीग केले घरी रानी ते पर्वती । मोकाट हिंडती चहूंकडे ॥३॥
चहूंकडे तयां व्यर्थ बाळगिसी । तूंही लवंडसी क्षणक्षणा ॥४॥
क्षणक्षणा देवा रागाही येतोसी । दास म्हणे ऐसी नीति नव्हे ॥५॥

८९८.
निधन्याचे परी लोक मारिताती । तुज गणपती ईरे नाही ॥१॥
इरे नाही कैसी आपुल्या यानाची । जेथे तेथे चीची मारामारी ॥२॥
मारामारी होते तुझ्या आश्रितांची । देवा ऐसी कैसी विचारणा ॥३॥
विचारणा करी तुरंगा आवरी । त्याग तरी करी एकाएकी ॥४॥
एकाएकी त्याग करितां हांसती । नीतीने ठेविती कोणी तरी ॥५॥
कोणी तरी पशु पीडे स्वामी दोषु । तुज सर्वज्ञासी काय सांगो ॥६॥
काय सांगो आतां विघ्नासी मारिसी । तुझी तुज कैसी जड जाली ॥७॥
जड जाली तरी द्यावी मोकलुनी । परि हे करणी ऐसी नव्हे ॥८॥
ऐसे नव्हे अमर्यादेचे बोलणे । समर्थासी कोणे सिकवावे ॥९॥
शिकवितां जनी वाईट दिसते । आश्रिते समर्थें सांभाळावी ॥१०॥
सांभाळावी ऐसे बोलियेलो तुम्हां । दास म्हणे क्षमा करी देवा ॥११॥

८९९.
पुरुषेवांचून जाली । आपणां आपण व्याली ।
पोटीचे घेऊन गेली । उमाणे माझे ॥१॥
बायको निर्माण जाली । अनंत अंडी घातली ।
दिवस जालिया फुटली । आपण मेली ॥२॥
मरोनि मागुते जिते । कोणी नाही उठविते ।
आपणासि आपण खाते । उमाणे माझे ॥३॥
जाल्यां मेल्यां सारिखेंचि । चाले ना बोले कांहीचि ।
चाळक साउली जयाची । तयासी नाही ॥४॥
पाहतां सर्वही कांही । विचारितां कोठे नाही ।
सखोल दृष्टीने पाही । उमाणे माझे ॥५॥
अत्यंत शोधूनि पाहे । पाहोनि उगला राहे ॥
बोलणे हे तुज न साहे । उमाणे माझे ॥६॥
सांगतां वियोग बाधी । भोगणे दुःख उपाधि ।
लपिजे जाणोनि संधि । उमाणे माझे ॥७॥
ईश्वर सांगतां शंके । मानवी बापुडी रंके ।
सांगो जाणतील कौतुक । परी ते नव्हे ॥८॥
मानसी आवडी तरी । अर्थ लाधला जरी ।
अमर तयासी करी । उमाणे माझे ॥९॥
रामीरामदास खूण । सांगतो जाणुनी नेणे ।
जाणीव धरतां कठिण । सांगेल पुढे ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:37.9770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

lime knot

  • Bot. चुना गाठ 
RANDOM WORD

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site